Home /News /explainer /

Explainer: स्वत:चं घर घेण्याचा विचार करताय? हिच आहे योग्य वेळ; जाणून घ्या महत्त्वाची कारणं

Explainer: स्वत:चं घर घेण्याचा विचार करताय? हिच आहे योग्य वेळ; जाणून घ्या महत्त्वाची कारणं

अनेकांनी घर (Planning to buy home), वाहन अशा मोठ्या खरेदीचे कोरोनामुळे स्थगित केलेले बेत आता अंमलात आणण्याच्या दृष्टीनं पुढे पावलं टाकायला सुरुवात केली आहे. तुम्ही देखील अशी योजना आखत असाल तर सध्याची वेळ योग्य आहे..

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर: गेल्या दीड वर्षापासून कोरोना साथीच्या (Corona Pandemic) महाभयानक संकटाचा सामना करणारं जग आता पुन्हा पूर्वपदावर येत आहे. जनजीवन सुरळीत होत आहे. कोरोना काळात ठप्प झालेले अनेक व्यवसाय पुन्हा नवी झेप घेण्यास सज्ज होत आहेत. समाजातली भीती, तणाव दूर होऊन उत्साहाचं वातावरण निर्माण होत आहे. अर्थव्यवस्था (Economy during Coronavirus) रुळावर येत असल्यानं आर्थिक उलाढाली वाढत आहेत. अनेकांनी घर (Planning to buy home), वाहन अशा मोठ्या खरेदीचे कोरोनामुळे स्थगित केलेले बेत आता अंमलात आणण्याच्या दृष्टीनं पुढे पावलं टाकायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या अनेक व्यवसायांना चालना देण्यासाठी सरकारही विविध उपाय राबवत आहे. त्यामुळे बाजारपेठेत मागणी आणि पुरवठ्याचं गणित पुन्हा एकदा पूर्ववत होऊ लागलं असून, रिअल इस्टेट क्षेत्रासाठी (Real Estate News) अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवणाऱ्या या उद्योगाला गती मिळाली आहे. ही परिस्थिती ग्राहकांच्या दृष्टीनंदेखील अनुकूल आहे का, यावर इंडियन एक्स्प्रेसमधल्या लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे. हे वाचा-Home Loan साठी अप्लाय करताना अजिबात विसरू नका हे 6 मुद्दे, सहजपणे मिळेल कर्ज का वाढतेय मोठ्या घरांची मागणी? कोरोनाच्या साथीमुळे अनेक उद्योगांना फटका बसला. त्यात रिअल इस्टेट क्षेत्राचाही समावेश आहे; पण कोरोनामुळे या क्षेत्रातल्या मोठ्या घरांची मागणी (Demand for big houses) वाढण्यासही मदत झाली असल्याचं निदर्शनास आलं आहे. कारण कोरोना काळात घरी बसून काम करण्याची परवानगी (Work From Home due to COVID-19) अनेक कंपन्यांनी दिली. विशेषतः आयटी आणि इतर सेवा क्षेत्रातल्या कंपन्यांनी असं केलं. त्यामुळे एरवी कमी काळ घरी असणारे लोक चोवीस तास घरात राहू लागले. पती-पत्नी दोघेही काम करत असतील तर कामासाठी त्यांना स्वतंत्र जागांची गरज भासू लागली. मुलांच्या शाळाही ऑनलाइन असल्याने मोठ्या घराची निकड निर्माण झाली. अनेक लोक भाडेतत्त्वावरच्या घरात राहत होते. त्यांनाही स्वतःच्या घराची आवश्यकता वाटत आहे. त्यामुळे प्रामुख्यानं मोठ्या शहरांमध्ये नागरिक मोठ्या घरांची खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. कामाच्या ठिकाणापासून किंवा मध्यवर्ती ठिकाणापासून दूर असलं, तरीही मोठं घर खरेदी करण्याकडे कल वाढला असल्याचं निरीक्षण एका आघाडीच्या गृहनिर्माण उद्योगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदवलं आहे. हे वाचा-या राज्यात आहेत सर्वाधिक कुलुपबंद घरं; निसर्गरम्य असूनही काय आहे कारण? घरखरेदीसाठी मिळतायंत विविध ऑफर्स दरम्यान, कोरोना काळात गृहखरेदीला चालना देण्यासाठी सरकारनं अनेक सवलती जाहीर केल्या. राज्य सरकारनं मुद्रांक शुल्कात (Government reduced Stamp Duty) कपात केली, तर बँकांनीही (Bank's offers on Home Loan) कर्ज व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने कर्जाचे व्याजदर (Interest Rates on Home Loan) कमी केले. त्यामुळे सध्या नवीन गृहकर्जांची मागणी वाढत आहे. तसंच विकसकांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलती देऊ केल्या. यामुळे कोविड -19 च्या पहिल्या लाटेनंतर (Covid -19 First Wave) ऑक्टोबर 2020 आणि मार्च 2021 या दोन तिमाहीत घरांच्या मागणीत प्रचंड वाढ दिसून आली. कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर मात्र परिस्थिती बिघडली. जून 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत घरांची मागणी मंदावली. यानंतर गेल्या काही महिन्यांतला लसीकरणाचा वाढता वेग, अर्थव्यवस्थेतली सुधारणा आणि बाजारपेठेत आर्थिक उलाढाली वाढल्यामुळे पुन्हा एकदा घरांच्या मागणीला चालना मिळाली आहे. हे वाचा-Air Indiaचं झालं खासगीकरण, 68 वर्षानंतर पुन्हा TATA ची झाली एअर इंडिया- Report परिणामी काही शहरांमध्ये घरांच्या किमती वाढल्याचं दिसून आलं आहे. नॅशनल हाउसिंग बँकेने (NHB) केलेल्या घरांच्या किमतीच्या तिमाही सर्वेक्षणावर आधारित रेसिडेक्स या निर्देशांकानुसार, दिल्लीमध्ये डिसेंबर 2020 मध्ये किमतीचा निर्देशांक 91 वरून मार्च 2021 मध्ये 95 झाला, तर नोएडामध्ये तो 104 वरून 108 वर गेला. बेंगळुरूमध्ये रेसिडेक्स 116 वरून 118 पर्यंत वाढल्याचं दिसून आलं. मुंबईत मात्र या निर्देशांकात अल्पशी घसरण दिसून आली. तिथं हा निर्देशांक 106 वरून 105 वर आला. नवी मुंबईत मात्र तो 107 वरून 118 वर गेला. यावरून नागरिक मोठ्या घरांच्या शोधात मध्यवर्ती ठिकाणापासून दूर जाण्यास तयार असल्याचंही स्पष्ट होतं. सध्या बँकांनी कमी केलेले कर्जाचे व्याजदर, विकसकांकडून (Developers are giving offers while buying houses/flats) मिळणाऱ्या सवलती यामुळे घरांची मागणी वाढत असल्याने आता किमती वाढण्याची शंका ग्राहकांना सतावत आहे. त्यामुळे आता घर घेण्यासाठी पुढं पाऊल टाकावं की नको, घर घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे का, असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे; मात्र तज्ज्ञांच्या मते, आता लगेच घरांच्या किमती वाढणार नाहीत. कारण विक्रीअभावी पडून राहिलेल्या घरांची संख्या मोठी आहे आणि नवीन घरांच्या निर्मितीचा वेग तुलनेत कमी आहे. त्यामुळे विकसक घरांची विक्री वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत असून, जेणेकरून खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण होईल. हे वाचा-सणासुदीत SBI ची ग्राहकांसाठी खास ऑफर; खरेदीवर 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि... इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, एचएफसीच्या (HFC) अधिकाऱ्यानेही या मताला दुजोरा दिला असून, बाजारात पुरेसा पुरवठा असल्यानं मालमत्तेच्या किमती लगेच वाढण्याची शक्यता नसल्याचं नमूद केलं आहे. बांधकाम क्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुरवठा वेगात होत असतो. कच्च्या मालाच्या किमती आणि मजुरी वाढल्याने किमतींमध्ये 10 ते 15 टक्के वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. लिआसेस फोरास रिअल इस्टेट रेटिंग आणि रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि एमडी पंकज कपूर यांच्या मते, आता घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही अगदी योग्य वेळ आहे. कारण सध्या उपलब्ध घरांची संख्या मोठी असल्यानं किमती वाढण्याची शक्यता कमी आहे. मार्च 2021 च्या अखेरीस कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर विक्रीत घट झाल्यावर, विक्रीअभावी पडून असलेल्या घरांची संख्या (इन्व्हेटरी) 42 महिने पुरेल इतक्या साठ्यावरून 48 महिने पुरेल इतकी वाढली आहे. सध्या 60 शहरांमध्ये विक्री न झालेल्या घरांची संख्या साधारण 12.5 लाख इतकी आहे. पुरवठा मुबलक असल्याने सध्या या बाजारपेठेत ग्राहकांचा वरचष्मा (Buyer’s Market) राहणार आहे. विकसकदेखील रोख भांडवलाचा प्रवाह वाढवण्यासाठी विक्री वाढवण्याच्या विचारात आहेत. कारण सध्या नवीन बांधकामाचा वेग 40 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे आहे ती घरं विकण्यावरच भर देण्यात येत आहे. त्यामुळे ते आकर्षक सवलती देत आहेत. कर्जाचे व्याजदर आकर्षक आहेत. त्यामुळे कर्जाचा हप्ता कमी झाला आहे. ही सगळी परिस्थिती ग्राहकांसाठी अनुकूल आहे. ग्राहकांनी सध्या तयार म्हणजे रेडी टू मूव्ह घरांना प्राधान्य देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सध्या गुंतवणुकीपेक्षा स्वतःच्या वापरासाठी घर खरेदी करणं अधिक महत्त्वाचं आहे, असा सल्ला कपूर यांनी दिला आहे. हे वाचा-ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहणार बँका, लवकर पूर्ण करा महत्त्वाची कामं दरम्यान, सध्या शेअर बाजारात तेजी असल्याने रिअल इस्टेट शेअर्समध्येही (Real Estate Shares) मोठी वाढ झाली आहे. महानगरांमध्ये ब्लू चिप रिअल इस्टेट कंपन्यांनी केलेल्या जोरदार विक्रीमुळे निफ्टी रिअॅल्टी इंडेक्स मे 2020 मध्ये 160वरून सप्टेंबर 2021 मध्ये 525 वर आला आहे. रिअल इस्टेट समभागांमध्ये गुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट किंवा थेट शेअर्समध्ये गुंतवणूकही लाभदायी ठरेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. एकंदर सध्या घर घेण्यासाठी योग्य वेळ असल्यानं अनेकांचं गृह खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
First published:

Tags: Home Loan, Instant loans

पुढील बातम्या