Home /News /explainer /

महिलांच्या तुलनेत परिस्थितीपुढे लवकर हार मानतात पुरुष; आत्महत्येची आकडेवारी पाहून व्हाल हैराण

महिलांच्या तुलनेत परिस्थितीपुढे लवकर हार मानतात पुरुष; आत्महत्येची आकडेवारी पाहून व्हाल हैराण

पुरुषांच्या तुलनेत महिला मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम असल्याचंही स्पष्ट झालं आहे. सहानुभूती, लढण्याची प्रवृत्ती यामुळे महिला आपली मानसिक स्थिती कणखर करण्यात यशस्वी होत आहेत

नवी दिल्ली 11 सप्टेंबर : कुटुंबप्रमुख म्हणून अनेक घरांतल्या अन्य सदस्यांची जबाबदारी कर्त्या पुरुषावर (Men) असते. बऱ्याच ठिकाणी कार्यक्षेत्रातही पुरुषांना अधिक महत्त्व दिलं जातं. परंतु, या सर्व जबाबदाऱ्यांचा परिणाम पुरुषांच्या मानसिकतेवर होत असल्याचं दिसून आलं आहे. वाढत्या जबाबदाऱ्या आणि ताण-तणावाचा सामना करण्यात अपयश येत असल्यानं पुरुषांमध्ये आत्महत्येचं (Suicide) प्रमाण वाढल्याचं एका आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. नुकताच (10 सप्टेंबर) जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन (World Suicide Prevention Day) पार पडला. या पार्श्वभूमीवर ही स्थिती चिंताजनक म्हणता येईल. पुरुषांच्या तुलनेत महिला मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम असल्याचंही स्पष्ट झालं आहे. सहानुभूती, लढण्याची प्रवृत्ती यामुळे महिला आपली मानसिक स्थिती कणखर करण्यात यशस्वी होत आहेत. त्यामुळे महिलांनी या कारणासाठी आत्महत्या करण्याचं पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. यास जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) दुजोरा दिला आहे. याबाबतचं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने दिलं आहे. सर्वात कमी बजेटमध्ये करा लडाख सहल? कसं वाचा मग सविस्तर आपण मजबूत असल्याचं सर्वांसमोर दर्शवणारे पुरुष अनेक कारणांमुळे मनातून खचतात. त्याचं पर्यवसान आत्महत्येत होतं. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये या कारणासाठी आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे. सरासरी एक लाख पुरुषांमध्ये दर वर्षी 12 पुरुष विविध मानसिक कारणांमुळे आत्महत्या करतात, तर एक लाख महिलांमध्ये हेच प्रमाण 5 इतकं असल्याचं एका आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, डिप्रेशन (Depression) हे यामागचं प्रमुख कारण आहे. जगातले 30 कोटी नागरिक डिप्रेशनला, तर सुमारे 25 कोटी नागरिक तणावाला (Stress) सामोरे जात आहेत. दररोज आत्महत्येमुळं होणाऱ्या 100 मृत्यूंपैकी एका व्यक्तीच्या मृत्यूचं कारण डिप्रेशन हे असतं. हा आकडा युद्धात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या तुलनेतही अधिक असून, एचआयव्ही एड्स, मलेरियासारख्या आजारांमुळेही मृत्यूचं प्रमाण इतकं नाही. आपण 15 ते 29 या वयोगटातल्या तरुणांच्या मृत्यूची कारणं पाहिली तर आत्महत्या हे या वयोगटातल्या तरुणांच्या मृत्यूचं चौथं कारण असल्याचं दिसून येईल. या वयोगटात, रस्ते अपघातात जास्त मृत्यू होतात. त्यानंतर मृत्यूचं सर्वांत मोठं कारण टीबी (TB) हा आजार, तर मृत्यूचं तिसऱ्या क्रमाकांवरचं कारण परस्परांतली हिंसा हे आहे. विमा लोकपाल परिषद महाराष्ट्र इथे 'या' पदाच्या 49 जागांसाठी भरती; 40 हजार पगार डिप्रेशनमुळे होणाऱ्या आत्महत्या रोखणं शक्य आहे. कोणी व्यक्ती अचानक आत्महत्या करण्याविषयी बोलू लागली तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. एखादी व्यक्ती आपली राहिलेली कामं किंवा देणं वेगानं पूर्ण करू लागली, वारसपत्र तयार करू लागली किंवा त्याविषयी सातत्यानं बोलू लागली तर त्या व्यक्तीकडं लक्ष द्यावं. अचानक एखाद्या व्यक्तीनं बोलणं कमी केलं, सातत्यानं त्याचा मूड बदलू लागला, अचानक बोलणं बंद केलं, मित्रांपासून दूर राहू लागली तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. अशा व्यक्तीला मदतीची गरज आहे असं समजावं. अशा व्यक्तींना काही मानसिक आजार असेल तर त्यावर इलाज करावा. या व्यक्ती एकट्या राहणार नाहीत, सातत्यानं बोलतील याकडं लक्ष द्यावं. पुरुषांच्या आत्महत्येच्या प्रमाणाचा विचार करता, भारतातली स्थिती काही वेगळी नाही. भारतातल्या आत्महत्येच्या एकूण प्रकरणांपैकी 70 टक्के प्रकरणांमध्ये पुरुषांनी तर 30 टक्के प्रकरणांमध्ये महिलांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट होतं. 2019 मध्ये जगभरातल्या 7 लाख जणांनी आत्महत्या केली. त्यात दीड लाख जण हे भारतातले होते. भारतात आत्महत्येच्या आकडेवारीची नोंद नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) करते. ही आकडेवारी सप्टेंबर 2020मध्ये जाहीर करण्यात आली आहे. यानुसार भारतात दर वर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 10.4 टक्के जणांच्या मृत्यूचं कारण आत्महत्या हे आहे. भारतात दररोज सुमारे 381 आत्महत्या होतात. कोरोनातून बरं झालेल्यांच्या किडनीवर होतायेत गंभीर परिणाम? संशोधनातून माहिती समोर 2019मध्ये 1 लाख 40 हजार भारतीयांनी आत्महत्या केली. त्यापैकी 93 हजार म्हणजेच 67 टक्के जणांचं वय 18 ते 45 वर्षांदरम्यान होतं. नात्यांमधला सूक्ष्म संघर्ष हे यामागचं प्रमुख कारण असल्याचं दिसून येतं. नात्यांमुळे आलेलं डिप्रेशन आणि डिप्रेशनमुळं आलेलं एकटेपण या चक्रव्यूहात अडकल्यानं नागरिक आत्महत्या करत असल्याचं दिसतं. एका आकडेवारीनुसार, 34 टक्के नागरिक कौटुंबिक कलहाला ( Family Problems) कंटाळून आत्महत्या करतात. लग्नाविषयीच्या समस्यांमुळे 7 टक्के जण, तर मानसिक आजारामुळे (Psychological Disease) त्रस्त 7 टक्के युवक आत्महत्येचा मार्ग पत्करतात. 5.6 टक्के जण दारू किंवा अन्य व्यसनांच्या (Addiction) आहारी गेल्यानं आत्महत्या करतात. 5 टक्के व्यक्ती प्रेम प्रकरणात (Love Affair) फसवणूक झाल्यानं आत्महत्येला शेवटचा पर्याय मानून असं कृत्य करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये पुरुषांच्या आत्महत्येचा दर अधिक तर महिलांच्या आत्महत्येचा दर कमी आहे. गरीब देशांमध्ये याउलट स्थिती आहे. तेथे पुरुषांच्या तुलनेत महिला आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे; मात्र जगभरात आत्महत्येची आकडेवारी घटताना दिसत आहे, ही एक चांगली बाब म्हणता येईल. जागतिक स्तरावर मागील 20 वर्षांत आत्महत्येच्या प्रमाणात 36 टक्क्यांनी घट झाली आहे; मात्र अमेरिकेत आत्महत्येची प्रकरणं 17 टक्क्यांनी वाढली असून, कोरोना काळात जपानमध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्याची नोंद आहे. कोणत्याही समस्येचा सामना करताना महिला अधिक कणखर होतात. परंतु, पुरुष मात्र परिस्थितीपुढे हात टेकून आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याचं आकडेवारीवरून दिसतं. त्यामुळे कठीण परिस्थिती किंवा एखाद्या समस्येचा सामना करताना डिप्रेशन, तणावाच्या आहारी न जाता, सुसंवाद ठेवल्यास पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल.
First published:

Tags: Stress, Suicide

पुढील बातम्या