मराठी बातम्या /बातम्या /explainer /Antarctica Glacier | अंटार्क्टिकामध्ये महाकाय हिमनगाला तडा, समुद्रातील पाणीपातळी 25 इंचांनी वाढणार, मुंबई-चेन्नई बुडणार का?

Antarctica Glacier | अंटार्क्टिकामध्ये महाकाय हिमनगाला तडा, समुद्रातील पाणीपातळी 25 इंचांनी वाढणार, मुंबई-चेन्नई बुडणार का?

अथांग पाण्याचा स्रोत असलेल्या अंटार्क्टिकाच्या डूम्सडे ग्लेशियरला (Antarctic’s doomsday glacier) लांबलचक तडा गेल्याचे पहायला मिळाले आहे. हा ग्लेशियर 170,312 किमी लांब आहे, जो अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याच्या बरोबरीचा आहे. येत्या 5 वर्षांत हा हिमनग तुटणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

अथांग पाण्याचा स्रोत असलेल्या अंटार्क्टिकाच्या डूम्सडे ग्लेशियरला (Antarctic’s doomsday glacier) लांबलचक तडा गेल्याचे पहायला मिळाले आहे. हा ग्लेशियर 170,312 किमी लांब आहे, जो अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याच्या बरोबरीचा आहे. येत्या 5 वर्षांत हा हिमनग तुटणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

अथांग पाण्याचा स्रोत असलेल्या अंटार्क्टिकाच्या डूम्सडे ग्लेशियरला (Antarctic’s doomsday glacier) लांबलचक तडा गेल्याचे पहायला मिळाले आहे. हा ग्लेशियर 170,312 किमी लांब आहे, जो अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याच्या बरोबरीचा आहे. येत्या 5 वर्षांत हा हिमनग तुटणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

पुढे वाचा ...

वॉशिंग्टन, 14 डिसेंबर : हवामान बदलाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. जागतिक तापमानात वृद्धी होत असल्याने भविष्यात अनेक शहरं पाण्याखाली जाण्याची भिती निर्माण झाली आहे. याचीच कुठेतरी सुरुवात झाल्याचे एका घटनेवरुन जाणवू लागले आहे. धरतीवरील अथांग पाण्याचा स्रोत असलेल्या अंटार्क्टिकाच्या डूम्सडे ग्लेशियरवर (Antarctic’s doomsday glacier) मोठा धोका निर्माण झाला आहे. याच्या थ्वेट्स ग्लेशियरमध्ये (Thwaites Glacier) एक लांबलचक तडा गेल्याचे पहायला मिळाले आहे. हा ग्लेशियर 170,312 किमी लांब आहे, जो अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याच्या बरोबरीचा आहे. येत्या 5 वर्षांत हा हिमनग तुटणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे जगभरातील समुद्रातील पाण्याची पातळी 25 इंचांनी वाढणार आहे. अशा स्थितीत मुंबईसह जगातील किनारपट्टीवरील शहरांतील अनेक भाग पाण्याखाली जाऊ शकतात.

सोमवारी जारी करण्यात आलेला नवीन डेटानुसार, महासागर उष्ण होत असल्याने थ्वेट्स ईस्टर्न आइस शेल्फ (TEIS) पाणबुडी शोल किंवा बँकची पकड सैल होताना दिसत, जो याला उर्वरित ग्लेशियरसोबत टिकवून ठेवण्यासाठी पिनिंग पॉइंट म्हणून काम करतो. या थ्वेट्स ग्लेशियरमध्ये येणाऱ्या क्रॅकचा वेग खूप जास्त असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या बर्फातून येणारे पाणी जागतिक स्तरावर समुद्र पातळीच्या एकूण वाढीपैकी 4 टक्के असेल. अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या वार्षिक बैठकीत हा उपग्रह डेटा सादर केला गेला आहे.

इंटरनॅशनल थ्वेट्स ग्लेशियर कोलॅबोरेशनचे यूएस प्रमुख आणि समन्वयक ग्लेशियोलॉजिस्ट प्रोफेसर टेड स्कॅम्बोस यांनी बीबीसीला सांगितले, की 'दहा दशकापेक्षा कमी कालावधीत ग्लेशियरमध्ये नाट्यमय बदल होणार आहेत. प्रकाशित आणि अप्रकाशित दोन्ही अभ्यास एकाच दिशेने निर्देशित करतात.

Tornedo | चक्रीवादळ म्हणजे काय आणि त्याचा हवामान बदलाशी काय संबंध आहे?

या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक एरिन पेटिट यांनी धोकादायकपणे वाढणाऱ्या तड्याची तुलना विंडशील्डमध्ये दिसणार्‍या क्रॅकशी केली आहे. ते म्हणाले की, एखादी छोटीशी टक्कर होऊनही जसे कारच्या काचेचे शेकडो तुकडे होतात, त्याचप्रमाणे बर्फाचा हा प्रचंड हिमनगही विरघळून होईल.

तडा जाण्यामागचं कारण काय?

अंटार्क्टिकामधील फ्लोरिडा राज्यातील हिमखंड तुटण्यासाठी केवळ ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत नसून, ऑगस्टमध्ये केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, पृथ्वीच्या आतून भरपूर उष्णता बाहेर येत आहे. यामुळे हे बर्फ वितळत आहे.

थ्वेट्स ग्लेशियर - समुद्राच्या पातळीत वाढ होण्यासाठी कारणीभूत असल्यामुळे त्याला 'डूम्सडे ग्लेशियर' म्हणतात. हे पृथ्वीच्या कवचातून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे प्रभावित होत आहे. हे पश्चिम अंटार्क्टिकापासून सुमारे 10 मैल उत्तरेस आणि पूर्व अंटार्क्टिकापासून 25 मैलांवर आहे.

पृथ्वीच्या जीवसृष्टीचे रक्षण करणाऱ्या एका महाकाय 'कवचा'चा शोध!

मुंबई, चेन्नई पाण्याखाली जाणार का?

येत्या 5 वर्षांत हा हिमनग तुटणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे जगभरातील समुद्रातील पाण्याची पातळी 25 इंचांनी वाढणार आहे. अशा स्थितीत मुंबई, चेन्नईसह जगातील किनारपट्टीवरील शहरांतील अनेक भाग पाण्याखाली जाऊ शकतात, अशी भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर परिषदा होत आहेत. वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत. मात्र, हे एकट्यादुकट्या देशांनी करुन फायदा नाही. जगभरातील देश यासाठी एकत्र आले तर आगामी धोका आपण टाळू शको, अन्यथा अनर्थ अटळ आहे, असेही या अभ्यासातून दिसत आहे.

First published:

Tags: Chennai, Mumbai, Sea