मराठी बातम्या /बातम्या /explainer /

India@75 : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीयाने थेट इंग्लंडमध्येच युनियन जॅक उतरवून फडकावला होता तिरंगा

India@75 : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीयाने थेट इंग्लंडमध्येच युनियन जॅक उतरवून फडकावला होता तिरंगा

फाळणीपूर्वी, युनायटेड इंडियाच्या स्काऊट टीमचे शेवटचे कर्णधार कुमार एनएन शाहदेव यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये ब्रिटनचा राष्ट्रध्वज खाली उतरवून तिरंगा फडकावला होता.

फाळणीपूर्वी, युनायटेड इंडियाच्या स्काऊट टीमचे शेवटचे कर्णधार कुमार एनएन शाहदेव यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये ब्रिटनचा राष्ट्रध्वज खाली उतरवून तिरंगा फडकावला होता.

फाळणीपूर्वी, युनायटेड इंडियाच्या स्काऊट टीमचे शेवटचे कर्णधार कुमार एनएन शाहदेव यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये ब्रिटनचा राष्ट्रध्वज खाली उतरवून तिरंगा फडकावला होता.

  नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. या दिवशी मध्यरात्री देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून स्वातंत्र्याची घोषणा केली आणि तिरंगा फडकवला. आज जगभरात उपस्थित भारतीय समुदायाचे लोक भारताच्या स्वातंत्र्याचा आनंदोत्सव उत्साहात साजरा करतात. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटनमध्येच युनियन जॅक उतरवून एका भारतीयाने तिरंगा फडकावला होता, याची तुम्ही कल्पना करू शकता. लंडनमधील इंडिया हाऊसवर युनियन जॅक फडकवण्यात आला 15 ऑगस्ट 1947 रोजी झारखंडचे कुमार नृपेंद्र नाथ शाहदेव (NN Shahdev) यांनी लंडनमधील इंडिया हाऊसवर युनियन जॅक (National Flag of Britain) उतरवून तिरंगा फडकावला. वास्तविक, शाहदेव भारतीय स्काउटिंग संघाचा कर्णधार होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी ते नेमके लंडनमध्ये उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी इंडिया हाऊसमध्ये कार्यक्रम आयोजित करून युनियन जॅकऐवजी तिरंगा फडकावला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुग्रह नारायण सिंह होते. ब्रिटनच्या सम्राट आणि राणीने या संघाचा गौरव केला कुमार नृपेंद्र नाथ शाहदेव हे जुलै 1947 मध्ये युनायटेड इंडियाच्या स्काउटिंग टीमसोबत फ्रान्समधील मोयझॉन येथे सहाव्या वायवेस परिषदेला गेले होते. संपूर्ण टीम कोलकाताहून समुद्रमार्गे स्ट्रॅथमोर जहाजातून फ्रान्सला गेली. शाहदेव यांना जागतिक परिषदेत सर्वोत्कृष्ट स्काउटिंगचा सन्मान बुशमन थॉन्ग्स प्रदान करण्यात आला. भारतीय संघाला ब्रिटनचे सम्राट किंग जॉर्ज-6 आणि महाराणी क्वीन मेरी यांनी दुसरे स्थान मिळविल्याबद्दल ट्रॉफी दिली होती. पंडित नेहरूंनी स्काऊट टीमला स्वातंत्र्याचे वाहक म्हटले होते शाहदेव ब्रिटिश भारताच्या स्काउटिंग संघातील शेवटचा आणि स्वतंत्र भारताचा पहिला कर्णधार होता. नंतर फ्रान्सहून संघ परतल्यावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी संपूर्ण टीमला दिल्लीला बोलावले. पं. नेहरूंनी स्काऊट गाईडला स्वातंत्र्य वाहकांचा समूह म्हटले. एनएन शाहदेव यांचा मुलगा कुमार एएन शाहदेव यांनी एकदा सांगितले की, देशाच्या फाळणीचा परिणाम जागतिक परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सला गेलेल्या संयुक्त भारत संघावर झाला. देशाच्या फाळणीमुळे संघातील सदस्यांना मोठा धक्का बसला होता.

  India@75 : तिरंग्यात भगवा, पांढरा अन् हिरवा रंगच का? ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील

  ...अन् फ्रान्सला जाणारी युनायटेड इंडियाची स्काऊट टीम विभागली गेली भारत-पाकिस्तानच्या नावावर संघाची विभागणी करण्याच्या प्रश्नावरून सदस्यांमध्ये वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये कुमार एनएन शाहदेव यांना सदस्य करण्यात आले. संयुक्त भारताचा संघ भारत आणि पाकिस्तानच्या नावाने शांततेत विभागला गेला. फ्रान्सला गेलेल्या युनायटेड इंडिया संघातील निम्मे सदस्य भारतात परतलेच नाहीत. फाळणीनंतर तयार झालेल्या पाकिस्तान संघाचे सदस्य फ्रान्समधून थेट कराचीला गेले होते.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Independence day

  पुढील बातम्या