मराठी बातम्या /बातम्या /explainer /

संशोधनातून मान्सूनबाबत धोकादायक संकेत; Global Warming चा असाही होणार परिणाम

संशोधनातून मान्सूनबाबत धोकादायक संकेत; Global Warming चा असाही होणार परिणाम

माणसाचे निसर्गाला हानिकारक ठरणारे वर्तनही वातावरणातील घातक वायूंचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरत असून, मान्सूनचं चित्र बदललेले असेल असा निष्कर्ष पुढं आला आहे.

माणसाचे निसर्गाला हानिकारक ठरणारे वर्तनही वातावरणातील घातक वायूंचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरत असून, मान्सूनचं चित्र बदललेले असेल असा निष्कर्ष पुढं आला आहे.

माणसाचे निसर्गाला हानिकारक ठरणारे वर्तनही वातावरणातील घातक वायूंचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरत असून, मान्सूनचं चित्र बदललेले असेल असा निष्कर्ष पुढं आला आहे.

    नवी दिल्ली, 6 जून : नेमेचि येतो मग पावसाळा ही उक्ती सगळ्यांनाच माहित आहे. वर्षानुवर्षे आपण ठराविक काळात ठरविक ऋतू असं चक्र अनुभवतो आहोत, त्यामुळं दरवर्षी जून महिना आला की आता पावसाळा सुरू होणार असं पक्क गणित सर्वांच्याच मनात असतं; पण गेल्या काही वर्षात हे वेळापत्रक बदलत असल्याचं जाणवत आहे. त्यामुळं दरवर्षी साधारण एक जूनला मान्सून अंदमान निकोबारमध्ये येणार मग केरळमध्ये आणि पुढे मग देशभरात बरसणार आणि सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला लागणार असं जे ठाम समीकरण होतं ते आता बदलणार आहे. इकोनॉमिक टाईम्स डॉट इंडिया टाईम्स डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील हवामान विभागानेही काही वर्षांच्या अभ्यासावरून या महत्त्वपूर्ण बदलाचे संकेत दिले आहेत. जून ते सप्टेंबर हे मान्सूनचं (Monsoon) अधिकृत वेळापत्रकच बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापुढील काळात भारतातील मान्सून अधिक बेभरवशाचा, घातक, अती पावसाचा असेल असं एका संशोधनातून पुढं आलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) अर्थात जागतिक हवामान बदलाचा हा परिणाम असल्याचं शास्त्रज्ञांनी यापूर्वीच सूचित केलं होतं. कधी उन्हाळ्यातच दाखल होणारा, कधी उशीरा येणारा असं हे  मान्सूनचं बदलेले वर्तन हा वातावरण बदलाचा परिपाक असल्याचं शास्त्रज्ञांनी आधीच सांगितले आहे. हे ही वाचा-खूशखबर! वेळेआधीच वरुणराजा राज्यात दाखल; मुंबई, पुण्यात कधी पोहोचणार? संपूर्ण दक्षिण आशियासाठी (South Asia) महत्त्वाचा ठरणारा मान्सून हा इथल्या कृषी आधारीत अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. यावर शेतीची कामे अवलंबून असतात. शेती, त्याच्याशी निगडीत कामे, उद्योगधंदे असं चक्रच यावर आधारलेले असते. यात गडबड झाली की पुढचे सगळे गणित बिघडते. त्यामुळे मान्सूनचे वेळापत्रक किती महत्त्वाचे आहे याचा अंदाज येईल. मान्सूनचे बिघडलेले वेळापत्रक या सगळ्या प्रदेशाची रचनाच बदलवू शकते. अत्यंत गंभीर अशी ही स्थिती असून, त्यानुसार नवीन वेळापत्रक तयार करण्याच्या दिशेनं हवामान खातं अभ्यास करत आहे. या प्रदेशात गेल्या शेकडो वर्षांत झालेल्या मान्सूनच्या अभ्यासावरून मान्सून कधी येणार आणि कधी जाणार याचे आडाखे बांधण्यात आले होते. त्यावर आधारीत अभ्यासानुसार, दरवर्षी मान्सूनचा अंदाज वर्तवला जातो. शास्त्रज्ञ हे आडाखे बांधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा अभ्यास करतात. नुकत्याच सायन्स अॅडव्हान्सेस जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनासाठी शास्त्रज्ञानी बंगालच्या उपसागरातील (Bay of Bengal) खोलवर असलेल्या चिखलाच्या (MUD) नमुन्यांचा अभ्यास केला. त्यातून पुढं आलेली ही माहिती आपल्या ग्रहाचा लाखो वर्षांचा इतिहास दर्शवणारी आहे. मानवी कृत्यांचे ठसे निसर्गावर कसे कायमस्वरूपी उमटतात याचं दर्शन घडवणारा आणि पुढील दृष्टीनं आखणी करण्यास मदत करणारा हा महत्त्वाचा अभ्यास आहे असं मत जर्मनीतील पॉटसडॅम इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर आंद्रेस लिव्हरमन यांनी म्हटलं आहे. शास्त्रज्ञानी बंगालच्या उपसागरातील खोलवर असलेल्या चिखलाच्या नमुन्यांतील जीवाश्मांचा अभ्यास केल्यावर इथल्या पाण्यातील क्षारांचे कमी झालेलं प्रमाण आणि अती पाऊस वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडचं प्रमाण वाढल्यानंतर निर्माण झाल्याचं लक्षात आलं. जागतिक पातळीवर बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे आर्द्रतायुक्त वाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे,असा निष्कर्ष या संशोधनात नोंदवण्यात आला आहे. माणसाचे निसर्गाला हानिकारक ठरणारे वर्तनही वातावरणातील घातक वायूंचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरत असून, मान्सूनचं चित्र बदललेले असेल असा निष्कर्ष पुढं आला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Monsoon, Rain

    पुढील बातम्या