मुंबई, 1 डिसेंबर : इंग्रजांच्या सत्तेवर कधी सूर्य मावळत नव्हता असं म्हटलं जायचं ते काही खोटं नाही. अजूनही अनेक देश ब्रिटनच्या महाराणीच्या अधिपत्याखाली आहे. दोन दिवसांपूर्वी बार्बाडोस (Barbados) हा कॅरिबियन बेट देश पूर्ण प्रजासत्ताक बनला. 55 वर्षांपूर्वी बार्बाडोसला ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळाले असले, तरी ब्रिटनची राणी इथं राष्ट्रीय प्रमुख म्हणून काम करत होती. परंतु, 72 वर्षीय डेम सँड्रा मेसन यांनी सोमवारी पदभार स्वीकारताच, बार्बाडोस ब्रिटनपासून मुक्त झालं. म्हणजेच राष्ट्रकुल देशांपासून (Commonwealth) वेगळं झालं ज्याच्या राणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) या राज्याच्या प्रमुख आहेत. आपल्या 69 वर्षांच्या राजवटीत ब्रिटनची राणी आतापर्यंत 32 देशांच्या प्रमुख राहिल्या आहेत. यापैकी 17 देशांनी त्यांना आपल्या देशाच्या या पदावरून हटवले आहे.
आता फक्त 15 देश उरले आहेत
आजही ब्रिटनची राणी 15 देशांची प्रमुख म्हणून ओळखली जाते, ज्यात ब्रिटनचा समावेश आहे. एक काळ असा होता जेव्हा ब्रिटनची राणी सर्व राष्ट्रकुल देशांची प्रमुख होती आणि तिने यूकेमध्ये जसे राज्य केलं त्याच प्रकारे या ठिकाणीही राज्य केलं. वडील किंग जॉर्ज सहावा यांच्या निधनानंतर ती 1949 मध्ये लंडन घोषणापत्रानुसार राष्ट्रकुल प्रमुख बनली.
हे 15 देश कोणते?
या 15 देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, अँटिग्वा आणि बारबुडा, बहामास, बेलीझ, ग्रेनाडा, जमैका, पापुआ न्यू गिनी, सेंट लुसिया, सॉलोमन बेटे, सेंट किट्स आणि नेव्हिस आणि सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स यांचा समावेश आहे. जमैका आणि ऑस्ट्रेलिया या दोन राष्ट्रकुल देशांनी राणीला त्यांच्या देशाच्या प्रमुखपदावरून हटवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
यापूर्वी या देशांनीही असं केलं आहे
स्वतःला प्रजासत्ताक बनवून ब्रिटनपासून पूर्णपणे स्वतंत्र झालेला बार्बाडोस हा पहिला देश नाही. 1992 मध्ये ब्रिटनच्या राणीला त्यांच्या राज्यप्रमुख पदावरून हटवून राष्ट्राध्यक्ष निवडले गेले आहे. त्याआधी डॉमिनिकाने 1978 मध्ये त्रिनिदाद आणि टॅबोगोने 1976 मध्ये आणि गयानाने 1970 मध्ये अशीच कामगिरी केली होती.
400 वर्षांनी मिळालं बार्बाडोसला स्वातंत्र्य, ब्रिटनच्या जोखडातून झाला बार्बाडोस
जमैका बार्बाडोसच्या मार्गावर
राणीच्या अधिपत्याखाली येणाऱ्या देशांची संख्या आता 15 ही राहणार नाही. कारण, 2016 मध्ये जमैकाने याबाबत विचार केला होता आणि आता पुन्हा एकदा याची चर्चा जोरात सुरू आहे. आशा आहे की जमैका देखील लवकरच बार्बाडोसप्रमाणे स्वतंत्र्य होईल.
ऑस्ट्रेलियातही हीच चर्चा
ऑस्ट्रेलियातही या विषयावर बराच काळ चर्चा होत आहे. 1999 मध्ये या विषयावर सार्वमत घेण्यात आले होते, ज्यामध्ये 54.9 टक्के मते राणीच्या बाजूने गेल्याने याला यश आलं नाही. आता पुन्हा एकदा राणीला हटवण्याची चर्चा होत आहे. पण, वास्तविकता अशी आहे की राणीला यूकेमध्येही राज्यप्रमुख म्हणून अधिकार नाहीत.
ब्रिटनच्या राणी Queen Elizabeth II साजरे करतात दोन वाढदिवस; पण का? हे आहे कारण
या देशांमध्ये राणीची भूमिका काय आहे?
राणीच्या अधिपत्याखालील देशांमध्ये सरकार स्वतंत्रपणे चालते आणि त्यांचे राज्यकर्ते आणि कायदे ब्रिटनपासून वेगळे असतात. या देशांमध्ये राणीच्या वतीने गव्हर्नर-जनरल राणीचे प्रतिनिधित्व करतो, जेथे राणीची औपचारिक उपस्थिती आवश्यक असते. यामध्ये मंत्री आणि राजदूतांची नियुक्ती आणि कायद्याला राजेशाही मान्यता यांचा समावेश आहे.
ब्रिटनमध्ये संसदीय शासनपद्धती आहे, ज्यामध्ये राज्याचे सर्व व्यवहार ब्रिटनच्या राणीच्या नावाने करण्यात येतात. परंतु, खरे अधिकार पंतप्रधानांकडे आहेत. संसदीय प्रजासत्ताकमध्ये राज्याचा प्रमुख हा राणीऐवजी राष्ट्रपती असतो, जो निवडला जातो. कॉमनवेल्थमध्ये त्या देशांचा समावेश होतो, ज्यावर एकेकाळी ब्रिटनचे राज्य होते. आज त्यांची स्वतःची शासन व्यवस्था आहे. पण, राज्याच्या प्रमुखाची भूमिका ब्रिटनच्या राणीकडे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.