मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Russia Vs Ukraine | या 5 मोठ्या कारणांमुळे रशिया युक्रेनवर नाराज झाला अन् परिस्थिती युद्धापर्यंत गेली

Russia Vs Ukraine | या 5 मोठ्या कारणांमुळे रशिया युक्रेनवर नाराज झाला अन् परिस्थिती युद्धापर्यंत गेली

1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनाने युक्रेन (Ukraine) स्वतंत्र झाला. मात्र, त्यानंतर रशियाशी (russia) त्यांचे संबंध बिघडत गेले. रशियाला युक्रेनच्या अनेक गोष्टी आवडल्या नाही. याचा अर्थ युक्रेनचा कल युरोपियन युनियन आणि नाटो देशांकडे आहे. त्याचवेळी अमेरिका आणि त्याच्या नाटो देशांनी चारही बाजूंनी घेरले जात असल्याचा धोका रशियाला जाणवत आहे.

1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनाने युक्रेन (Ukraine) स्वतंत्र झाला. मात्र, त्यानंतर रशियाशी (russia) त्यांचे संबंध बिघडत गेले. रशियाला युक्रेनच्या अनेक गोष्टी आवडल्या नाही. याचा अर्थ युक्रेनचा कल युरोपियन युनियन आणि नाटो देशांकडे आहे. त्याचवेळी अमेरिका आणि त्याच्या नाटो देशांनी चारही बाजूंनी घेरले जात असल्याचा धोका रशियाला जाणवत आहे.

1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटनाने युक्रेन (Ukraine) स्वतंत्र झाला. मात्र, त्यानंतर रशियाशी (russia) त्यांचे संबंध बिघडत गेले. रशियाला युक्रेनच्या अनेक गोष्टी आवडल्या नाही. याचा अर्थ युक्रेनचा कल युरोपियन युनियन आणि नाटो देशांकडे आहे. त्याचवेळी अमेरिका आणि त्याच्या नाटो देशांनी चारही बाजूंनी घेरले जात असल्याचा धोका रशियाला जाणवत आहे.

पुढे वाचा ...
    मोस्को, 24 फेब्रुवारी : अखेर रशियाने (russia) युक्रेनवर (Ukraine) हल्ला केला आहे. 2014 मध्ये युक्रेनमध्ये झालेल्या उठावात 130 हून अधिक लोक मारले गेल्यानंतर दोघांमधील तणाव सुरू झाल्याचे मानले जाते. यानंतर रशिया समर्थक राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यांकोविच (Viktor Yanukovych) यांना देश सोडून रशियात पळून जावे लागले. यामुळे रशिया खवळला होता. मग जसजसे युक्रेन युरोपियन युनियन (European Union) आणि नाटोकडे (NATO) झुकायला लागला, तसतसे रशियाच्या भुवया उंचावू लागल्या. पुतिन युक्रेनला थांबण्याचा इशारा देत राहिले. आता अनेक मुद्द्यांची सरमिसळ होऊन हे प्रकरण इतके मोठे झाले आहे की दोन्ही देश रणांगणात आमने-सामने उभे ठाकले आहे. यामागची काही कारणे सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर सर्व विविध राष्ट्रांमधील ताणलेले संबंध आणि अस्वस्थता ही आहेत. या उदयोन्मुख देशांमध्ये कुठेतरी तणाव होता तर कुठे आक्रमकता होती. रशियाशी त्यांचे संबंध अधिक दादागिरी सारखे वाटत होते. दीड दशकापूर्वी सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशिया स्वतःच डळमळीत झाला होता. पण, कसाबसा तो सावरला आणि त्याने आर्थिक आणि लष्करी शक्ती एकत्र करून एक मोठी शक्ती म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 2014 सालचा विद्रोह 2013 च्या उत्तरार्धात, युक्रेनमध्ये बंडखोरी सुरू झाली, ज्याला सन्मानाची क्रांती (Revolution of Dignity) म्हणून ओळखले जाते. याला मेडेन रिव्होल्यूशन असेही म्हणतात. रशिया समर्थक राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यांकोविच यांचे सरकार उलथवून टाकणे ही त्यांची प्रमुख मागणी होती. खरे तर यांकोविचने युरोपियन युनियनमध्ये सामील होण्यास आणि मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. याच्या निषेधार्थ संपूर्ण देशात असंतोष सुरू झाला. ठिकठिकाणी हिंसाचार, निदर्शने आणि पोलिसांशी चकमक सुरू झाली. त्यात 130 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यात 18 पोलीस अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. कालांतराने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष यांकोविच आणि संसदेतील विरोधी पक्षनेते यांच्यात एक करार झाल्यावर हे बंड संपले. त्यानुसार नव्याने निवडणुका होतील आणि निवडणुका होईपर्यंत अंतरिम एकत्रित सरकार कामकाज सांभाळणार. या करारानंतर दुसऱ्याच दिवशी यांकोविच संसदेला सामोरे न जाता देश सोडून रशियाला पळून गेले. हा ठराव संसदेत बहुमताने मंजूर करण्यात आला आणि यांकोविच यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. ना यांकोविचला ते मान्य झाले, ना रशियाला हे सर्व आवडले. रशियाच्या मते हे पाऊल बेकायदेशीर होते. रिपोर्टिंग दरम्यान आला रशियाच्या Fighter Jet चा भयंकर आवाज, पाहा LIVE VIDEO सोव्हिएत संघाची बाजू बदलणाऱ्या देशांवर नाराजी सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर अनेक माजी सोव्हिएत देशांनी एकामागून एक बाजू बदलली. अनेक जण युरोपियन युनियनमध्ये गेले तर अनेकांना नाटोची सदस्यता घेतली. यामध्ये ते बाल्टिक देश देखील होते, जे एकेकाळी सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट सरकारच्या इशाऱ्यावर नाचत होते. रशिया अशा प्रत्येक हालचालींकडे स्वतःला वाढणारा धोका म्हणून पाहत होता. युक्रेनलाही रशिया, युरोपियन युनियन आणि नाटो यांच्यात समतोल साधण्याऐवजी युरोपियन युनियन आणि नाटोसोबत आपले भविष्य पाहायचे होते. वेढलं जाण्याची रशियाला भिती 2004 मध्ये, चेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लाटविया, लिथुआनिया, पोलंड आणि स्लोव्हाकिया युरोपियन युनियनमध्ये सामील झाले. यानंतर बल्गेरिया आणि रोमानियाने 2007 मध्ये असेच केले होते. रशियाला वाटले की युक्रेननेही असे केले तर त्याच्याभोवती काळ्या समुद्रासह एक नवीन भिंत बांधली जाईल आणि त्यांना वेढले जाईल. रशियाचे शेजारी दक्षिण कोरिया आणि जपान हे आधीच अमेरिकेचे खास मित्र आहेत, ही गोष्ट महत्वाची आहे. या सर्व घडामोडींमुळे रशिया संतापली. या कारणास्तव, त्याने युक्रेनमधील डोनेस्तक आणि लुहान्स्कमध्ये बंडखोरांना मदत करण्यास सुरुवात केली. व्लादिमीर पुतिन यांचे विशेष विमान म्हणजे अभेद्य किल्ला! युक्रेनमध्ये 2019 साली संविधान बदलले 2019 मध्ये युक्रेनने देशाला धोरणात्मकदृष्ट्या युरोपियन युनियन (EU) आणि नाटो (NATO) सदस्यत्वाच्या जवळ आणण्यासाठी संविधान बदलले. याच्या निषेधार्थ 2021 आणि 2022 मध्ये रशियन सैन्य सीमेवर आले आणि दोन्ही देशांमध्ये तणाव सुरू झाला. या साऱ्या तणावात अमेरिकेनेही मधे उडी घेतली. अमेरिकेने युक्रेनला मदत तर दिलीच पण शस्त्रेही देऊ केली. युक्रेनला त्याच्या प्रभावाखाली ठेवण्याचा हट्ट अर्थात आता युक्रेन ज्या ठिकाणी उभा आहे, तो रशियाच्या हातून केव्हाच निसटला आहे, पण त्यांच्या प्रभावातून हा देश बाहेर पडावा असं पुतिन यांना वाटत नाही. या कारणास्तव, प्रथम त्यांनी क्रिमिया, युक्रेनचा एक भाग जबरदस्तीने रशियाला जोडला, नंतर आता डोनेस्तक आणि लुहान्स्क स्वतंत्र घोषित करुन मान्यता दिली. एकंदरीत मुद्दा असा आहे की, युक्रेन नाटोमध्ये गेल्यास रशियाच्या शेजारी एक देश विकसित होईल, जो नाटो आणि अमेरिकेच्या प्रभावाखाली असेल आणि त्यांच्यासाठी ती अस्वस्थ परिस्थिती असेल, असे पुतीन यांना वाटते. वास्तविक आता युक्रेनमध्ये रशिया आणि पुतिन यांचा सर्वाधिक द्वेष केला जातो. युक्रेनचे सरकारही रशियाच्या विरोधाता आहे, ते अमेरिकन प्रभाव असलेले सरकार मानले जाते.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Russia, Russia Ukraine

    पुढील बातम्या