नवी दिल्ली/लंडन, 23 नोव्हेंबर: कोरोनाव्हायरस साथीच्या (Coronavirus Pandemic) आजाराच्या दुसऱ्या टप्प्यात जगभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत होम आयसोलेशनमध्ये (Home Isolation) राहणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी पल्स ऑक्सिमीटर (Pulse Oximeters) संजीवनी ठरली. पण आता पल्स ऑक्सिमीटरवरून वाद निर्माण झाला आहे. युनायटेड किंगडमचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्या पल्स ऑक्सिमीटरसह वैद्यकीय उपकरणांचा अभ्यास सुरू करण्याची घोषणा केली आहे. जाविदचा दावा आहे की गडद त्वचेच्या लोकांच्या बाबतीत पल्स ऑक्सिमीटरचे रीडिंग अचूक नाही. या शक्यतेकडे लक्ष वेधून ते म्हणाले की यामुळे कोविड साथीच्या आजारादरम्यान हजारो टाळता येण्याजोगे मृत्यू झाले असावेत. त्यामुळे पल्स ऑक्सिमीटरसह अन्य वैद्यकीय उपकरणांचा अभ्यास करण्यात येत आहे.
वैद्यकीय उपकरणाविषयी काय शंका आहे?
जवळपास 2 वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना साथीच्या काळात, कोविड-19 च्या रुग्णासाठी पल्स ऑक्सिमीटर मोठा आधार ठरला. मात्र, आता तज्ञांना असे आढळून आले आहे की जेव्हा गडद (काळा) त्वचा असलेल्या लोकांचा विचार केला जातो तेव्हा या उपकरणांचे रिडींग अचूक नसते. यावरूनच वाद सुरू आहे.
अहवाल सांगतात की हे उपकरण रक्तातून प्रकाश पार करत असल्यामुळे असे होऊ शकते. प्रकाश कसा येत आहे याच्या आधारेच त्वचेच्या रंगद्रव्याचा परिणाम दिसून येतो. बीबीसीने अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील डॉ. मायकेल स्जोडिंग यांचा हवाला दिला, ज्यांनी पल्स ऑक्सिमीटरवरील अभ्यासाचे नेतृत्व केले, ते म्हणाले, कदाचित दोनतीनदा पल्स ऑक्सिमीटर उपकरणाने गडद त्वचा असलेल्या रुग्णांचे अचूक रीडिंग दिले नाही.
पल्स ऑक्सिमीटरच्या चुकीच्या रीडिंगमुळे कोविड रुग्णांच्या एका वर्गाच्या उपचारांमध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्याची शक्यता सूचित करते. ऑक्सिमीटरचे रीडिंग अचूक असते तर कदाचित या रुग्णांचे प्राण वेळेत वाचले असते.
अशा वैद्यकीय उपकरणांमध्ये या समस्यांवर मात करण्यासाठी काय केले जात आहे?
यूकेचे आरोग्य सचिव साजिद जाविद म्हणाले की स्पष्टीकरणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणून यूके वैद्यकीय उपकरणांमधील पद्धतशीर वर्णद्वेष आणि पक्षपातीपणाची चौकशी करण्यासाठी यूएस अधिकार्यांशी भागीदारी करेल. या अंतर्गत, जातीय अल्पसंख्याक आणि महिलांच्या बाबतीत पल्स ऑक्सिमीटर तुलनेने कमी अचूक रीडिंग का देत आहे हे पाहिले जाईल.
बीबीसी की रिपोर्टनुसार, यूकेच्या डॉक्टर्स युनियन, ब्रिटिश मेडिकल असोसिएशन (बीएमए) ने असे आवाहन केले आहे, की वैद्यकीय उपकरणांबद्दलच्या चिंतेचा अभ्यास करण्याऐवजी इतर आरोग्य सुविधांमधील संरचनात्मक मुद्द्यांच्या स्वरुपात पाहिले जावे.
वैद्यकीय उपकरण हा वर्णद्वेषी धोका कसा असू शकतो?
एका इंग्रजी दैनिकातील लेखाद्वारे अभ्यास करण्याची घोषणा करताना जाविद म्हणाले, की अशा भीतीमुळे वैद्यकीय विज्ञानाची माहिती देणारी प्रक्रिया आणि यंत्रणांमधील त्रुटी देखील स्पष्ट होतात.
“मशीन पाहिल्यावर प्रत्येकाला समान अनुभव मिळत आहे असे गृहीत धरणं सोपं आहे. मात्र, तंत्रज्ञान लोकांनी तयार केलं आहे. त्यामुळे त्यात त्रुटी असतील, हे नाकारता येणार नाही. अर्थात, ही उपकरणे पूर्ण नियमांशिवाय आणि बेजबाबदारपणे वापरणे ही दुसरी समस्या आहे. तर कोड कोण लिहित आहे? उत्पादनाची चाचणी कशी केली जाते? हे सर्व लोकांसमोर यायला हवे.
वंश आणि वांशिकतेशी संबंधित सामाजिक-आर्थिक घटक आरोग्याच्या परिणामांशी संबंधित आहेत. हे सर्वज्ञात आहे की कोविड-19 आणि इतर रोगांचे गंभीर परिणाम काही समुदायांमध्ये अधिक देखील दिसून आले आहेत. उदाहरणार्थ कारखाने, किराणा दुकाने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत काम करणारे लोक कोविड-19 च्या संपर्कात येण्याची शक्यता जास्त आहे.
आपण पल्स ऑक्सिमीटर वापरणे टाळावे का?
तज्ञ ऑक्सिमीटर सारख्या उपकरणांबद्दल अधिक जागरूक राहण्याची आणि त्यांचा वापर मर्यादित करण्याची शिफारस करतात. यूके अधिकाऱ्यांनी ऑक्सिमीटरमधील दोषांदरम्यान वेगवेगळ्या वंशांच्या, गोरे, काळे, आशियाई आणि इतर समुदायांच्या रुग्णांसाठी मार्गदर्शक गाइडलाईन्स अपडेट केली आहेत. या समुदायातील लोक नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार ऑक्सिमीटर वापरू शकतात. परंतु, यासोबतच त्यांनी प्रोफेशनल हेल्थकेयर एक्सपर्टचा सल्ला घ्यावा.
वंश आणि कोरोना विषाणू यांना एकत्र का जोडलं जातंय?
वांशिक पूर्वाग्रहाचे पुनरावलोकन जाहीर होण्यापूर्वी इंग्लंडमधील सरकारी आरोग्य डेटावरून असे दिसून आले आहे की गोर्या लोकांपेक्षा काळ्या लोकांचा कोविड-19 मुळे मृत्यू होण्याची शक्यता दोन ते चार पट जास्त होती, तर आशियाई वंशाच्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता 1.5 पट जास्त होती.
त्याचवेळी, यूएस अहवालात म्हटले आहे की 595 पैकी 1 गोरा अमेरिकन कोविडमुळे मरण पावला, तर कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांसाठी हे प्रमाण 735 मध्ये 1 इतके वाढलं. लॅटिन अमेरिकन लोकांसाठी हे प्रमाण 1000 मध्ये 1 होते. काही समुदायांवरील साथीच्या रोगाच्या विषम प्रभावावर दारिद्र्याचा मजबूत प्रभाव असल्याचे पाहिले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.