Home /News /entertainment /

Zombivli Trailer: मराठीतला कॉमेडी थ्रिलर असा असेल? अमेय वाघ आणि ललित प्रभाकरचा हटके अंदाच चर्चेत

Zombivli Trailer: मराठीतला कॉमेडी थ्रिलर असा असेल? अमेय वाघ आणि ललित प्रभाकरचा हटके अंदाच चर्चेत

झोंबिवली या मराठी सिनेमाचा (Zombivli Trailer) ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हॉरर पण काही धमाल असाच या ( Zombivli )सिनेमाचा ट्रेलर आहे.

    मुंबई, 18 जानेवारी- झोंबिवली या मराठी सिनेमाचा (Zombivli Trailer) ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हॉरर पण काही धमाल असाच या ( Zombivli )सिनेमाचा ट्रेलर आहे. ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा देखील याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात मराठीतील तगडी स्टारकास्ट दिसत आहे. आदित्य सरपोतदार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या 26 जानेवारी रोजी हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर पाहून सिनेमा पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्यात निर्माण झाली आहे. अभिनेता अमेय वाघ, ललित प्रभाकर, तृप्ती खामकर, जानकी पाठक आणि वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत आहेत. पहिल्यांदाच अमेय वाघ (Amey Wagh), असेल किंवा ललित प्रभाकर (Lalit Prabhakar)  यांचा हटके अंदाज या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. झोंबीवर आधारित असलेला हा पहिला चित्रपट आहे. यात झोंबी बनलेले बरेच जण अमेय आणि ललितच्या मागावर आहेत.महेश अय्यर, साईनाथ गणूवाद, सिद्धेश पूरकर, योगेश जोशी यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. वाचा-प्रिया बापटनं नवरा उमेशचं ओव्हरसाईज स्वेटर घालून केलं फोटोशूट नेमके या ट्रेलरमध्ये आहे तरी काय? झोंब्यांची तक्रार घेऊन अमेय वाघ आणि वैदही परशुरामी पोलिस स्टेशनमघ्ये पोहचले आहेत. झोंब्यांनी संपूर्ण डोंबिवली शहराला वेढलंय असं त्याचं म्हणणं आहे. यामध्ये अभिनेता ललित प्रभाकरसुध्दा एका वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. पण नेमका काय गोंधळ सुरु आहे हे कळत नाही. काहीसा हॉरर आणि तितकाच धमाल उडवून देणार हा ट्रेलर आहे. त्यामुळे सिनेमा कसा असाणार याबद्दल आधिक उत्सुकता आहे. ट्रेलमधील काही सीन भीतीदायक वाटतात तर काही संवाद हासायला भाग पाडतात. आता सिनेमा पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार हे नक्की आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment

    पुढील बातम्या