Home /News /explainer /

काय आहे Bulli Bai App, मुस्लिम महिलांशी कसा संबंध? हा गुन्हा किती गंभीर?

काय आहे Bulli Bai App, मुस्लिम महिलांशी कसा संबंध? हा गुन्हा किती गंभीर?

Bulli Bai App Controversy: बुल्लीबाई अॅपवरून सोशल मीडियावर (Social Media) वादविवाद सुरू आहेत. या अॅपवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याच वेळी, सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी हे केवळ मनोरंजनासाठी असल्याचे स्पष्ट केलं. चला सविस्तर जाणून घेऊ.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 4 जानेवारी : सध्या सोशल मीडियावर बुल्लीबाई अॅपविरोधात (Bulli Bai App) संतापाची लाट उसळली आहे. मात्र, हे 'बुल्ली बाई' अॅप काय आहे आणि त्यावरून का वाद सुरू झाला? अनेकांना याबाबत फारशी माहिती नाही. वास्तविक, सोशल मीडियावर (Social Media) ट्रेंडिंग किंवा लोकप्रिय होणारा प्रत्येक कंटेन्ट हा केवळ गंमत आणि मनोरंजनासाठी असतो. हा काही कायद्याने गुन्हा नाही, असाच समज होता. बुल्लीबाई अॅपबाबत सोशल मीडियावर अनेकांनी अशाच प्रकारची मतं व्यक्त केली आहेत. या अॅपवर ज्या मुली किंवा महिलांचे फोटो अपलोड करुन बोली लावण्यात आली, ती केवळ मौजमजा आणि मनोरंजनासाठी आहे, असा या लोकांचा समज आहे. वास्तविक, मुली आणि महिलांवरील ऑनलाइन गुन्ह्यांबाबत आपल्या समाजात फारशी समज नाही. कारण बलात्कार, विनयभंग आणि गैरवर्तन हेच ​​महिलांवरील गुन्हे आहेत, असा समज झाला आहे. सोशल मीडियावर एडिट करून मुलींचे फोटो टाकणे, त्यांच्या विरोधात कॉमेंट्स लिहिणे आणि कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर महिलांना ट्रोल करणे, हे सर्व केवळ मनोरंजनाशी निगडित आहे. या विचारसरणीमुळे सुल्ली डील्स किंवा बुल्लीबाई सारख्या अॅपबद्दल लोकांचे मत आहे की ते केवळ मनोरंजनासाठी आहे. बुल्ली बाई अॅपमध्ये काय चुकीचे आहे? बुल्लीबाई अॅपमध्ये काय चूक आहे हे जाणून घेण्यासाठी हे समजून घेणे आवश्यक आहे: समजा तुम्ही फेसबुक किंवा ट्विटरवर काहीतरी सर्च करत आहात, अचानक तुम्हाला तुमच्या जवळच्या मुलीचा किंवा महिलेचा मॉर्फ केलेला फोटो दिसला, ज्यावर काहीतरी आक्षेपार्ह लिहिलेले आहे. अशा स्थितीत तुम्हाला कसे वाटेल? आता या अॅपच्या माध्यमातून ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया अॅप्सवर अनेक लोकांच्या मुली किंवा पत्नींचे फोटो व्हायरल होत आहेत. युजर्स त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांच्यावर घाणेरड्या कमेंट करत आहेत, तिथूनच ऑनलाइन छळ सुरू होतो. Sulli Deals ते Bulli Bai व्हाया GitHub काय आहे प्रकरण? आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मुली आणि महिलांना त्यांचे फोटो सोशल मीडियावर कसे व्हायरल होत आहेत हे देखील माहित नाही. सोशल साइट्सवरून त्यांचे फोटो चोरून मनोरंजनाच्या नावाखाली असे गुन्हे केले जात आहे. बुल्लीबाई अॅपच्या बाबतीतही तेच होत आहे. लिंक्डइन आणि ट्विटरवरून मुस्लिम महिलांचे फोटो घेऊन ते गिटहबवरील बुल्लीबाई अॅपवर आक्षेपार्ह कॅप्शनसह अपलोड केले जात आहेत. या अॅपचे ऑनलाइन वापरकर्ते खूपच कमी असले तरी ट्विटरवर ट्रेंड झाल्यानंतर हे अॅप क्षणात व्हायरल झालं. परिणाम मुस्लिम महिला आणि मुलींचा मानसिक छळ. बुल्लीबाई अॅपविरोधात काय कारवाई होईल? ऑनलाइन छळवणुकीबाबत भारतीय दंड संहितेत कोणतीही थेट तरतूद नाही. परंतु, अशी प्रकरणे आयटी कायद्यांतर्गत येतात. या कायद्यानुसार बुल्लीबाई अॅपची निर्मिती करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवले जाऊ शकते. या कायद्यानुसार सोशल मीडियावरून कोणत्याही व्यक्तीचा त्याच्या संमतीशिवाय किंवा माहितीशिवाय फोटो घेणे हाही गुन्हा मानला जातो. त्याच बरोबर सोशल मीडियावर महिला आणि मुलींबद्दल चुकीची भाषा आणि घाणेरडे कमेंट करणे हे देखील त्यांच्या बदनामी आणि स्वाभिमानाच्या विरोधात आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 499, 503, 506, 507 आणि 509 अंतर्गत दोषींना अटक केली जाऊ शकते. 'बुल्ली बाय' अॅप प्रकरणातील मुख्य आरोपीला उत्तराखंडमधून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी मंगळवारी दिली. धक्कादायक म्हणजे आरोपी एक महिला आहे. ती बंगळुरू शहरातून ताब्यात घेतलेल्या 21 वर्षीय सिव्हिल इंजिनीअरिंग विद्यार्थ्याला ओळखत होती, ज्याला 10 तासांच्या चौकशीनंतर मुंबईत अटक करण्यात आली आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Facebook, Social media

    पुढील बातम्या