मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'येऊ...नांदायला'च्या सेटवर स्वीटुला मिळाला भन्नाट केक; व्हिडिओ होतोय व्हायरल

'येऊ...नांदायला'च्या सेटवर स्वीटुला मिळाला भन्नाट केक; व्हिडिओ होतोय व्हायरल

अभिनेत्री अन्विता फलटणकरचा (Anvita Phaltankar) वाढदिवस असल्याने सेटवर धमाल करण्यात आली

अभिनेत्री अन्विता फलटणकरचा (Anvita Phaltankar) वाढदिवस असल्याने सेटवर धमाल करण्यात आली

अभिनेत्री अन्विता फलटणकरचा (Anvita Phaltankar) वाढदिवस असल्याने सेटवर धमाल करण्यात आली

  • Published by:  News Digital

मुंबई 3 जुलै : झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) मधील स्वीटू (Sweetu) म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकरचा (Anvita Phaltankar) वाढदिवस असल्याने सेटवर धमाल करण्यात आली

अभिनेत्री अन्विताचा 2 जुलै ला वाढदिवस होता. त्याचचं औचित्य साधत सेलिब्रेशन करण्यात आलं. यासाठी खास केक आणण्यात आला होता. ज्यावर स्विटूच्या आवडीचे पदार्थ दाखवण्यात आले होते.

रणवीर सिंग करणार छोट्या पडद्यावर पदार्पण; 'हा' शो घेऊन येतोय बॉलिवूड स्टार

वाढदिवसाचा हा धम्माल व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. मालिकेतील सगळेच कलाकार धम्माल करताना दिसत आहेत.

अन्विता आता 24 वर्षांची झाली आहे. तिच्या सोशल मीडिया वर तिने फोटो पोस्ट करत ‘मी आता 24’ असं कॅप्शन लिहिलं आहे.

मालिकेतील स्विटू आणि ओमची (Om) जोडी सुपरहिट ठरत आहे. तर आता खऱ्या अर्थाने ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.  त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही फारच आवडत आहे.

सध्या मालिकेत स्विटुला पाहायला एक मुलगा आला आहे. जो स्विटू सारखाच आहे. पण आपल्याला मुलगा पाहायला आलाय हे समजल्यावर स्विटू मात्र फारच नाराज होते. तेव्हा ओम आणि स्विटुच्या प्रेमात काही अडथळे तर येणार नाही ना हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

याशिवाय मालविका स्विटुने खानविलकरांच्या घरी येऊ नये यासाठी काही ना काही कारस्थानं करतच आहे. तर आता स्विटु जिथे काम करते त्या पार्लरवालीलाही मालविकाने आपल्या खिशात घातलं आहे. तेव्हा आता पुढे काय घडणार पाहमं रंजक ठरणार आहे.

First published:

Tags: Marathi entertainment, Zee marathi serial