Home /News /explainer /

तेल उत्पादन करणाऱ्या कझाकिस्तानमध्ये त्यांच्या किमतींवरून एवढा गोंधळ का?

तेल उत्पादन करणाऱ्या कझाकिस्तानमध्ये त्यांच्या किमतींवरून एवढा गोंधळ का?

कझाकिस्तानमध्ये (Kazakhstan) तेलाच्या किमतीविरोधातील (Oil price Hikes) आंदोलन आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आहे. तेल निर्यात करणाऱ्या (Oil Exporter) या देशात तेलाच्या किमती वाढल्याने परिस्थिती इतकी अनियंत्रित का आणि कशी झाली हा प्रश्न आहे. यामध्ये माजी राष्ट्रपतींविरोधातील जनतेचा रोषही समोर आला आहे.

पुढे वाचा ...
    नूर सुलतान, 7 जानेवारी : कझाकिस्तानमध्ये (Kazakhstan) सध्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. लोकांचा विरोध वाढल्याने सरकार कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिस आणि लोकांमध्ये झालेल्या संघर्षात डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सरकारी इमारतींवर हल्ला करणाऱ्या दोघांचाही समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष कसिम-जोमार्ट तोकायेव (Kassym-Jomart Tokayev) परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, तेल उत्पादक (Oil producing Nation) आणि निर्यात करणाऱ्या या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत एवढा गदारोळ कसा झाला? ह्याचं सर्वांना आश्चर्य वाटत आहे. तेलाच्या किमती वाढल्याचा निषेध या वर्षाच्या सुरुवातीला कारच्या इंधन दरवाढीपासून या विरोधाची सुरुवात झाली. पश्चिमेकडील तेल उत्पादक शहरातून ही निदर्शने अनेक शहरांमध्ये पसरली आणि हजारो लोक रस्त्यावर उतरले. राष्ट्रपती कासिम जोमार्ट तोकायेव यांनी बुधवारी सरकारला बरखास्त करुन या किमती कमी केल्या. शेजाऱ्यांसाठी काळजीचं कारण यानंतर देशाच्या वृत्तीतही बदल झालेला पाहायला मिळाला. प्रथम त्यांनी आंदोलकांना दहशतवादी म्हटले, नंतर सामूहिक सुरक्षा करार संघटना (CSTO) अंतर्गत मित्र रशियाकडून लष्करी मदत मागितली. रशियाचे शांती सैन्यही कझाकस्तानमध्ये पोहोचले आहे. या अस्थिरतेमुळे केवळ मित्र आणि शेजारी देश रशियाच नाही तर कझाकिस्तानकडून तेल खरेदी करणारा चीन देखील चिंतेत आहे. कझाकिस्तानमध्ये परिस्थिती कशी आहे? कझाकिस्तान हा सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या पाच मध्य आशियाई देशांपैकी एक आहे. या देशांपैकी हा सर्वात समृद्ध आणि मोठा देश आहे. त्यात तेल, नैसर्गिक वायू, युरेनियम आणि मौल्यवान धातूंचे साठे आहेत. या देशात सशक्त मध्यमवर्ग असण्याबरोबरच अतिशय श्रीमंत लोकांचा समूहही तयार झाला आहे. सरासरी मासिक राष्ट्रीय पगार 600 डॉलरपेक्षा कमी आहे. बँकिंग क्षेत्रातील बुडित कर्जामुळे देश खूप अडचणीत आहे. भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. ट्रम्प अमेरिकेत धर्माला राष्ट्रवादाचे रूप देत आहेत का? यापूर्वीही आंदोलने झाली आहेत सध्याच्या संकाटाची सुरुवात पश्चिमेकडील झाना झेन या तेल उत्पादक शहरामधून झाली आहे. या भागातील श्रीमंत लोक इंधनाचे फायदे स्थानिक लोकांमध्ये समान प्रमाणात वाटू देत नसल्याबद्दल लोकांमध्ये बराच काळ संताप होता. याआधी 2011 मध्येही जनआंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी संप करणाऱ्या तेल कामगारांना बडतर्फ केल्याचा निषेध करण्यात आला होता. आवाज दाबणे आता सामान्य बाब शनिवारी एलपीजीच्या किमती 15 दिवसांत दोनदा वाढल्या, तेव्हा लोकांचा रोष उसळला आणि देशभरात निदर्शने सुरू झाली. कझाकिस्तानमध्ये, अशा निषेधाचा आवाज दाबणे ही एक सामान्य प्रथा झाली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात कोणत्याही प्रकारचे नेतृत्व नाही. माजी आणि वर्तमान अध्यक्ष माजी राष्ट्रपतींच्या विरोधात, तीन वर्षांपूर्वीपर्यंत कझाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष नुरसुलतान नजरबायेव यांनी 2019 मध्ये सत्ता सोडली. परंतु, ते देशाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख राहिले, जे लष्करी आणि सुरक्षा दलांवर देखरेख करतात. नजरबायेवचा प्रभावही कायम होता. सध्याची निदर्शने नजरबायेव यांच्या विरोधात अधिक होती. सध्याचे अध्यक्ष तोकायेव यांनी या संकटावर म्हटले आहे की ते सुरक्षा परिषदेतून नजरबायेवला काढून टाकत आहेत. जगभरात 2022 वर्ष सुरू झालं असताना एक देश अजूनही 2013 मध्येच! काय आहे भानगड? रस्त्यावरील निदर्शनांमध्येही नजरबायेव विरुद्धचा राग जास्त होता. 'शाल केट' म्हणजेच 'म्हाताऱ्या लोकांनी जा' अशा घोषणा रस्त्यावर अधिकाधिक ऐकू येत होत्या. वाढती गर्दी पाहून तोकायेव यांना रशियाची मदत घेणे भाग पडले. आपल्या मदतीचा बचाव करताना ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय दहशतवादी गट विरोधात सक्रिय आहेत. तोकायेवने बदल केल्याशिवाय सरकार पडेल अशी आशा कमी आहे. आंदोलकांमध्ये नेतृत्वाचा अभाव ही देखील एक समस्या आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या