बिग बाॅसचा राडा, सलमानच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

बिग बाॅसचा राडा, सलमानच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

झुबेर खानने आता बिग बाॅसचा होस्ट अर्थात सलमान खानविरोधात तक्रार दाखल केलीये.

  • Share this:

09 आॅक्टोबर : बिग बाॅसच्या या हंगामात घरात राडा कमी काय आता तो थेट रस्त्यावर येऊन पोहोचलाय. झुबेर खानने आता बिग बाॅसचा होस्ट अर्थात सलमान खानविरोधात तक्रार दाखल केलीये.

बिग बॉसच्या घरात कधी काय घडेल याचा नेम नाही, भांडणं तर रोजच होतात पण काही भांडणं इतकी विकोपाला जातील असं कदाचित प्रेक्षकांनाही नसेल वाटलं..पण तेच झालं...वीकेण्ड का वार मध्ये हा वार बसला थेट झुबेर खानवर..

स्वत:ला दाऊदची बहीण हसिना पारकरचा जावई असल्याचं सांगणाऱ्या झुबेर खानवर सलमान भडकला. खोटी ओळख सांगून फसवणाऱ्या झुबेरला सलमानने फैलावर घेतलं.

यानंतर झुबेर खान सलमानला भाई म्हणायला लागला तर सलमानचा पारा आणखीनच चढला..मला भाई म्हणू नकोस...

वीकेण्ड का वार चांगलाच गाजला.. हे कमी होतं की काय, झुबेरने हा अपमान सहन न होऊन झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि निराश होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सुदैवानं तो वाचला. यानंतर झुबेर खाननं सलमान खानविरोधात अँटॉप हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बिग बॉसचा होस्ट सलमान खान यानं अपशब्द वापरत आपल्याला धमकी दिल्याचा आरोप झुबेर खाननं केलाय.

आता हे प्रकरण कोणत्या थराला जाईल हे येणा-या दिवसातंच कळेल.

First published: October 9, 2017, 10:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading