काय सांगता! राणीमुंगी होण्यासाठी भारतातल्या जंपिंग अ‍ॅन्ट बदलतात मेंदूचा आकार, वाचा कसं चालतं कार्य

काय सांगता! राणीमुंगी होण्यासाठी भारतातल्या जंपिंग अ‍ॅन्ट बदलतात मेंदूचा आकार, वाचा कसं चालतं कार्य

भारतातल्या जंपिंग अ‍ॅन्ट (Indian Jumping Ants) या मुंगीवर केलेल्या संशोधनातून असं लक्षात आलं आहे, की या मुंग्या आपल्या मेंदूचा आकार बदलू शकतात( Ants Can Alter Brain) आणि गरज संपली की तो आकार पूर्ववतही करू शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली 16 एप्रिल : निसर्गात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, कीटक, पक्षी, जीव-जंतू आहेत. प्रत्येकाला निसर्गाने काहीतरी वैशिष्ट्य दिलं आहे. कुणाला संरक्षणाच्या हेतूने तर कुणाला दुसऱ्या काही कारणासाठी वैशिष्ट्य मिळालं आहे. त्या-त्या प्रसंगी ते प्राणी या वैशिष्ट्यांचा उपयोग करतात. पण एखादा प्राणी किंवा जीव त्याच्या मेंदूचा आकार बदलू शकतो असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? पण अमेरिकेतील केननेशॉ विद्यापीठातील संशोधकांनी भारतातल्या जंपिंग अ‍ॅन्ट (Indian Jumping Ants) या मुंगीवर केलेल्या संशोधनातून असं लक्षात आलं आहे, की या मुंग्या आपल्या मेंदूचा आकार बदलू शकतात( Ants Can Alter Brain) आणि गरज संपली की तो आकार पूर्ववतही करू शकतात.

सामान्यपणे कीटकांमध्ये किंवा माश्यांमध्ये राणीमाशी मेली की इतर माशाही प्राण सोडतात. पण या मुंग्यांमध्ये तसं होत नाही. राणीमुंगी मेली की इतर कामगार मुंग्यांपैकी एक राणीमुंगीची जागा घेते आणि या वेळी ती मुंगी तिचा मेंदू आकुंचित (Shrinks the brain) करते म्हणजे मेंदूचा आकार लहान करते आणि अंडी घालण्यासाठी ओव्हरींचा (Ovaries) आकार मोठा करते. त्याहून विशेष म्हणजे राणीमुंगीची भूमिका आणि प्रजोत्पादन संपलं की ती मुंगी पुन्हा आपल्या मेंदूचा आकार आधी होता तेवढा करते. हे या इंडियन जंपिंग अ‍ॅन्ट्सचं वैशिष्ट्य आहे.

सामान्यपणे कीटकांमध्ये लार्व्हा म्हणजे अंड्यातून बाहेर पडून कोषामध्ये असलेल्या अळीच्या स्वरूपात असतानाच ती मुंगी कामगार म्हणून की राणी म्हणून काम करणार हे ठरलेलं असतं. ज्या मुंगीच्या शरीरात योग्य हॉर्मोन्स असतात आणि जिचं पोषण उत्तम झालेलं असतं त्या मुंगीलाच राणीमुंगी म्हणून निवडलं जातं. ती त्या मुंग्यांच्या वसाहतीची राणी असते. उर्वरित सगळ्या मुंग्या ह्या कामगार गटात येतात. पण भारतीय जंपिंग अॅन्ट्सच्या बाबतीत हे पूर्णपणे वेगळं आहे. या मुंग्यांमध्ये कामगार मुंग्या स्वच्छता, अंड्यांची देखभाल, अन्न शोधून आणणं अशी कामं करतात. इतर मुंग्यांमध्ये राणीमुंगीच्या मृत्युनंतर सर्व कामगार मुंग्याही मरण पावतात तसं या जंपिंग अॅन्टबाबत घडत नाही. राणीमुंगीच्या मृत्युनंतरही इतर मुंग्या जिवंत राहातात. केनेशॉ विद्यापीठातील शास्रज्ञांनी केलेलं हे संशोधन द गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालं आहे.

मुंग्या आणि काही इतर कीटकांमध्ये जाती व्यवस्था दिसून येते. ज्यांच्यात प्रजोत्पादनाची सर्वस्वी जबाबदारी फक्त राणीमुंगीवर असते आणि ती फेरोमॉन्स एमिट करून ही जबाबदारी पार पाडत असते. विशेष म्हणजे इतर मादा कामगार मुंग्यांना अंडी देण्याची परवानगी नसते. अमेरिकेतील केनेशॉ विद्यापीठातील प्राध्यापक आणि या अभ्यासातील प्रमुख अभ्यासक डॉ. क्लिंट पेनिच म्हणाले, ‘ मानवनिर्मित ध्वनीप्रदूषणामुळे झाडांचं आयुष्य जवळजवळ 75 टक्क्यांनी कमी झालं आहे. या इंडियन जंपिंग अॅन्ट प्रौढ वयातही स्वत:त बदल करू शकतात हाच अभ्यासाचा विषय आहे. ’ निसर्गाने प्राणीमात्रांना वैशिष्ट्य दिली आहेत आणि त्यांचा अभ्यास करण्याची बुद्धी माणसाला दिली आहे, त्यामुळे तो नवनव्या गोष्टींचा अभ्यास करत असतो.

Published by: Kiran Pharate
First published: April 16, 2021, 4:32 PM IST

ताज्या बातम्या