Home /News /entertainment /

Tu Tevha Tashi: अनामिका-सौरभच्या नात्यामुळे मायलेकीत दुरावा; काय असेल राधाचा निर्णय?

Tu Tevha Tashi: अनामिका-सौरभच्या नात्यामुळे मायलेकीत दुरावा; काय असेल राधाचा निर्णय?

कावेरीचा सौरभ आणि अनामिकाच्या नात्याला विरोध आहे. म्हणून कावेरी राधाचे म्हणजेच अनामिकाच्या मुलीचे तिच्याविरुद्ध कान भरते. त्यामुळे राधा आणि अनामिका या माय-लेकीच्या नात्यात आता दुरावा निर्माण झाला आहे

  मुंबई, 5 जुलै: झी मराठीवरील ( Zee Marathi) 'तू तेव्हा तशी' ( Tu Tevha Tashi) हि मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत आता सौरभ आणि अनामिकाच्या ( Saurabh Anamika) नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. पण हे नातं सुरु होताना या दोघांना काही संकटांचा सामना  करावा लागणार हे निश्चित. मालिकेत वल्ली ( Valli) या खलनायिकेसोबतच अनामिकाची आई म्हणजेच कावेरीची ( Kaveri) एंट्री झालेली आहे. तेव्हापासून मालिकेला आणखीनच वेगळं वळण आलं आहे. कावेरीचा सौरभ आणि अनामिकाच्या नात्याला विरोध आहे. म्हणून कावेरी राधाचे म्हणजेच अनामिकाच्या मुलीचे तिच्याविरुद्ध कान भरते. राधाला ( Radha) अनामिकाविरुद्ध भडकावते आणि सौरभ - अनामिकाच्या नात्याविषयी चुकीच्या पद्धतीने माहिती देते. त्यामुळे राधा आणि अनामिका या माय-लेकीच्या नात्यात आता दुरावा निर्माण झाला आहे. हि झाली मालिकेची बॅकग्राउंड स्टोरी. पण खरा ट्विस्ट तर येणाऱ्या काळात प्रेक्षकांना बघायला मिळेल ( Tu Tevha Tashi Episode Update) झी मराठीने नुकताच या मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. त्यानुसार आता सौरभ खुद्द त्याच्या आणि अनामिकाच्या नात्याविषयी राधाला सांगणार आहे. राधाला वाटतं की, सौरभचं अनामिकावर एकतर्फी प्रेम आहे. त्यामुळे ती त्याला 'एकतर्फी प्रेम जास्त काळ टिकणार नाही',असं सांगते. परंतु सौरभ तिला अनामिकाचंही  त्याच्यावरती प्रेम आहे असे सांगतो. पण राधाचा त्यावर विश्वास बसत नाही. ती त्या दोघांचं  नातं  स्वीकारण्यास नकार देते. 'माझी मम्मा फक्त माझ्यावरच प्रेम करते आणि ती माझ्यासोबत खुश आहे' असं म्हणून राधा सौरभला समजावण्याचा प्रयत्न करतेय. पण सौरभ ठाम भूमिका घेऊन  'आम्ही तुझी परवानगी घेत नाही आहोत तर तुला सांगत आहोत' असं सांगतो.
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  हेही वाचा - 3-4 बायका माझ्यासमोर येऊन बसल्या अन् एकीनं... ; अभिनेत्यानं सांगितला 21 वर्षांपूर्वीचा तो विलक्षण अनुभव आता यानंतर मालिकेत सौरभ आणि अनामिका यांचं आयुष्य कोणतं नवीन वळण घेणार?  राधा या दोघांच्या नात्याला परवानगी देईल का?  तसेच अनामिकाची आई कावेरी काय नवीन गोंधळ घालते?  हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. 'तू तेव्हा तशी' ची सेंच्युरी स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने काही काळातच प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. पट्या आणि मिस अनामिकांची जोडी प्रेक्षकांना भावली होती.  या मालिकेने शंभर भाग पूर्ण केले असून आज म्हणजे ५ जुलै रोजी  या मालिकेचा शंभरावा भाग प्रदर्शित होणार आहे. तर मालिकेला भरभरून प्रेम दिलंत म्हणत स्वप्नील जोशीने प्रेक्षकांचे  आभार मानले आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या