Home /News /explainer /

EXPLAINER : Expiry Date उलटलेल्या औषधांचं खरंच विष होतं?

EXPLAINER : Expiry Date उलटलेल्या औषधांचं खरंच विष होतं?

आपण औषधं खरेदी करतो तेव्हा त्याच्यावरची एक्स्पायरी तारीख (Medicine Expiry Date) आवर्जून बघतो. एक्स्पायरी डेट म्हणजे त्या ठरावीक तारखेनंतर औषध वापरू नये, असा संकेत असतो.

मुंबई, 3 डिसेंबर : आपण औषधं खरेदी करतो तेव्हा त्याच्यावरची एक्स्पायरी तारीख (Medicine Expiry Date) आवर्जून बघतो. एक्स्पायरी डेट म्हणजे त्या ठरावीक तारखेनंतर औषध वापरू नये, असा संकेत असतो. आता ही एक्स्पायरी तारीख (Expiry Date) म्हणजे अफवा असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे आणि अशा व्यक्ती अक्षरश: दोन तीन वर्षं जुनी औषधंही घेतात. ही एक्स्पायरी तारीख म्हणजे नेमकं काय असतं, ती उलटून गेली तर औषधांमध्ये काही बदल होतात का, हे जाणून घेऊ या. कोणतंही औषध (Medicine) एक्स्पायर होतं म्हणजे नेमकं काय होतं हे जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही औषध किंवा आरोग्याशी संबंधित एखादा पदार्थ यांपैकी काहीही घेतलंत, तर त्यावर तुम्हाला दोन तारखा स्पष्ट दिसतील. एक त्या औषधाची किंवा पदार्थाची उत्पादन तारीख म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग डेट (Manufacturing Date) असते. म्हणजेच त्या दिवशी हे औषध किंवा ते उत्पादन तयार झालं. दुसरी तारीख असते एक्स्पायरी डेट. म्हणजेच त्या तारखेनंतर या औषधाचा परिणाम होईलच याची गॅरंटी ती औषधनिर्मिती करणारी कंपनी घेणार नाही. औषधं म्हणजे कोणत्यातरी प्रकारची रसायनं (Chemical) असतात. ठरावीक काळ गेल्यानंतर सर्वच केमिकल पदार्थांचा प्रभाव कमी जास्त होतो. तसंच औषधांच्या बाबतीतही घडतं. हवा, ऊन, दमटपणा या सगळ्यामुळे अनेकदा औषधांचा प्रभाव कमी होऊ लागतो. अर्थातच यामुळे त्याचे वाईट परिणाम म्हणजेच साइड इफेक्ट्सही होतात. त्यामुळेच काद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्या त्या उत्पादनांवर त्याची उपयुक्तता कधी संपणार याची एक ठरावीक तारीख देतात. AMA या अमेरिकेतल्या वैद्यकीय संस्थेनं 2001 मध्ये एक संशोधन केलं. त्यामध्ये 122 विविध प्रकारच्या औषधांच्या 3000 बॅचेसच्या स्थिरतेची चाचणी केली. या स्थिरतेच्या आधारावर AMA नं सुमारे 88 % औषधांची एक्स्पायरी डेट जवळपास 66 महिन्यांनी वाढवली. बहुतेक औषधांवर छापलेल्या एक्स्पायरी डेटनंतरही त्या औषधांची परिणामकारकता शिल्लक असते, असा याचा अर्थ होतो. अॅमोक्सिसिलिन, सिप्रोफ्लोक्सॅसिन, मॉर्फिन सल्फेट अशा औषधांचा यात समावेश होता. 18% औषधांना त्यांच्या एक्स्पायरी तारखेलाच फेकून देण्यात आलं. एक्स्पायरीनंतरही औषधं घेतली जाऊ शकतात का? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही; मात्र हे औषध जर कॅप्सुल किंवा टॅब्लेटच्या म्हणजे गोळीच्या स्वरूपात असलं तर त्याचा प्रभाव एक्स्पायरी डेटनंतरही काही दिवस राहू शकतो; मात्र सिरप, डोळे किंवा कानात घालायचे ड्रॉप्स आणि इंजेक्शन्स मात्र त्यांच्या एक्स्पायरी डेटनंतर वापरू नयेत. एक्स्पायरी तारीख उलटल्यानंतर काही औषधांमध्ये विष तयार होतं असंही म्हटलं जातं. मेडिकल असोसिएशननं अशी काही औषधं सांगितली आहेत, जी एक्स्पायरी तारीख उलटल्यानंतर अजिबातच घेऊ नयेत. डायबेटिसच्या पेशंटसाठी अत्यावश्यक असलेलं औषध तारीख उलटल्यानंतर खराब होतं. हृदयरोग असलेल्यांना जे औषध दिलं जातं ते एक औषध एकदा उघडलं की त्याचा परिणाम लवकरच संपतो. रक्तासाठी दिली जाणारी किंवा अन्य लशी अशी औषधं ठराविक काळानंतर वापरू नयेत. डोळ्यांत घालायच्या ड्रॉप्समध्ये (Eye Drops) किंवा अन्य कोणत्याही औषधाच्या बाटलीवर जर तुम्हाला पांढऱ्या कापसासारखं काही जमा झालं असलेलं दिसलं तर लगेचच ते औषध फेकून द्यावं. अनेकदा आपण इंटरनेटवर वाचून काही औषधं स्वत:च्या मनानंच घेतो. आजारपणाशी संबंधित अनेक निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायही अनेकदा घेतो. हे अत्यंत चुकीचं आहे. कोणत्याही औषधाबद्दल तुम्हाला थोडा जरी संशय आला, तर ते ताबडतोब फेकून द्या. एकवेळ पैशाचं थोडं नुकसान झालं तरी चालेल; पण जीव मात्र वाचेल.
First published:

Tags: Medicine

पुढील बातम्या