ओस्लो, 29 जानेवारी : जागतिक आरोग्य संघटना (WHO) अजूनही कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) उत्पत्तीचा शोध घेत आहेत. प्रथम हा विषाणू चीनमधून उद्भवला आणि नंतर जगातील इतर देशांमध्ये पसरला आहे. व्हायरसच्या प्रसारावरही सुरुवातीपासून लक्ष ठेवले जात आहे. आता नव्या तपासणीच्या निकालांनी जगभरात खळबळ माजवली आहे, या अभ्यासानुसार कोविड-19 युरोपमध्ये (Europe) पहिला केस नोंदवण्यापूर्वीच नॉर्वेमध्ये पोहोचला होता. संशोधकांना असे आढळून आले आहे की कोविड-19 च्या अँटीबॉडी नॉर्वेमध्ये डिसेंबर 2019 मध्येच विकसित झाल्या आहेत. तर युरोपमध्ये कोविड-19 चा पहिला संसर्ग त्यानंतर एक महिन्यानंतरच आढळून आला होता.
धक्कादायक गोष्ट
आहूस येथील अकेशचस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील संशोधकांच्या टीमने अलीकडेच त्यांच्या अभ्यासात ही आश्चर्यकारक गोष्ट शोधून काढली आहे. ते म्हणतात की या नवीन शोधामुळे जगातील कोरोना विषाणू महामारीचा इतिहास बदलू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, 31 डिसेंबर 2019 रोजी, हुबेई प्रांतातील वुहानमध्ये न्यूमोनियाचे अनेक रुग्ण आढळल्याचे चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी जगाला सांगितले होते.
आधी चीन मग युरोप
या आधारे चीनमधूनच नॉव्हेल कोरोना विषाणूचा संसर्ग ओळखला गेला. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये कोविड-19 चे पहिले प्रकरण युरोपमध्ये आढळून आले. नॉर्वेमध्ये त्याच वर्षी 24 फेब्रुवारीपर्यंत विषाणूचा प्रसार झाला नसल्याचे अहवालात म्हटले आहे. पण आहूसच्या संशोधकांच्या तपासणीत ही विचित्र माहिती समोर आली आहे.
कशी मिळाली माहिती?
जागतिक वृत्तसंस्था स्पुतनिक इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, संशोधकांचा शोध त्याच काळाचा आहे, जेव्हा चीनमध्ये पहिले प्रमाणित प्रकरण सापडले होते. या अभ्यासात, संशोधकांनी पूर्व-संकलित रक्त नमुन्यांमध्ये अँटीबॉडीज शोधले. हे नमुने त्या वेळी गर्भवती महिलेकडून घेण्यात आले होते आणि संसर्गजन्य रोगाच्या चाचणीसाठी साठवले गेले होते.
कोरोना संक्रमित आईकडून स्तनपानातून बाळाला संसर्ग होऊ शकतो का?
गांभीर्याने घेणे आवश्यक
त्यावेळी घेतलेल्या 6520 नमुन्यांपैकी 98 नमुन्यांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की काही प्रकरणांमध्ये चुकीचे पॉझिटिव्ह निकाल लागल्यानंतरही या तपासणीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आहुसचे प्रोजेक्ट मॅनेजर सांगतात की, ही प्रकरणे परदेशात संक्रमित झाल्याचे अनेक संकेत आहेत.
असे कोणतेही अभ्यास नाहीत
संशोधकांचे म्हणणे आहे की हे परिणाम दर्शवितात की संसर्ग आधीच जगाच्या मोठ्या भागात पसरला होता. असे काहीच देश असतील ज्यांनी त्यांच्या लोकसंख्येच्या पातळीवर रक्ताचे नमुने गोळा केले असतील. म्हणूनच असे अभ्यास एकतर नाहीत किंवा फारच कमी आहेत.
आधीच पसरला असेल
कोरोना विषाणू इटलीमध्ये समजण्यापेक्षा आधीच पसरला होता. नोव्हेंबर 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने असे सांगितले की नवीन कोरोना विषाणू चीनच्या वुहानमध्ये उद्रेक होण्यापूर्वी अज्ञात होता. मात्र, हे देखील शक्य आहे की हा विषाणू गुप्तपणे इतरत्र पसरला असावा. इटलीमध्ये 21 फेब्रुवारी 2019 रोजी मिलान एका छोट्या गावात पहिले प्रकरण आढळले होते.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, इटलीमध्ये सप्टेंबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत अनेक निरोगी लोक ज्यांनी फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी नोंदणी केली होती, त्यांनी कोरोना विषाणूसाठी अँटीबॉडीज विकसित केल्याचे आढळले. कोविड संसर्गाच्या तपासणीत लक्षणे नसलेल्या संसर्गांना किती गांभीर्याने घेतले गेले यावर या अभ्यासाने प्रश्न उपस्थित केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.