झीनत अमाननी केला व्यापाऱ्यावर बलात्काराचा आरोप; गुन्हा दाखल

झीनत अमाननी केला व्यापाऱ्यावर बलात्काराचा आरोप; गुन्हा दाखल

सरफराज उर्फ असं अमन खन्ना असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. आरोपी सरफराज उर्फ अमन खन्ना याला अटक करण्यात आली आहे. झीनत अमानने जानेवरीमध्ये अमन खन्ना विरोधात फसवणूक आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल केला होता.

  • Share this:

23 मार्च:  चंदेरी दुनियेची काळी किनार समोर आणणारी बातमी  आहे. ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमानने मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलं आहे.

सरफराज उर्फ असं  अमन खन्ना असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. आरोपी सरफराज उर्फ अमन खन्ना याला अटक करण्यात आली आहे. झीनत अमानने जानेवरीमध्ये अमन खन्ना विरोधात फसवणूक आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल केला होता. अमन घरी आला, त्याने माझ्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली. मग मला धमकावलं असं तिने तेव्हा तक्रारीत म्हटलं होतं. अमन व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लिल मॅसेज पाठवत असल्याचा आरोपही तिने केला होता. आता मात्र तिने सरळ बलात्काराचाच आरोप केला आहे.

काही दिवसांपूर्वी डेझी अभिनेत्रीने 6 वर्षांचंं असताना  सेटवर बलात्कार झाल्याचा खुलासा केला होता. या साऱ्यावरून महिला किती सुरक्षित चंदेरी दुनियेत  महिला किती  सुरक्षित आहेत हा प्रश्न निर्माण झालाय.

First published: March 23, 2018, 6:27 PM IST

ताज्या बातम्या