• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अखेर स्वीटू-ओमचं लग्न होणार? नलुने पाठवला खानविलकरांकडे प्रस्ताव

अखेर स्वीटू-ओमचं लग्न होणार? नलुने पाठवला खानविलकरांकडे प्रस्ताव

नलूने आता ओम आणि स्वीटूच प्रेम स्वीकारलं आहे. व त्यांचं लग्नं लावून देण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

 • Share this:
  मुंबई 12 ऑगस्ट : झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nanadayla) मध्ये आता नवं वळण आलं आहे. अनेक दिवस स्वीटू (Sweetu) आणि ओमच्या (Om) प्रेमाला नकार देणारी नलू आता त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. तिने ओम आणि स्वीटूच्या लग्नालाही परवानगी दिली आहे. तर त्यासाठी ती आता खानविलकरांच्या घरी देखील गेली आहे. नलूने आता ओम आणि स्वीटूच प्रेम स्वीकारलं आहे. व त्यांचं लग्नं लावून देण्याचा निर्णय तिने घेतला आहे. तिने शकू आणि ओम च्या बाबांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे. पण हे ऐकून शकूला धक्का आणि आनंद दोन्ही होत आहे. तर दुसरीकडे मालविका मात्र नेहमी प्रमाणे संतापली आहे.
  शकू घरी येणार नाही याची सगळी व्यवस्था मालविकाने केली होती मात्र शकू आणि ओम घरी पोहोचतात. तेव्हा नलू शकुशी लग्नाविषयी बोलते. त्यामुळे लवकरच ओम स्विटूच्या लग्नाचा मुहूर्त निघणार असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान मागील काही दिवसांत मालविकाने साळवी कुटुंबियांना पुरेपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला. तर त्याआधी नलूने ओम ची परीक्षा घेतली होती. पण आता सगळं सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. व नलू ओम स्वीटूच लग्नं लावण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आता ओम आणि स्वीटूच लग्नं कधी होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान झी मराठी वाहिनीवर सध्या अनेक नव्या मालिकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका देखील बंद होणार का असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घोंगावत आहे. 'देवमाणूस', 'माझा होशील ना', ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिका बंद होणार असल्याचं जाहीर झालं आहे.
  Published by:News Digital
  First published: