मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Chaudhary Charan Singh.. अशी व्यक्ती जी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पंडित नेहरू यांनाही भिडली होती!

Chaudhary Charan Singh.. अशी व्यक्ती जी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पंडित नेहरू यांनाही भिडली होती!

BirthDay Chaudhary Charan Singh : चौधरी चरणसिंग यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी हापूर गावात झाला. साधी राहणीमानसाठी ते प्रसिद्ध होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते पंडीत नेहरुंशीही भिडले होते.

BirthDay Chaudhary Charan Singh : चौधरी चरणसिंग यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी हापूर गावात झाला. साधी राहणीमानसाठी ते प्रसिद्ध होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते पंडीत नेहरुंशीही भिडले होते.

BirthDay Chaudhary Charan Singh : चौधरी चरणसिंग यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी हापूर गावात झाला. साधी राहणीमानसाठी ते प्रसिद्ध होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते पंडीत नेहरुंशीही भिडले होते.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 23 डिसेंबर : आज चौधरी चरणसिंग यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 23 डिसेंबर 1902 रोजी हापूरमधील नूरपूर गावात एका जाट कुटुंबात झाला. त्यांनी आपली कारकीर्द वकील म्हणून सुरू केली असली तरी गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. चरणसिंग यांनी आयुष्यात अनेक पक्ष तयार केले आणि फोडले सुद्धा. साधेपणाची आवड असणाऱ्या चरणसिंग यांना अनेक गोष्टींचा तिटकारा होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी त्यांना जाणीव होती. शेतकऱ्यांसाठी ते एकदा पंडीत नेहरुंनाही भिडले होते.

उधळपट्टी त्यांना अजिबात सहन होत नव्हती. क्रिकेट आणि चित्रपटांचा तीव्र तिरस्कार होता. मद्यपानापासून चारहात दूर होते. एखादा व्यक्ती असे करतो हे कळाले तरी ते त्याच्याशी बोलत नव्हते. आयुष्यभर ते घरात तयार केलेलं पत्नीच्या हातचंच जेवण घेणे पसंत करत होते.

फक्त पोस्टकार्डवर लिहा, तुमचे काम आपोआप होईल

घरात कोणताही बल्ब विनाकारण सुरू असेल तर ते लगेच बंद करायचे. एकदा बागपत येथील काही शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी त्यांना भेटायला आले, त्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही, कारण त्यांना वाटले की, ज्या कामासाठी ते पैसा आणि वेळ खर्च करून दिल्लीत आले आहेत, ते काम ते पत्र लिहूनही करू शकतात. एवढे पैसे खर्च करून इथे का आले, असा सवालही त्यांनी शेतकऱ्यांना केला. फक्त पोस्टकार्डवर लिहा, तुमचे काम आपोआप होईल.

अशा स्थितीत ते शेतकऱ्यांचे मोठमोठे मोर्चे आणि धरणे आंदोलन त्यांनी कसे पाहिले असते, हे सांगणे कठीण आहे. पण कदाचित त्यांना ते आवडले नसते. पण, शेतकर्‍यांचा हक्क कुठूनही मारला जावा असे त्यांना कधीच वाटलं नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ते आघाडीवर उभे राहिले असते.

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीही ते जमीनदारांकडून शेतकरी मजुरांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत होते. शेतकर्‍यांच्या समस्या ऐकून ते खूप प्रभावित व्हायचे आणि कायद्याचे ज्ञान ते शेतकर्‍यांच्या भल्यासाठी वापरताना दिसायचे.

शेतकऱ्यांसाठी नेहरूंशीही भिडले

1951 मध्ये ते उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात न्याय आणि माहिती मंत्री झाले. यानंतर 1967 पर्यंत प्रदेश काँग्रेसच्या आघाडीच्या तीन प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होत राहिली. जमीन सुधारणा कायद्यांसाठी ते काम करत राहिले. शेतकऱ्यांसाठी 1959 च्या नागपूर काँग्रेस अधिवेशनात पंडित नेहरूंनाही विरोध करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.

Goa Liberation | सरदार पटेल हयात असते तर गोवा खरच लवकर मुक्त झाला असता का?

विमानप्रवासाच्या विरोधात

ते सहसा साध्या अॅम्बेसेडर कारमध्ये प्रवास करत असे. विमानप्रवासाच्या विरोधात ते होते. ते पंतप्रधान असतानाही लखनौला रेल्वेनेच जात असत.

काँग्रेसपासून वेगळे होऊन यूपीमध्ये पहिले बिगर काँग्रेस सरकार

चौधरी चरणसिंग यांनी 1967 मध्ये स्वतःला काँग्रेसपासून दूर केले आणि ते उत्तर प्रदेशचे पहिले गैर-काँग्रेस मुख्यमंत्री बनले. भारतीय लोकदलाचे नेते म्हणून ते जनता आघाडीत सामील झाले ज्यात त्यांचा पक्ष सर्वात मोठा घटक होता. पण राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की, 1974 पासून ते महायुतीत एकटे पडले होते आणि जयप्रकाश नारायण यांनी मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड केल्याने त्यांची खूप निराशा झाली होती. आणि मग 1979 मध्ये पंतप्रधान झाल्यावर त्यांना काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यावर राजीनामा द्यावा लागला.

First published:

Tags: Politics