मुंबई, 10 ऑक्टोबर : बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाल्यानंतर टीव्ही अभिनेता झीशान खान (Zeeshan Khan) चर्चेत आला आहे. नुकतेच झीशानने एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये त्याला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याचा एक वाईट अनुभव त्याने सांगितला आहे. त्याच्या दुसऱ्या शोनंतर त्याच्यासोबत ही सगळं घडल्याचे त्याने सांगितले आहे.
झूमसोबत बोलताना झीशान म्हणाला की, एका कास्टिंग डायरेक्टरने त्याला भेटण्यासाठी ऑफीसला बोलावले होते. त्यावेळी त्या डायरेक्टर मला म्हणाला होता की , तू शारीरिक दृष्ट्या किती फीट आहेस हे मला बघायचे आहे. आणि तेव्हा मला त्यांनी शर्ट काढण्यासाठी सांगितला. मी लगेच त्यांच्या बोलण्याला सहमती देखील दर्शवली असल्याचे त्याने यावेळी सांगितले.
View this post on Instagram
पुढे झीशान म्हणला की, मी हे करू शकतो म्हणत मी त्यांना टी शर्ट काढतो असे सांगितले. मात्र त्यानंतर त्यांनी मला तुझे पाय बघायचे आहे असे सांगितले. तसेच ते असे देखील म्हणाले की बहुतेक लोक हे शरीराचे वरच्या भागावर फक्त मेहनत घेतात मात्र शरीराच्या खालच्या भागाकडे त्यांचे लक्ष नसते असे देखील ते मला म्हणाले होते असे झीशानने यावेळी सांगितले.
वाचा :ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये Mithun Chakraborty ची सून Madalsa sharma ने वाढवला सोशल मीडियाचा पारा
कास्टिंग डायरेक्टरचे हे वागणं पाहून झीशानच्या लक्षात आले होते की, यामध्ये नक्की काही तरी गोंधळ आणि गडबड आहे. यानंतर लगेच डायरेक्टर झीशानला म्हणाला की, अरे आता तरी तुला सर्व समजलेच असेल. यानंतर झीशानने देखील मला सर्व समजले आहे असे सांगितले. तसेच मी असे करू नाही शकत मला तुम्हाला काय म्हणायचे आहे हे समजले आहे मात्र मी अशा लोकांपैकी नाही. मी ऑडिशन देईल आणि हो तुमच्यासोबत मला काम करण्यास आवडेल देखील व मला तुमच्यासोबत काम करायचे आहे. मला या गोष्टींची पर्वा नाही.
View this post on Instagram
झीशानचे हे सगळं ऐकल्यानंतर कास्टिंग डायरेक्टर म्हणाले की अरे यार, आता त्याला समजले असावे. अभिनेताने आग्रह धरला की हो मला समजले आहे. पण मी ते करू शकत नाही. जीशान म्हणाला, 'मला सर समजले, पण मी त्या लोकांपैकी नाही. मी एक ऑडिशन देईन, मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल आणि मला अजूनही हवे आहे, मला या सगळ्याची पर्वा नाही. यावर डायरेक्टरने देखील माझ्यामुळे किती तरी जणांते करिअर झाल्याचे सांगितले. मात्र झीशान म्हणाला ती त्यांची पसंद होती मला असे कोणतेच काम करायचे नसल्याचे सांगितले.
वाचा :VIDEO : 'ही बया काय...'; उर्फी जावेदला विमानतळावर ट्रान्सपरंट ब्रालेटमध्ये पाहून नेटकरी भडकले
या सगळ्या प्रकारानंतर त्या डायरेक्टरने देखील झीशनला सांगितले की, पहिल्यांदा सगळे नाही म्हणतात. मात्र एका महिन्यानंतर काम मिळवण्यासाठी हो म्हणत असल्याचे देखील सांगितले. यावर झीशान म्हणाला टॅलेंटच्या आधारवर काम न मिळता दुसऱ्या एकाद्या चुकीच्या गोष्टीचा वापर करून काम मिळाले तर मी रात्रीचा सुखाने झोपू देखील शकणार नाही. काही काम नाही मिळाले तर मला साधे आयुष्य जगायले आवडत असल्याचे झीशानने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg Boss OTT, Bollywood News, Entertainment, Tv actors, TV serials, Tv shows