• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘ती परत आलीये’ या मालिकेत कुणी तरी येणार येणार गं... ; हणम्या आणि टिक्याचा डोहाळे जेवण स्पेशल VIDEO पाहिला का ?

‘ती परत आलीये’ या मालिकेत कुणी तरी येणार येणार गं... ; हणम्या आणि टिक्याचा डोहाळे जेवण स्पेशल VIDEO पाहिला का ?

सध्या सोशल मीडायावर झी मराठीवर नव्याने सुरू झालेल्या ‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliya ) या मालिकेची चर्चा सुरू आहे. आता या मालिकेत एका नव्या चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या कुणी तरी येणार गं...ची चर्चा आहे. प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की, ‘ती परत आलीये’ या (Ti Parat Aaliya serial Latest Update)मालिकेत नेहमी तो की तीची एंन्ट्री होणार आहे. गंभीर असलेली ही मालिका आता या नव्या पाहुण्यामुळे मजेशीर होणार का, असा देखील प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 सप्टेंबर 2021 ;   सध्या सोशल मीडायावर झी मराठीवर नव्याने सुरू झालेल्या ‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliya ) या मालिकेची चर्चा सुरू आहे. आता या मालिकेत एका नव्या चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या कुणी तरी येणार गं...ची चर्चा आहे. प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की, ‘ती परत आलीये’ या (Ti Parat Aaliya serial Latest Update)मालिकेत नेहमी तो की तीची एंन्ट्री होणार आहे. गंभीर असलेली ही मालिका आता या नव्या पाहुण्यामुळे मजेशीर होणार का, असा देखील प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या मालिकेत रोहिणीची व्यक्तिरेखा ही गरोदर म्हणजे तिला डोहाळे लागले आहेत. रिसॉर्टवर अडकल्यापासून या सर्व मित्र मैत्रिणींच्या आयुष्यात खूप काही घडतं आहे. त्यात रोहिणी गरोदर असल्यामुळे तिची काळजी सगळ्यांनाच आहे. त्यामुळे तिचं डोहाळे जेवण करण्याचं सर्वजण ठरवतात. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम म्हटल की सर्वांच्या डोळ्यासमोर आणि तोंडात एकच गाण येते. ते म्हणजे मराठी चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’ मधील कुणी तरी येणार येणार गं... या गाण्याशिवाय या कार्यक्रमाला शोभाच नाही. वाचा : ढाले- पाटलांच्या 'ही' व्यक्ती करणार अपर्णाचा खून? Raja Rani Chi Jodi पुन्हा नव्या संकटात... झी मराठीने इन्स्टावर या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. नेहमी गंभीर भूमिका साकारणाऱ्या या कलाकारांचा विनोदी अंदाज देखील चाहत्यांना भलताच आवाडला आहे. सर्वजण मराठी चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’ मधील कुणी तरी येणार येणार गं... या गाण्यावर हणम्या म्हणजे अभिनेता समीर खांडेकर आणि टिक्या म्हणजेच अभिनेता प्रथमेश हे दोघे एकदम दिलखुलास डान्स करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
  ती परत आलीये मालिकेत आलेले हे आनंदाचे क्षण किती वेळ टिकतील? या आनंदावर विरजण पाडण्यासाठी ‘ती’ काही अघटित घडवून आणणार का? ..या सर्व प्रश्नाचा उलगडा येणाऱ्या भागातच होणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: