मुंबई 3 ऑगस्ट : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) मध्ये नवं वळणं आलेलं दिसत आहे. मालविकाने अखेर तिचा डाव साध्य केलाय. तर आता संपूर्ण साळवी कुटुंब बेघर झालं आहे. स्वीटूच्या संपूर्ण कुटुंबाला आता रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. तर त्यांच्याकडे साधं पाणीही पिण्यासाठी नाही. पण आता स्वीटू एक निर्णय घेत आहे.
दरम्यान मालविकाने दादांकडून त्यांच्या घराचे पेपर्स घेतले होते. तर चिन्याच्या उपचारांसाठी त्यांनी घर गहाण ठेवलेलं असतं. उपचारांसाठी 8 लाख रुपये खर्च येणार असतो. त्यामुळे ते घर गहाण ठेवतात. पण मालविका काही गुंडा कडून साळवींना घर खाली करायला सांगते. तर याची कोणतीही कल्पना स्वीटूच्या कुटुंबियांना नसते. तर ते गुंड त्यांचं घरातील सगळं सामान उध्वस्त करत बाहेर फेकून देतात.
सोनाली कुलकर्णीचं Vacation सुरू; पतीसोबत या ठिकाणी घेतेय सुट्ट्यांचा आनंद
View this post on Instagram
साळवी कुटुंब (Salvi Family) अक्षरशः आता रस्त्यावर आहे. तेव्हा आता दादांनी सगळंकाही कुटुंबाला सांगून टाकलं आहे. तर दुसरीकडे शकू साळवींच्या घरी येते पण घर बंद असतं तेव्हा तिला सगळं काही प्रकार समजतो. रस्त्यात ती नलुला समजावून घरी येण्याची विनंती करते पण ती मात्र शकुवरच राग व्यक्त करत असते. तर दुसरीकडे स्वीटू मात्र मालविकाकडे पोहचली आहे. ती झालेल्या सगळ्या प्रकारचा आता मालविकाला जाब विचारणार आहे.
View this post on Instagram
स्वीटूही आता तिचा सौम्यपणा सोडत मालविकाला खडेबोल सुनावनार आहे. तेव्हा मालविका तिला ओमच्या आयुष्यातून निघून जाण्यास सांगते. त्यावर स्वीटू “मी त्याच्या आयुष्यातून निघून गेले तरी मनातून कसं घालवणार आहेस?” असा प्रश्न विचारते. तेव्हा आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial