Home /News /explainer /

डुकराचे अवयव वापरुन मानवामध्ये हृदय, त्वचा, किडनी ते व्हजायनापर्यंत अवयव प्रत्यारोपित!

डुकराचे अवयव वापरुन मानवामध्ये हृदय, त्वचा, किडनी ते व्हजायनापर्यंत अवयव प्रत्यारोपित!

याआधी अनेक क्लिष्ट वैद्यकीय प्रकरणांमध्ये डुकराचे अवयव मानवामध्ये प्रत्यारोपित केले गेले आहे. डुकराचे अवयव जेनिटिकली मॉडिफाय करुन मानवी शरीरासाठी योग्य केले जाऊ शकतात, असे मानले जाते. या लेखात आम्ही तुम्हाला वैद्यकीय शास्त्राच्या अशाच काही चमत्कारांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये डुकराचे अवयव मानवाला प्रत्यारोपित केले गेले आहेत

पुढे वाचा ...
    वॉशिंग्टन, 11 जानेवारी : विज्ञानातील प्रगतीने मानवाने अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती तर मानवासाठी संजीवनीचे काम करत आहेत. अशीच एक ऐतिहासिक घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेतील डॉक्टरांच्या (US Doctors) टीमने एक चमत्कार केला आहे. या टीमने 57 वर्षीय पुरुषामध्ये जनुकीय मॉडिफाईड डुकराचे हृदय (Genetically-Modified Pig Heart) यशस्वीरित्या प्रत्यारोपित केले आहे. वैद्यकीय इतिहासात ही पहिलीच घटना असून यामुळे अवयवदानाच्या कमतरतेला सामोरे जाण्यास (Organ Donation) मदत होईल, असा विश्वास आहे. याआधी अनेक जटील वैद्यकीय प्रकरणांमध्ये डुकराचे भाग रुग्णाला प्रत्यारोपित केले गेले आहेत. असे मानले जात आहे की डुकराचे अवयव जेनिटिकली मॉडिफाय करुन मानवी शरीरासाठी योग्य केले जाऊ शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला वैद्यकीय शास्त्राच्या अशाच काही चमत्कारांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये डुकराचे अवयव मानवाला प्रत्यारोपित केले गेले आहेत. डुकराच्या आतड्याच्या मदतीने तयार केली कृत्रिम योनी झेक प्रजासत्ताकची ही केस आहे. प्रायव्हेट पार्टमध्ये गंभीर समस्या असलेल्या महिलेवर डॉक्टरांनी अनोख्या पद्धतीने उपचार केले. या महिलेची योनी एवढी अरुंद होती की, सेक्स करणे तर दूरच, डॉक्टरही तपासणी करू शकत नव्हते. अशा परिस्थितीत डुकराच्या आतड्याच्या मदतीने शस्त्रक्रियेद्वारे या महिलेचा प्रायव्हेट पार्ट नव्याने तयार करण्यात आला. डेली मेल या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, झेक रिपब्लिकमधील ही महिला तिच्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडे तपासणीसाठी गेली होती. महिलेचा प्रायव्हेट पार्ट इतका लहान होता की त्याची तपासणीही करता येत नाही, असे डॉक्टरांना आढळले. अशा परिस्थितीत त्यांनी तिला पश्चिम झेक प्रजासत्ताकमधील प्लझेन शहरातील विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. येथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना आढळले की महिलेला स्क्लेरोडर्मा आहे, ज्यामध्ये त्वचा कडक होते आणि आकुंचन पावते. अशा स्थितीत डॉक्टरांनी 'मेश ऑगमेंटेड व्हजायनल रिकन्स्ट्रक्शन टेक्निक' वापरण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत, प्रभावित भागात फ्रेश टिशू लागू केले जाते. यामध्ये मानवी त्वचा किंवा डुकराच्या आतड्याचा वापर केला जातो. कारण डुकराचे टिशू मऊ असतात आणि त्यांची रचना देखील मानवी टिशूंसारखी असते. चीनमध्ये बर्न केस सर्जरीमध्ये डुकराचे चामडे वापरले जाते चीनमधील शास्त्रज्ञांनी डुक्कर आणि मानव यांच्या जनुकांचे मिश्रण करून त्वचेचा एक नवीन प्रकार (Human and pig gene hybrid) विकसित केला आहे, जो मानवांवर लागू केला जाऊ शकतो. शास्त्रज्ञांचा हा शोध भाजलेल्या आणि अॅसिड हल्ल्यातील पीडितांवर उपचारासाठी महत्वाचा टप्पा मानला जात आहे. म्यूटेंट 'त्वचा' हे त्या दिशेने आणखी एक पाऊल आहे, ज्यामध्ये डुकरांमध्ये मानवांमध्ये प्रत्यारोपित करता येणारे अवयव तयार केले जात आहेत. 99 वर्षांपूर्वी शोधलेल्या स्वॅबची कहाणी, जी कोविडमध्ये ठरतेय सर्वात उपयोगी नानचांग युनिव्हर्सिटीशी संलग्न हॉस्पिटलमधील चिनी संशोधकांच्या टीमने कृत्रिम 'त्वचा' विकसित केली आहे. मॅकाक माकडांवर त्वचेची प्रथम चाचणी करण्यात आली आणि परिणामांवरून असे दिसून आले की ते माकडाच्या मूळ त्वचेवर 25 दिवसांपर्यंत राहू शकतात. डुकराच्या किडनीतून महिलेला जीवदान अमेरिकेतील शास्त्रज्ञांना जिनोट्रांसप्लांटेशन (enotransplantation)बाबत मोठे यश मिळाले आहे. एक प्रयोग म्हणून शास्त्रज्ञांनी डुकराची किडनी महिलेवर प्रत्यारोपित केली. हे प्रत्यारोपण यशस्वी तर झालेच पण किडनीनेही आपले काम चोख बजावले. (न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी), न्यूयॉर्कच्या NYU येथील लँगोन हेल्थ येथील डॉक्टरांनी एका डुकराची किडनी एका महिलेमध्ये प्रत्यारोपित केली आहे. ही किडनी महिलेच्या शरीरातील पेशींना बाहेरून 3 दिवस जोडण्यात आली होती. या दरम्यान, मूत्रपिंडाने त्याचे सामान्य कार्य केले. प्रत्यारोपणाच्या टीमचे नेतृत्व करणारे डॉक्टर रॉबर्ट मॉन्टगोमेरी यांनी सांगितले की, डुकराची किडनी सामान्य माणसाच्या किडनीप्रमाणे काम करते. ज्या महिलेची किडनी प्रत्यारोपण करण्यात आली ती ब्रेन डेड महिला आहे. महिलेची किडनी नीट काम करत नसल्याने तिला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. सध्या हा प्रयोग म्हणून करण्यात आला असून महिलेच्या कुटुंबीयांची संमती घेण्यात आली आहे. डेल्टा, ओमिक्रॉननंतर आता डेल्टाक्रॉन; नेमका काय आहे कोरोनाचा हा नवा प्रकार? जेनेटिकली मॉडिफाईड का? वास्तविक, डुकराच्या जीन्समध्ये ग्लायकॉन नावाचा साखरेचा रेणू असतो, जो मानवांमध्ये नसतो. आपले शरीर या साखर रेणूला परदेशी घटक मानते आणि ते नाकारते. त्यामुळे याआधी जेव्हा किडनी प्रत्यारोपणाचा प्रयत्न केला गेला तेव्हा तो अयशस्वी झाला. या समस्येचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञांनी डुकराच्या जनुकांमध्ये बदल करून साखरेचा हा रेणू आधीच काढून टाकला होता. यासोबतच जनुकीय अभियांत्रिकीद्वारे डुकराच्या जनुकांमध्ये बदल करून किडनी प्रत्यारोपण करण्यात आली. हे प्रयत्नही फसले झेनोट्रान्सप्लांटेशनबाबत वर्षानुवर्षे प्रयत्न सुरू आहेत. लंगूर आणि माकडाच्या अवयवांचे मानवी शरीरात प्रत्यारोपण करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केला आहे. रक्ताच्या गुठळ्यांपासून ते शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिसादामुळे हे प्रत्यारोपण यशस्वी होऊ शकले नाही. जून 1992 मध्ये प्रथमच लंगूर यकृताचे मानवी शरीरात प्रत्यारोपण करण्यात आले. प्रत्यारोपणाच्या 21 दिवसांनंतरच रुग्णाच्या संपूर्ण शरीरात संसर्ग पसरला होता. हा संसर्ग हळूहळू वाढत गेला आणि 70 दिवसांनंतर रुग्णाचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. जानेवारी 1993 मध्ये, 62 वर्षीय व्यक्तीवर लंगूरचे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. मात्र, 26 दिवसांनंतर त्यांचाही मृत्यू झाला. 1920 ते 1990 या काळात जगभरात या क्षेत्रात खूप काम झाले. ससे, माकडापासून ते लंगूरपर्यंतचे अवयव मानवामध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. मात्र, 1990 नंतर शास्त्रज्ञांनी डुकरांना xenotransplantation साठी सर्वात योग्य मानले.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Heart risk, Medical

    पुढील बातम्या