Zomato सिंगरचा व्हिडिओ व्हायरल; डिलिव्हरी बॉय झाला देशभरात फेमस!

गुहावटीतील Zomato डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 04:11 PM IST

Zomato सिंगरचा व्हिडिओ व्हायरल; डिलिव्हरी बॉय झाला देशभरात फेमस!

गुहावटी, 18 ऑगस्ट : तुम्हाला जर जुनी गाणी ऐकायची सवय किंवा आवड असेल तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुमचं मन नक्कीच जिंकेल. गुहावटीतील एका व्यक्तीनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एक फुड डिलिव्हरी बॉय गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय ठरत आहे.

अनिर्बन चक्रवर्ती नावाच्या या व्यक्तीनं मागच्या आठवड्यात झोमॅटो (Zomato) या फुड अ‍ॅपवरून जेवण ऑर्डर केलं होतं. सहज म्हणून त्या डिलिव्हरी बॉयचं प्रोफाइल चेक करताना त्या मुलाला गाण्याची आवड असल्याचं अनिर्बन यांनी वाचलं. या मुलाचं नाव प्रणजित हलोई असं त्या  मुलाचं नाव आहे. जेव्हा हा मुलगा ऑर्डर घेऊन त्यांच्या घरी आला त्यावेळी त्यांनी या मुलाला गाणं गाण्याची विनंती केली. यावेळी प्रणजितनं 'गोरी तेरा गाव बडा प्यारा' हे 1976 मध्ये रिलीज झालेल्या 'छिछोर' या सिनेमाती गाणं गायलं. त्याचा हा व्हिडीओ अनिर्बन यांनी त्याच्या फेसबुकवर शेअर केला.

ख्रिस गेलच्या एक्स गर्लफ्रेंडला बॉलिवूडचा 'हा' दिग्दर्शक पाठवायचा अश्लील मेसेज

अनिर्बन यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं, 'सादर करत आहे प्रणजित हलोई ( झोमॅटो डिलिव्हरी बॉय जो माझ्या घरी ऑर्डर घेऊन आला होता. ) मी त्या अ‍ॅपवर याचं प्रोफाइल पाहिलं. त्यानं त्यांच्या बायोमध्ये त्याला भविष्यात गायक व्हायचं असल्याचं लिहिलं आहे. म्हणून मी हे वाचल्यावर ठरवून त्याला गायला सांगितलं. मी त्याचा व्हिडीओ बनवला. माझी सर्वांना विनंती आहे की, सर्वांनी हा व्हिडीओ पाहा आणि प्रणजितला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत करा.

Loading...

डोली लेके आना...! 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला दबंग सलमानसोबत करायचंय लग्न

अनिर्बन यांनी त्यांच्या फेसबुकवर शेअर केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. या व्हिडीओला जवळपास 9,400 लोकांनी लाइक केला आहे तर 7,400 लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय अनेकांनी या व्हिडीओवर सकारात्माक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'बहोत हार्ड'ची हॉट Tik Tok स्टार आता करणार Bigg Boss 13 मध्ये एंट्री?

काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर गाण्याऱ्या एका आजींचा व्हिडीओ अशाच प्रकारे शोल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर त्यांचा मेकओव्हर करण्यात आला आणि यामुळे त्या त्यांच्या कुटुंबीयांनाही भेटू शकल्या.

========================================================================

SPECIAL REPORT: माणसाच्या संगतीत बोकड गेला वाया, पाल्याऐवजी खर्रा खाण्याचं व्यसन!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 04:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...