मराठी बातम्या /बातम्या /explainer /

27 वर्षांच्या तुरुंगवासातून आजच्याच दिवशी सुटले होते दक्षिण आफ्रिकेचे 'गांधी'! नंतर झाले पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष

27 वर्षांच्या तुरुंगवासातून आजच्याच दिवशी सुटले होते दक्षिण आफ्रिकेचे 'गांधी'! नंतर झाले पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष

ते 27 वर्षे तुरुंगात राहिले. मात्र, त्यांनी कधीही हार मानली नाही किंवा त्यांच्या समर्थकांना विश्वास तुटू दिला नाही. आम्ही बोलत आहोत दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला (Nelson Mandela) यांच्याबद्दल.

ते 27 वर्षे तुरुंगात राहिले. मात्र, त्यांनी कधीही हार मानली नाही किंवा त्यांच्या समर्थकांना विश्वास तुटू दिला नाही. आम्ही बोलत आहोत दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला (Nelson Mandela) यांच्याबद्दल.

ते 27 वर्षे तुरुंगात राहिले. मात्र, त्यांनी कधीही हार मानली नाही किंवा त्यांच्या समर्थकांना विश्वास तुटू दिला नाही. आम्ही बोलत आहोत दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला (Nelson Mandela) यांच्याबद्दल.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 11 फेब्रुवारी : 11 फेब्रुवारी हा नेल्सन मंडेला (Nelson Mandela) यांच्या जीवनाशी संबंधित एक खास दिवस आहे, ज्यांना आफ्रिकेचे 'गांधी' म्हटले जाते. 1990 मध्ये आजच्याच दिवशी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण 27 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर त्यांची सुटका झाली. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद धोरणांविरुद्धच्या चळवळीचे ते सर्वोच्च नेते होते. मंडेला यांना जून 1964 मध्ये देशद्रोह आणि कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. नेल्सन मंडेला हे महात्मा गांधींसारखे अहिंसक मार्गाचे समर्थक होते. मंडेला गांधीजींना स्वतःसाठी प्रेरणास्त्रोत मानत.

नेल्सन मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 रोजी झाला. ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनले. मंडेला दक्षिण आफ्रिकेतील शतकानुशतके चाललेल्या वर्णभेदाच्या विरोधात होते. ते विरोधी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि त्याच्या सशस्त्र गट उमखोटोन वे सिझ्वेचे अध्यक्ष होते. वर्णभेदविरोधी लढ्यामुळे मंडेला यांना रॉबेन बेटावर 27 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. येथे त्यांना कोळशाच्या खाणीत काम करायला लावले. 11 फेब्रुवारी 1990 रोजी गोर्‍या सरकारशी समझोता करून त्यांची तुरुंगातून सुटका झाली. मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेच्या नव्या उभारणीचे जनक मानले जाते. दक्षिण आफ्रिकेशिवाय जगभर वर्णभेदाला विरोध करणारे प्रतीक मानले जाते.

नेल्सन मंडेला यांचे मिशनरी शाळेत शिक्षण

18 जुलै 1918 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप प्रांतात जन्मलेले नेल्सन मंडेला लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्यासाठी ओळखले जात होते. नेल्सन मंडेला यांचे शिक्षण मिशनरी शाळेतून झाले. नेल्सन मंडेला यांच्या वडिलांचे वयाच्या 12 व्या वर्षी निधन झाले, त्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी त्यांचे जातीचे सरदारपद सोडले.

कायद्याच्या अभ्यासादरम्यान वर्णभेद आणि वर्णद्वेष

कायद्याच्या अभ्यासादरम्यान वर्णद्वेष आणि वर्णभेद जाणवला. त्याविरुद्ध त्यांनी त्याचवेळी लढा सुरू केला. नेल्सन मंडेला 1941 मध्ये जोहान्सबर्गला गेले. दोन वर्षांनंतर नेल्सन मंडेला यांनी आफ्रिकनेर विटवॉटरसँड युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली, जिथे ते विविध वंश आणि पार्श्वभूमीच्या लोकांना भेटले. या काळात ते उदारमतवादी, कट्टरपंथी आणि आफ्रिकन विचारसरणीच्या संपर्कात आले. वर्णद्वेष आणि अनेक प्रकारच्या भेदभावामुळे त्यांच्यात राजकारणाची आवड निर्माण झाली. मंडेला यांनी त्यांच्या कारकिर्दीला लॉ फर्ममध्ये लिपिक म्हणून सुरुवात केली. पण राजकारणात रस होता. 1944 मध्ये ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमध्ये सामील झाले आणि वर्णभेदाविरूद्ध सुरू असलेल्या चळवळीत सामील झाले.

नेल्सन मंडेला 1994 मध्ये पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष

1994 मध्ये पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनलेल्या नेल्सन मंडेला यांनी तुरुंगात असतानाही आपला संघर्ष सुरूच ठेवला. 27 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर 11 फेब्रुवारी 1990 रोजी नेल्सन मंडेला तुरुंगातून बाहेर आले. 1994 च्या भेदभावरहित निवडणुकीत मंडेला यांच्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला 62 टक्के मते मिळाली आणि मंडेला देशाचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनले. दक्षिण आफ्रिकेचे नवीन संविधान 1996 मध्ये लागू झाले. 1997 मध्ये सक्रिय राजकारण सोडल्यानंतर 5 डिसेंबर 2013 रोजी फुफ्फुसाच्या संसर्गामुळे मंडेला यांचे निधन झाले.

मदिबा

मंडेला हे दक्षिण आफ्रिकेतील लोकशाहीचे संस्थापक होते. 2004 मध्ये जोहान्सबर्गमधील सँडटन स्क्वेअर शॉपिंग सेंटरमध्ये मंडेलाचा पुतळा स्थापित करण्यात आला. यानंतर केंद्राचे नाव बदलून नेल्सन मंडेला स्क्वेअर करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेत लोक मंडेला यांना मदिबा म्हणत. हा ज्येष्ठांसाठी आदरयुक्त शब्द आहे.

First published:

Tags: Mahatma gandhi