• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • दबंग सलमान खानचा जलवा; Radhe रिलीज होताच अवघ्या काही तासांतच zee5 क्रॅश

दबंग सलमान खानचा जलवा; Radhe रिलीज होताच अवघ्या काही तासांतच zee5 क्रॅश

अभिनेता सलमान खानचा (Salman khan) बहुप्रतीक्षित चित्रपट ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted Bhai) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याची जादूही चालली.

 • Share this:
  मुंबई 13 मे : अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट आणि चित्रपटगृहं रिकामं असं कधी घडत नाही मात्र यावेळी कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर चित्रपटगृहं बंद आहेत. त्यामुळे नाइलाजाने वर्षभर वाट पाहिल्यानंतर चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावा लागला. पण इथंही सलमानची जादू पाहायला मिळाली. राधे (Radhe) ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरल रिलीज झाल्यानंतरही प्रेक्षकांचा प्रतिसाद मात्र तोच होता. त्यामुळे  zee5 चा सर्व्हरही क्रॅश (zee5 server crashed) झाला. अभिनेता सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted Bhai) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या वर्षभरापासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते मात्र चित्रपटगृह बंद असल्याने चित्रपटाचं प्रदर्शन रखडलं होतं. अखेर ईदच्या मुहूर्तावर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. Zee5 च्या झी प्लेक्स (Zee plex) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तसंच जगभरात विविध प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण मुख्य गोष्ट ही आहे की चित्रपट रिलीज झाल्याच्या काहीत तासांत zee5 चा सर्व्हर क्रॅश (zee5 server crashed) झाला.
  View this post on Instagram

  A post shared by ZEEPLEX (@zeeplexofficial)

  एकाचवेळी जगभरातील चाहत्यांनी, प्रेक्षकांनी राधे राहण्यासाठी लॉग इन केल्याने सर्वर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वर क्रॅश झाल्याने लॉग इन करूनही चित्रपट पाहता येत नव्हता. तेव्हा युझर्सनी लगेचच ट्वीट करून ट्रेंड करायला सुरुवात केली. तर अनेकांनी सलमान खानला टॅग करत चित्रपट दिसत नसल्याची तक्रार केली. हे वाचा -  नक्की कोणावर होणार कारवाई? श्वेता-अभिनवमधील वादात महिला आयोगाची एण्ट्री यानंतर काही वेळातच टेक्निकल टिमने ही समस्या सोडवली. त्यानंतर चित्रपट पाहता येणं शक्य झालं. मागील वर्षी सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ (Dil Bechara) हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. त्यावेळीही अशा प्रकारच्या समस्येला तोंड द्यावं लागलं होतं. सलमानने 250 कोटी रुपयांना हा चित्रपट zee5 ला विकला होता. त्यानंतर चित्रपट ओटीटीवर रिलीझ करण्यात आला. हे वाचा - ‘हा तर 53 वर्षांचा फ्लॅश’; Radhe मधील एण्ट्री पाहून उडवली जातेय सलमानची खिल्ली एका तिकिटाच्या किमतीत सगळ्या कुटुंबाला या चित्रपटाचा आनंद घेता येत आहे. अर्थात यामुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होणार आहे. पण सलमान खाननं हा धोका पत्करला आहे. कारण त्याचे आगामी चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज होत आहेत. राधेचे प्रदर्शन आणखी लांबलं असतं तर नंतर येणाऱ्या या चित्रपटांच्या प्रदर्शनावरही परिणाम झाला असता. सलमान खानच्या टायगर -3 चं शूटिंग सुरू झालं असून, कभी ईद कभी दिवाली आणि किक-2 हे दोन चित्रपटही येणार आहेत. सूरज बडजात्याच्या एका चित्रपटातही तो काम करणार आहे.
  Published by:News Digital
  First published: