Home /News /explainer /

Gallantary Awards | कसे आणि कोणाला दिले जातात शौर्य पुरस्कार, सामान्य व्यक्तीलाही मिळू शकतो का?

Gallantary Awards | कसे आणि कोणाला दिले जातात शौर्य पुरस्कार, सामान्य व्यक्तीलाही मिळू शकतो का?

Gallantary Awards: प्रजासत्ताक दिनी टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता 4 राजपुताना रायफल्सचे सुभेदार नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यांना परम विशिष्ट सेवा पदक प्रदान केले जाईल. 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या 384 पुरस्कारांमध्ये 12 शौर्य चक्र, 29 परम विशिष्ट सेवा पदक, 4 उत्तम युद्ध सेवा पदक, 53 अति विशिष्ट सेवा पदक, 13 युद्ध सेवा पदक यांचा समावेश आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 जानेवारी : प्रजासत्ताक दिनी (Republic Day Gallantry Awards) शौर्य पुरस्कार मिळालेल्या वीरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यंदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 384 जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता 4 राजपुताना रायफल्सचे सुभेदार नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यांना परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात येणार आहे. 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 384 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर पहिले तीन शौर्य पुरस्कार म्हणजे परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र भारत सरकारने 26 जानेवारी 1950 पासून देण्यास सुरुवात केली. या पुरस्कारांची सुरुवात कशी आणि का झाली? त्यानंतर, 4 जानेवारी 1952 रोजी इतर तीन शौर्य पुरस्कार जसे की अशोक चक्र श्रेणी-I, अशोक चक्र श्रेणी-II आणि अशोक चक्र श्रेणी-III भारत सरकारने 15 ऑगस्ट 1947 पासून लागू केले. जानेवारी 1967 मध्ये या पुरस्कारांचे अनुक्रमे अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र असे नामकरण करण्यात आले. हे शौर्य पुरस्कार वर्षातून दोनदा प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी जाहीर केले जातात. या पुरस्कारांचा अग्रक्रम म्हणजे परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र आणि शौर्य चक्र असा आहे. परमवीर चक्र कोणाला दिले जाते: परमवीर चक्र हे शत्रूंच्या विरोधात शौर्य आणि बलिदानासाठी दिले जाणारे भारतातील सर्वोच्च शौर्य लष्करी सन्मान आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये हा सन्मान मरणोत्तर दिला जातो. महावीर चक्र कोणाला दिले जाते: महावीर चक्र हे भारताचे युद्धकालीन शौर्य पदक आहे. हा सन्मान सैनिक आणि नागरीकांना अपवादात्मक असामान्य शौर्य किंवा बलिदानासाठी दिला जातो. ते मरणोत्तरही दिले जाऊ शकते. हे प्राधान्य क्रमाने परमवीर चक्रानंतर येते. ..अन् 'त्या' घटनेनंतर विनोबा भावे यांनी सुरू केली भूदान चळवळ! काय होती घटना? वीर चक्र कोणाला दिले जाते: वीर चक्र हे भारताचे युद्धकालीन शौर्य पदक आहे. हा सन्मान सैनिकांना असामान्य शौर्यासाठी किंवा बलिदानासाठी दिला जातो. ते मरणोत्तरही दिले जाऊ शकते. त्याचा क्रमांक प्राधान्यक्रमात महावीर चक्रानंतर येतो. अशोक चक्र कोणाला दिले जाते: 'अशोक चक्र' हा शांततेच्या काळात दिला जाणारा शौर्य सन्मान आहे. हे युद्धाव्यतिरिक्त शौर्य आणि बलिदानासाठी दिले जाते. कीर्ति चक्र कोणाला दिले जाते: कीर्ती चक्र हे भारताचे शांतताकालीन शौर्य पदक आहे. हा सन्मान सैनिक आणि नागरीकांना असामान्य शौर्य किंवा बलिदानासाठी दिला जातो. ते मरणोत्तरही दिले जाऊ शकते. प्राधान्याने ते महावीर चक्रानंतर येते. शौर्य चक्र कोणाला दिले जाते: शौर्य चक्र हे भारताचे शांतताकालीन शौर्य पदक आहे. हा सन्मान सैनिक आणि नागरीकांना असामान्य शौर्य किंवा बलिदानासाठी दिला जातो. ते मरणोत्तरही दिले जाऊ शकते. प्राधान्याने ते कीर्ती चक्रानंतर येते. वितरण समारंभ राष्ट्रपती भवनात दरवर्षी संरक्षण वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्या प्रसंगी पुरस्कार विजेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांना शौर्य पुरस्कार दिले जातात. इतर काही डिफेन्स डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस अवॉर्ड्सही यावेळी दिले जातात. मात्र, दोन पुरस्कार परमवीर चक्र आणि अशोक चक्र हे असे पुरस्कार आहेत जे प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या निमित्ताने पुरस्कार विजेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांना राजपथावर दिले जातात.
    Published by:Rahul Punde
    First published:

    पुढील बातम्या