Aurangzeb | औरंगजेबचा भाऊ मुघल राजपुत्र होता हिंदू धर्मग्रंथांचा चाहता!

Aurangzeb | औरंगजेबचा भाऊ मुघल राजपुत्र होता हिंदू धर्मग्रंथांचा चाहता!

Dara Shikoh, Mughal emperor, Aurangzeb : मुघल सल्तनतमध्ये लोक दारा शिकोहला पंडितजी म्हणायचे. नीतिशास्त्रात तो मुघल राजपुत्रांपेक्षा वेगळा होता. संस्कृत आणि हिंदू धर्मग्रंथांवर त्यांचे प्रेम होते. त्याच्या या प्रवृत्तीमुळे औरंगजेबाला खूप चीड आली. पुढे औरंगजेबाने मुघल गादी त्याची हत्या करून ताब्यात घेतली.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : भारतातील मुघल राजवटीच्या (Mughal Empire) सुरुवातीच्या दिवसांपासून राज्यकर्त्यांनी हिंदू धर्म (Hindu Religion) समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. याला अकबराच्यात (Akbar) काळ वेग आला. त्याने अनुवादकांची एक टीम तयार करून धार्मिक ग्रंथांचे संस्कृतमधून फारसीमध्ये भाषांतर करण्यास सुरुवात केली. मुघलिया सल्तनतमध्ये एक राजपुत्र असाही होता, जो संस्कृत आणि हिंदू धर्मग्रंथांचा चाहता होता. तो स्वतः अभ्यास तर करायचाच शिवाय अनुवादही करून घेत होता.

अकबराचा पंतप्रधान अबुल फजल अकबरीमध्ये लिहितो, हिंदू धर्मग्रंथांचे भाषांतर सुरू केले जेणेकरून त्याच्याविरुद्धचे वैर आणि द्वेषाचे वातावरण हलके व्हावे. यामुळे दोन समाजातील वैर व वैमनस्य संपवले जाईल.

अकबराने सर्वप्रथम महाभारताचे भाषांतर करून घेतलं

राजा अकबराचा असा विश्वास होता की हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील वैराचे खरे कारण एकमेकांच्या श्रद्धांचे अज्ञान आहे. आणि कदाचित याच कारणामुळे त्यांनी अनुवादासाठी प्रथम महाभारताची निवड केली. दिल्लीच्या गादीवर बसल्यानंतर अकबराने स्थानिक राजांना रणांगणावर पराभूत केले. परंतु, नंतर त्याने मुत्सद्दीपणा आणि विवाहाचा अवलंब करून संबंध सुधारण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतातील लोकांमधील संबंध सुधारण्यासाठी सर्व प्रयत्न चालू ठेवले.

दाराला हिंदू धर्मग्रंथांचे खरोखरच वेड होते?

अकबराच्या काळात सुरू झालेल्या या कार्याला दारा शिकोहच्या काळात वेग आला. धर्मग्रंथांचे भाषांतर करणे किंवा स्थानिक राजांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे हा देखील अकबरासाठी राजकारणाचा एक भाग होता. धार्मिक सहिष्णुतेने आपले राज्य टिकवून ठेवण्याची महत्त्वाकांक्षाही त्याच्या प्रयत्नांमध्ये होती. पण, दारा शिकोहसाठी, इतर धर्मांच्या श्रद्धांबद्दल माहिती मिळवणे हे राजकीयदृष्ट्या प्रेरित नव्हते. त्यात राज्याचा विस्तार किंवा राज्य ताब्यात घेण्यासारख्या हेतुंचा समावेश नव्हता.

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत औरंगजेबच्या भूमिकेत दिसणार 'हे' ज्येष्ठ अभिनेते

दारा यांना भारतीय तत्त्वज्ञानाचं चांगलं ज्ञान होतं

दारा शिकोहने सर्व धर्माच्या विद्वानांना एकत्र केलं होतं. हिंदू धर्माच्या सखोल अभ्यासानंतर दारा शिकोह स्वतःच असे मानू लागला की हिंदू-मुस्लिम धर्मात काही किरकोळ भेद वगळता काही फरक नाही. दारा शिकोह हा विद्वान होता. त्यांना भारतीय उपनिषदे आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे चांगले ज्ञान होते.

तो नम्र आणि मनाने उदार होता असे इतिहासकार म्हणतात. असे म्हटले जाते की दारा शिकोहच्या वडिलांना समजले होते की आपल्या मुलाला भारत माहित आहे आणि तो राज्य चालवण्यास अधिक चांगला सिद्ध होईल. परंतु, औरंगजेबाने गोंधळ घातला. दारा शिकोह यशस्वी झाल्यास इस्लाम धोक्यात येईल असे औरंगजेबाला वाटत होते.

धर्मांबद्दल ते काय म्हणाले?

दारालाही आश्चर्य वाटले की सर्व धर्माचे विद्वान आपापल्या व्याख्या करण्यात मग्न आहेत आणि या सर्वांचा मूळ घटक एकच आहे हे त्यांना कधीच समजत नाही. त्यांचा असा विश्वास होता की ज्ञानासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने सत्याचा शोध घेतला पाहिजे. हिंदू आणि मुस्लिम धर्मांच्या मिलनाला त्यांनी मजमा-उल-बहारीन (दोन समुद्रांची बैठक) हे नाव दिले.

उपनिषदांचे पर्शियन भाषेतील भाषांतर हे दारा यांचे सर्वात मोठे योगदान मानले जाते. त्यांनी या अनुवादित पुस्तकांना 'सिरे अकबर' म्हणजेच महान रहस्य असे नाव दिले. फारसी भाषेतील भाषांतराचे मुख्य कारण म्हणजे मुघल दरबारात फारसी भाषेचा वापर केला जात असे. हिंदूंचा विद्वान वर्गही या भाषेशी परिचित होता.

औरंगजेबाच्या जागी दारा शिकोह मुघल सल्तनतच्या गादीवर बसला असता तर देशातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती, असे भारतातील हिंदुत्वनिष्ठ इतिहासकार आणि विचारवंतांचे मत आहे.

Published by: Rahul Punde
First published: November 22, 2021, 3:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या