मराठी बातम्या /बातम्या /explainer /

गंगोत्री वितळतेय, गंगा नंदीच्या अस्तित्वाला धोका? तज्ज्ञ म्हणतात....

गंगोत्री वितळतेय, गंगा नंदीच्या अस्तित्वाला धोका? तज्ज्ञ म्हणतात....

गंगोत्री वितळतेय, गंगा नंदीच्या अस्तित्वाला धोका?

गंगोत्री वितळतेय, गंगा नंदीच्या अस्तित्वाला धोका?

देशात सर्वांत पवित्र मानली जाणारी गंगा नदी (Ganga River) गंगोत्री हिमनदीच्या गोमुखातून उगम पावते. 2500 किलोमीटर लांब वाहणारी गंगा नदी 40 कोटींहून अधिक लोकांची तहान भागवते. पण आता गंगोत्री हिमनदीच धोक्यात आली आहे.

जागतिक तापमानवाढ (Global warming) आणि हवामान बदलाचे (Climate Change) दुष्परिणाम जगभरात दिसून येत आहेत. अवकाळी किंवा अतिपाऊस, दुष्काळ, पूर आदींचा परिणाम पर्यावरणासह कृषी क्षेत्रावर होत आहे. यामुळे मोठं नुकसानही होत आहे. जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही, तर भविष्यकाळात मोठी संकटं निर्माण होऊ शकतात. भारताच्या सीमावर्ती भागातल्या हिमालयात (Himalaya) 9575 हिमनद्या (Glaciers) आहे. यापैकी 968 हिमनद्या उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) आहेत. यात गंगोत्री हिमनदी (Gangotri Glacier) गेल्या 87 वर्षांत 1700 मीटर (1.70 किमी) वितळली (Melting) आहे. एका अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाली आहे. वाढतं तापमान, कमी हिमवर्षाव (Snowfall) आणि अतिपाऊस ही यामागील कारणं असल्याचं दिसून येतं. यास जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल कारणीभूत आहेत, असंदेखील या अभ्यासातून दिसून आलं आहे. 'आज तक'ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. देशात सर्वांत पवित्र मानली जाणारी गंगा नदी (Ganga River) गंगोत्री हिमनदीच्या गोमुखातून उगम पावते. 2500 किलोमीटर लांब वाहणारी गंगा नदी 40 कोटींहून अधिक लोकांची तहान भागवते. पण आता गंगोत्री हिमनदीच धोक्यात आली आहे. गेल्या 87 वर्षांत या हिमनदीच्या 30 किलोमीटर लांबीपैकी दोन किलोमीटरचा भाग वितळून गेला आहे. आता ही प्रक्रिया पुन्हा होणार नाही. त्यामुळे ही धोक्याची सूचना मानायला हरकत नाही. गंगा, घाघरा, सरस्वतीसारख्या नद्या देशातल्या मैदानी प्रदेशासाठी संजीवनी ठरतात. या नद्यांमुळे या भागात सिंचन होतं. पण आता या नद्यांचा स्रोत असलेली गंगोत्री हिमनदी धोक्यात आली आहे. देहराडून येथील वाडिया इन्स्टिट्युट ऑफ हिमालयन जिओलॉजीचे (Wadia Institute of Himalayan Geology) शास्त्रज्ञ डॉ. राकेश भाम्बरी यांनी गंगोत्री हिमनदीबाबत अभ्यास केला आहे. 1935 ते 2022 पर्यंत गंगोत्री हिमनदीचं मुख 1700 मीटर अर्थात पावणे दोन किलोमीटरपर्यंत वितळलं आहे, असं या अभ्यासातून दिसून आलं आहे. वाढतं तापमान, कमी हिमवर्षाव आणि अतिपाऊस यासाठी कारणीभूत मानला जात आहे. खरं तर वाढत्या तापमानास आपणच कारणीभूत आहोत. हिमवर्षाव कमी होण्यास हवामानबदल हे प्रमुख कारण आहे. डॉ. राकेश यांनी हवामान बदलाबाबत 'आज तक'ला सांगितलं, ‘हा बदल तुम्हीदेखील पाहू शकता. मान्सूनचा परतीचा प्रवास आता सुरू होणं अपेक्षित होतं. पण गेल्या तीन दिवसांपासून देहराडूनमध्ये पाऊस होत आहे. हिच स्थिती अजून काही ठिकाणी आहे. हवामान सारखं बदलतंय. या हवामानाचा हिमालयीन प्रदेशांवर कुठे आणि किती परिणाम होईल हे सांगणं कठीण आहे.’ (मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? या ग्रहाचा असू शकतो प्रभाव, करा हे सोपे उपाय) "गेल्या काही वर्षांत उत्तराखंडातला पावसाचा पॅटर्न (Monsoon Pattern) बदलला आहे. या भागात अतिपाऊस होत आहे. पावसाचं प्रमाण आणि वेळ सांगणं कठीण आहे. पण हिमवर्षावाचं प्रमाण कमी झालं आहे. हिमवर्षाव झाला नाही आणि अतिपाऊस होत राहिला तर हिमनद्या वितळणार. हिमवर्षाव कमी होत असून पाऊस जास्त होत असल्याचं स्थानिक लोकदेखील सांगतात. अशा प्रकारचं हवामान राहिलं तर हिमालयातल्या हिमनद्या वितळून खालच्या दिशेनं वाहू लागतील. 2021 मध्ये चमोली जिल्ह्यात धौलीगंगा नदीमुळे निर्माण झालेली आपत्ती पुन्हा पाहायला मिळू शकते. 2013 मध्ये केदारनाथ येथील घटना कदाचित आठवत असेल तर चिखल आणि बर्फानं बनलेल्या चोराबारी तलाव परिसरात इतका पाऊस झाला की तलाव तो भार सहन करू शकला नाही. त्यामुळे हा तलाव फुटला. यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाली. जर हिमालयीन प्रदेशात (Himalayan Region) अशाप्रकारे अतिपाऊस होत राहिला तर हिमनद्या वितळून किंवा तुटून विनाशकारी स्थिती वारंवार निर्माण होईल," असं डॉ. राकेश यांनी सांगितलं. गंगोत्री ही उत्तराखंडातील हिमालयातली सर्वांत मोठी हिमनदी आहे. ती 30 किलोमीटर लांब असून, तिचं क्षेत्रफळ 143 चौरस किलोमीटर आहे. तिची रुंदी 0.5 ते 2.5 किलोमीटर आहे. तिच्या एका टोकाला 3950 फूट उंचीवर गोमुख आहे. तिथून भागिरथी नदी उगम पावते. त्यानंतर देव प्रयागमध्ये अलकनंदा आणि भागिरथी या नद्यांचा संगम होतो. 2001 ते 2016 दरम्यान गंगोत्री हिमनदीने 0.23 चौरस किलोमीटर क्षेत्र गमावलं आहे म्हणजेच हिमनदी वितळली आहे. पाऊस आणि हिमवर्षाचं प्रमाण कमी असल्याने हा बदल झाला आहे. याशिवाय तापमानवाढ हेदेखील कारण आहे, अशी माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली होती. डॉ. राकेश यांनी सांगितलं, "गंगोत्री हिमनदी 30 किलोमीटर लांब आहे. गेल्या 87 वर्षांत ती 1700 मीटर वितळली आहे. तिचा वितळण्याचा वेग जास्त आहे. मात्र ही केव्हापर्यंत वितळेल? असा प्रश्न जर विचारला गेला तर ते सांगणं कठीण आहे. कारण कोणतीही हिमनदी वितळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. यात हवामान बदल, हिमवर्षावात घट, वाढतं तापमान, संतताधार पाऊस यांचा समावेश असतो. गंगोत्री हिमनदी खूप अस्थिर आहे. निदान हा तिचा पुढील भाग आहे. हिमनदी एका टोकापासून वितळणारच. मात्र ही हिमनदी मुखापासून वितळत आहे." "17 जुलै 2017 पासून ते 20 जुलै 2017 दरम्यान सलग तीन दिवस पाऊस झाला. येथील मातीत बर्फाळ पदार्थ मिसळले. पर्माफ्रॉस्ट अवस्था होती. मात्र संततधार पावसामुळे हिमनदीचं मुख आणि आजूबाजूचा भाग झपाट्यानं वितळला होता. उतारावर पाण्याचा प्रवाह तीव्र होता. अशा पावसात स्थिरता फार कमी प्रमाणात राहते. कोणत्याही हिमनदीचा वितळण्याचा वेग वाढतो. तसंच भूस्खलनही होतं. सध्या दोन डझन हिमनद्यांवर शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. यात गंगोत्री, चोरबारी, दुनागिरी, डोकरियानी आणि पिंडारी या प्रमुख आहेत. खरं तर दुर्गम भागातल्या प्रत्येक हिमनदीचा अभ्यास करणं शक्य नाही," असं डॉ. राकेश यांनी सांगितलं. या हिमनदीतून गंगा उगम पावते का? ही हिमनदी केव्हापर्यंत संपुष्टात येईल? असा प्रश्न डॉ. राकेश यांना विचारला असता, ते म्हणाले, "ही हिमनदी पूर्ण कधी वितळेल हे सांगणं कठीण आहे. कारण हिमनदी वितळण्यामागे अनेक कारणं असतात. अशा प्रकारचा अभ्यास करण्यासाठी आमच्याकडे किमान 30 वर्षांचा डाटा असणं गरजेचं आहे. पण तो डाटा उपलब्ध नाही. आमच्याकडे केवळ 10 ते 12 वर्षांचा डाटा आहे. त्यामुळे गंगोत्री हिमनदी केव्हा संपुष्टात येईल हे सांगणं कठीण आहे." "आता 87 वर्षांत 1700 मीटर क्षेत्र वितळले तर गंगोत्री हिमनदी किती वर्षांत वितळेल? असं कोणी विचारलं तर ते सांगणं कठीण आहे. गंगोत्री वितळण्याचा हा दर पाहिला तर एका वर्षात 19.54 मीटर वितळली आहे. त्यानुसार 1535 ते 1500 वर्षांत गंगोत्री हिमनदी वितळू शकते. पण हे उत्तर पूर्णतः योग्य नाही. कारण केव्हा आणि किती प्रमाणात हिमवर्षाव होईल हे आपण सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे पाऊस किती प्रमाणात होईल, तापमानात किती वाढ होईल हे सांगणंदेखील कठीण आहे. भविष्यात याबाबत अचूक डाटा उपलब्ध झाला तर याविषयी नेमकेपणानं सांगणं शक्य होईल," असं डॉ. राकेश यांनी सांगितलं.
First published:

पुढील बातम्या