Home /News /entertainment /

खलनायक समरचे पडद्यामागे होतात असे हाल; मनू-अनिकेतने घेतली अशी फिरकी

खलनायक समरचे पडद्यामागे होतात असे हाल; मनू-अनिकेतने घेतली अशी फिरकी

पाहिले ना मी तुला मालिकेतील खलनायक खऱ्या आयुष्यात आहे बिचारा; सेटवर उडवली जाते त्याची अशी खिल्ली

  मुंबई 21 मे : झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘पाहिले न मी तुला’ (Pahile Na Mi Tula) सध्य्या वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. आता मनू (Manu) आणि अनिकेत (Aniket) खऱ्या अर्थाने एकमेकांचे झाले असून त्यांच्या संसाराची सुरुवात होत आहे. पण समर (Samar) मात्र नेहमीच त्यांच्या आयुष्यात काटे पेरण्याचं काम करतो. पण आता अनिकेत आणि मनूने समरची चांगलीच फिरकी घेतली आहे. मालिकेप्रमाणे समरच्या पडद्यामागेही खुरापती सुरूच असतात. पण यावेळी मनू आणि अनिकेतने त्याची मोठा फजिती केली आहे. त्यांचा एक व्हिडिओ सध्या प्रेक्षकांना फारच आवडत आहे. त्यात समरचा सिन सुरू आहे व त्याचा खलनायकी लूक तो देत आहे. पण त्याच्या बॅकग्राउंडला वाजणारं म्युझिक आनिकेत आणि मनू बोलत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ मालिकेच्या चाहत्यांना फारच आवडला आहे.
  याशिवाय समरच्या अन्य खुरापतीही सेटवर पहायला मिळतात. कधी तो अन्य कलाकरांना घाबरवतो तर कधी त्यांची गंमत करतो. याचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर फार चर्चेत असतात.
  एका व्हिडिओत समर सगळ्यानां एक नकली पाल घेऊन घाबरवत आहे. त्यामुळे मालिकेप्रमाणेच समर पडद्यामागेही आपल्या सहकलाकारांना घाबरवतो. त्यांचे हे मजेशीर व्हिडिओ त्यांचे चाहते मात्र खूप एन्जॉय करतात.

  सोज्वळ शालूचा Bold अवतार; पाहा राजेश्वरी खरातचं Hot फोटोशूट

  मालिकेत सध्या मानसी आणि अनिकेत ने त्यांच्या प्रेमाविषयी तसेच लग्नाविषयी घरच्यांना सांगितलं आहे. व त्यामुळे ते दोघेही आता एकत्र राहू लागले आहेत. तर मनू ही अनिकेतच्या घरी स्वतःला रुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय घरातील कामंही ती शिकत आहे. तेव्हा आता मनू आणि अनिकेतच्या गोड संसारात काही विघ्न तर येणार नाही ना हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या