मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /झीनत अमानने का थाटलेला फ्लॉप अभिनेत्यासोबत संसार? दोन्ही लग्नातून अभिनेत्रीनं सोसल्या प्रचंड वेदना

झीनत अमानने का थाटलेला फ्लॉप अभिनेत्यासोबत संसार? दोन्ही लग्नातून अभिनेत्रीनं सोसल्या प्रचंड वेदना

झीनत अमान

झीनत अमान

झीनत अमानचे व्यावसायिक जीवन जितके यशस्वी होते तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवन काट्याने भरलेले होते. आयुष्यात दोन लग्न केलेल्या झीनतला खरे प्रेम मिळू शकले नाही आणि तिची दोनही लग्ने अयशस्वी ठरली.

मुंबई, 26 मे :  ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी एकेकाळी संपूर्ण इंडस्ट्रीला आपल्या सौंदर्याने वेड लावले होते. ही अभिनेत्री एक ट्रेंडसेटर होती. 70 आणि 80 च्या दशकात तिच्या ग्लॅमरस शैलीसाठी ओळखली जाणारी आणि इतर अभिनेत्रींवर वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून झीनत अमान यांची ओळख होती. सुपरस्टार अभिनेत्री होऊनही तिला प्रसिद्धी आणि पैसा कधीच पाहिजे  नव्हता. तिला आयुष्यात फक्त प्रेम हवे होते. पण सर्व काही करूनही तिने फक्त आणि फक्त यातना सहन केल्या. ही अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत होती. झीनत अमान यांना आयुष्यात कधीच प्रेम मिळाले नाही.

झीनत अमानचे व्यावसायिक जीवन जितके यशस्वी होते तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवन काट्याने भरलेले होते. आयुष्यात दोन लग्न केलेल्या झीनतला खरे प्रेम मिळू शकले नाही आणि तिची दोनही लग्ने अयशस्वी ठरली. संजय खानसोबतच्या वेदनादायक नातेसंबंधानंतर तिने फ्लॉप अभिनेत्याशी लग्न का केले याचा खुलासा तिने स्वतः केला होता.

झीनतने 1970 मध्ये हंगामा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि लवकरच तिने एक बिंदास अभिनेत्री म्हणून रुपेरी पडद्यावर राज्य करण्यास सुरुवात केली. जेव्हा झीनत पहिल्यांदा विवाहित संजय खानच्या प्रेमात पडली, पण या नात्यात तिला प्रेमापेक्षा जास्त यातना सहन कराव्या लागल्या. संजय खानने एकदा तिला हॉटेलच्या खोलीत इतकी मारहाण केली की तिच्या डोळ्याला जखम झाली आणि तिचा जबडाही तुटला. अभिनेत्रीने तिच्या द बिग मिस्टेक ऑफ माय लाइफ या चरित्रातही याचा खुलासा केला आहे.

कमल हासनसोबत झालं असतं श्रीदेवीचं लग्न; पण 'या' कारणासाठी अभिनेत्याने थेट दिलेला नकार

संजयसोबतच्या भांडणानंतर झीनत अमान 1979 मध्ये त्याच्यापासून विभक्त झाली. पण तरीही तिचा प्रेमाचा शोध सुरूच होता. स्टारडमच्या शिखरावर असताना झीनत अमान फ्लॉप हिरो असलेल्या मजहर खानच्या प्रेमात पडली. तिने त्याच्यासोबत लग्नही केलं. पण या लग्नातही तिला हवा तसा आनंद मिळू शकला नाही. या नात्यातही तिला फक्त वेदना मिळाल्या. तिने मजहर खानसारख्या फ्लॉप स्टारला जोडीदार म्हणून का निवडले याचा खुलासा अभिनेत्रीनेच केला.

सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीत या अभिनेत्रीने याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली होती, 'त्यावेळी मी कोणत्याही गोष्टीपेक्षा मातृत्वाकडे ओढले गेले होते. मला तेव्हा मुल पाहिजे होते. माझे लग्न करण्याचे हेच मुख्य कारण होते, कारण माझा विश्वास आहे की लग्न टाकण्याचं एकमेव कारण म्हणजे कुटुंब असणे. त्यावेळी मला त्याच्यासाठी तयार वाटले आणि म्हणून मी मजहरशी लग्न केले.

जेव्हा झीनत अमानला विचारण्यात आले की ती 80 च्या दशकातील यशस्वी स्टार होती, तेव्हा तिने मजहरसारख्या फ्लॉप अभिनेत्याशी लग्न का केले? यावर उत्तर देताना ती म्हणाली की, 'आता सांगणे कठीण आहे. मला वाटतं कधी कधी आपल्या आयुष्यात तुम्ही काही गोष्टींवर तोडगा काढू शकता. तुम्ही काही बदलांसाठी तयार असाल.आणि मग त्या वेळी तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती येते, तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्यात बसण्याचा प्रयत्न करता. '

झीनत अमानला मजहर खानपासून अजान खान आणि जहाँ खान यांची दोन मुले आहेत. मजहर खान आता या जगात नाही.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment