मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर?

Explained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर?

कोरोना विषाणूच्या साथीने देशात हाहाकार (Corona Pandemic) माजवला आहे. अनेक ठिकाणी हॉस्पिटल्समध्ये बेड्सची, रेमडेसिवीर इंजेक्शनची तर काही ठिकाणी व्हेंटिलेटर्सची कमतरता भासत असल्याच्या बातम्या येत आहेत.

कोरोना विषाणूच्या साथीने देशात हाहाकार (Corona Pandemic) माजवला आहे. अनेक ठिकाणी हॉस्पिटल्समध्ये बेड्सची, रेमडेसिवीर इंजेक्शनची तर काही ठिकाणी व्हेंटिलेटर्सची कमतरता भासत असल्याच्या बातम्या येत आहेत.

कोरोना विषाणूच्या साथीने देशात हाहाकार (Corona Pandemic) माजवला आहे. अनेक ठिकाणी हॉस्पिटल्समध्ये बेड्सची, रेमडेसिवीर इंजेक्शनची तर काही ठिकाणी व्हेंटिलेटर्सची कमतरता भासत असल्याच्या बातम्या येत आहेत.

    कोरोना विषाणूच्या साथीने देशात हाहाकार (Corona Pandemic) माजवला आहे. अनेक ठिकाणी हॉस्पिटल्समध्ये बेड्सची, रेमडेसिवीर इंजेक्शनची तर काही ठिकाणी व्हेंटिलेटर्सची कमतरता भासत असल्याच्या बातम्या येत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळीही व्हेंटिलेटर्सची कमतरता अनेक ठिकाणी जाणवत होती. हे जीवरक्षक उपकरण कोरोनाच्या रुग्णांना कशा प्रकारे उपयुक्त ठरतं, तसंच याला पर्याय शोधण्याबद्दल शास्त्रज्ञ काय प्रयत्न करत आहेत, याबद्दलचीमाहिती घेऊ या.

    व्हेंटिलेटर म्हणजे काय?

    एखाद्या रुग्णाच्या शरीरात जेव्हा स्वतःहून श्वास घेण्याएवढीही शक्ती राहत नाही, तेव्हा त्याला श्वास घेण्यासाठी मदत करण्याकरिता जे उपकरण वापरलं जातं, त्याला व्हेंटिलेटर म्हणतात. व्हेंटिलेटर दोन प्रकारचे असतात. एक मेकॅनिकल व्हेंटिलेटर आणि दुसरा नॉन इन्व्हॅसिव्ह व्हेंटिलेटर. हॉस्पिटलमध्ये आपण अतिदक्षता विभागात जो व्हेंटिलेटर पाहतो, तो सहसा मेकॅनिकल व्हेंटिलेटर (Mechanical Ventilator) असतो. तो एका ट्यूबद्वारे श्वास नलिकेशी जोडला जातो. हा व्हेंटिलेटर माणसाच्या फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतो. तसंच, तो कार्बन डाय ऑक्साइड शरीराबाहेर काढण्याचं कामही करतो.  नॉन इव्हॅसिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive Ventilator) श्वासनलिकेशी जोडला जात नाही. त्यात तोंड आणि नाक झाकून ऑक्सिजन फुप्फुसांपर्यंत (Lungs) पोहोचवला जातो.

    व्हेंटिलेटरचा वापर कधीपासून होतोय?

    व्हेंटिलेटरचा इतिहास सुरू होतो1930 च्या दशकाच्या आसपास. त्या वेळी याला आयर्न लंग(Iron Lung)असं नाव देण्यात आलं होतं. तेव्हा पोलिओमुळे जगभरात अनेकांचे प्राण गेले होते. तेव्हा त्यात फार सुविधांचा अंतर्भाव नव्हता. काळानुसार व्हेंटिलेटरमध्ये सुधारणा होत गेल्या आणि अधिकाधिक सुविधा त्यात उपलब्ध होतगेल्या.  कोणाला आवश्यकता? जे रुग्ण स्वतःहून श्वास घेऊ शकत नाहीत, खासकरून जे अतिदक्षता विभागात असतात, त्यांना व्हेंटिलेटरच्या साह्याने श्वास दिला जातो. या प्रक्रियेदरम्यान रुग्णाला आधी भूल (Anaesthecia) दिली जाते. त्यानंतर गळ्यात एक ट्यूब टाकली जाते. त्या ट्यूबद्वारे ऑक्सिजन (Oxygen) आत जातो आणि कार्बन डाय ऑक्साइड (Carbon Di Oxide) बाहेर येतो. हे उपकरण लावल्यानंतर रुग्णाला श्वास घेण्यासाठी स्वतःला काही प्रयत्न करावे लागत नाहीत. साधारणतः व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या 40 ते 50 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो; मात्र कोरोनाच्या बाबतीतशास्त्रज्ञांनी याबद्दलचा काही ठोस निष्कर्ष अद्याप काढलेला नाही.

    हे ही वाचा-कोरोनाचा ताण दूर करा! 'या' देशात पर्यटकांचं लसीकरण, सरकारकडून नवी योजना

    व्हेंटिलेटरमुळे त्रास होतो?

    असं मानलं जातं,की एका ठरावीक कालावधीनंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या रुग्णाला त्रास होऊ लागतो. कारण या प्रक्रियेत फुप्फुसात एका छोट्या छिद्रातून खूप शक्तीने ऑक्सिजन आत पाठवला जातो. तसंच, व्हेंटिलेटर लावण्याच्या प्रक्रियेदरम्यान न्यूरोमस्क्युलर ब्लॉकरही (Neuromuscular Blocker)दिला जातो. त्याचे दुष्परिणाम वेगळेच आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवलेलं असतानाच रुग्णाला औषधंही दिली जातात, जेणे करून शरीरातल्या विषाणूचं प्रमाण कमी होऊ शकेल आणि रुग्णाची फुप्फुसं व्हेंटिलेटरशिवाय काम करू शकतील.

    पर्याय?

    कोणत्याही देशात किंवा हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर मर्यादित संख्येतच असतात. त्यामुळे 2020 मध्ये जेव्हा व्हेंटिलेटर्सचा तुटवडा भासू लागला, तेव्हापासूनच शास्त्रज्ञ पर्यायी व्यवस्थेबद्दल विचार करत आहेत. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी श्वास घेण्यास मदत होण्यासाठी एक नवं उपकरण तयार केलं असून, त्याला C-pap डिव्हाइस असं नाव देण्यात आलं आहे.

    सी-पॅपचं काम कसं चालतं?

    हे ऑक्सिजन मास्क आणि व्हेंटिलेटर यांच्या मधलं उपकरण आहे. या मशीनच्या माध्यमातून रुग्णाच्या ऑक्सिजन मास्कमध्ये ऑक्सिजन आणि हवा यांचं मिश्रण पोहोचतं. तोंडातूनच फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजनची आवश्यक तेवढी मात्रा पोहोचवली जाते. त्यानंतर रुग्ण स्वतःच कार्बन डाय ऑक्साइड बाहेर सोडू शकतो. त्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे सी-पॅप हे उपकरण तुलनेनेबरी प्रकृती असलेल्या आणि तरुण रुग्णांसाठी वापरता येऊ शकतं. अर्थात, सध्यातरी याचे प्रयोगच सुरू असून,तेही दुसऱ्या देशांत सुरू आहेत. भारतातल्यात्याच्या वापराबद्दल अद्याप काही माहिती मिळालेली नाही.

    First published:
    top videos