मुंबई, 08 मार्च : झोया अख्तरचा गली बाॅय सिनेमा सुपरडुपर हिट झाला. त्यातल्या रॅपर्सचे फॅन्स देशातच नाहीत, तर परदेशातही आहेत.
हाॅलिवूड स्टार विल स्मिथनं काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवर सिनेमाचं कौतुक करत त्यातला व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर WWE कुस्तीपटू जाॅन सेनानंही इन्स्टाचं प्रोफाइल 'अपना टाइम आयेगा'नं सजवलंय.
त्यानं लिहिलंय, इन्स्टाग्रामवर तुमचं स्वागत असो. या इमेजीस काहीही न सांगता मी पोस्ट करतोय. एंजाॅय. सेनानं फोटोला काहीच कॅप्शन दिलेली नाही.
सेनानं हे काही पहिल्यांदा केलेलं नाही. याआधीही त्यानं भारतीय कलाकारांचे फोटो शेअर केलेत. त्यात शाहरुख खान, दलेर मेहंदी, कपिल शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमही होती.
चार दिवसापूर्वी त्यानं शाहरुख खानचा फोटो शेअर केला. त्यावर त्यानं असं लिहिलंय, स्वप्न पाहणं पुरेसं नसतं, त्यासाठी काही जुन्या गोष्टी सोडून द्यावा लागतात.
#FitnessFunda : जान्हवी कपूरला कसलं आहे अॅडिक्शन?