मुलांची जबाबदारी झटकणं अभिनेत्रीला पडलं महागात; मनोरंजनसृष्टीतून झाली हकालपट्टी

मुलांची जबाबदारी झटकणं अभिनेत्रीला पडलं महागात; मनोरंजनसृष्टीतून झाली हकालपट्टी

मुलांची जबाबदारी झटकणाऱ्या अभिनेत्रीला होणार तुरुंगवास? मालिका आणि चित्रपटांमधून काढलं बाहेर

  • Share this:

मुंबई 26 मार्च: मायानगरी ही कुठल्याही देशातील असो, घटना, प्रसंग, वादविवाद आणि चर्चा या जवळपास सारख्याच असतात. चीनमधील या अभिनेत्रचीच बातमी घ्या ना... जेंग श्वांग (Zheng Shuang) ही चीनमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जगभरात तिचे लाखो फॅन फॉलोअर्स आहेत. परंतु एका चूकीमुळं यशाच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीची लोकप्रियता हळूहळू ढासळू लागली आहे. जेंगनं आपल्या मुलांची जबाबदारी झटकली. त्यामुळं तिला मालिका आणि चित्रपटांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

जेंगचा एक्स बॉयफ्रेंड यानं अलिकडेच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यानं तिच्यावर गंभीर आरोप केले होते. तो म्हणाला, “मी जेंगच्या दोन मुलांचा साभाळ करतोय. सरोगसीच्या माध्यमातून तिला दोन मुलं झाली होती. परंतु ब्रेकअप झाल्यापासून या मुलांचा सांभाळ मलाच करावा लागत आहे. परिणामी अमेरिकेतून चीनमध्ये मला परतता येत नाही आहे. याबाबत मी जेंगशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु तिनं आपल्या मुलांची जबाबदारी झटकली आहे.”

या आरोपांमुळं चीनमधील प्रेक्षक खवळले अन् त्यांनी जेंगवर टीका करण्यास सुरुवात केली. त्यांनी तिच्या चित्रपट आणि मालिकांवर बंदी घालण्याची देखील मागणी केली. अखेर संतापलेल्या प्रेक्षकांच्या रोषातून वाचण्यासाठी निर्मात्यांनी थेट जेंगला मालिकांमधून बाहेर काढलं. शिवाय आगामी प्रोजेक्टमधून देखील तिची हकालपट्टी करण्यात आली. A Chinese Ghost Story या मालिकेतील जेंगचे सगळे सीन काढून टाकण्यात आले आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे काही निर्मात्यांनी तर जेंगचा चेहरा एडिट करुन त्याठिकाणी दुसऱ्या लोकप्रिय अभिनेत्रींचा चेहरा लावण्यास सुरुवात केली आहे. या सर्व प्रकारामुळं रातोरात जेंग श्वानचं करिअर जणू उध्वस्त झालं आहे. चीनमधील प्रशासन सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. परंतु चौकशी सुरु असेपर्यंत अभिनेत्रीला मनोरंजनसृष्टीमधूनच ब्लॅक लिस्ट करण्यात आलं आहे. शिवाय तिचं प्रलंबित मानधन देखील रोखण्यात यावं असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

First published: March 26, 2021, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading