मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आता गटारी सुरू झाली! 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर कलाकारांची धम्माल

आता गटारी सुरू झाली! 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर कलाकारांची धम्माल

 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये  ‘देवमाणूस’ (Devmanus), ‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na) आणि ‘अग्गबाई सूनबाई’ (Aggabai Sunbai) या मालिकांचे कलाकार हजेरी लावणार आहेत.

‘चला हवा येऊ द्या’मध्ये ‘देवमाणूस’ (Devmanus), ‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na) आणि ‘अग्गबाई सूनबाई’ (Aggabai Sunbai) या मालिकांचे कलाकार हजेरी लावणार आहेत.

‘चला हवा येऊ द्या’मध्ये ‘देवमाणूस’ (Devmanus), ‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na) आणि ‘अग्गबाई सूनबाई’ (Aggabai Sunbai) या मालिकांचे कलाकार हजेरी लावणार आहेत.

मुंबई 8 ऑगस्ट : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’मध्ये (Chala Hawa Yeu Dya) या आठवड्यात कलाकारांची धम्माल पाहायला मिळणार. मागील आठवड्यात ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) या मालिकेचे कलाकार आले होते तर या आठवड्यात ‘देवमाणूस’ (Devmanus), ‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na) आणि ‘अग्गबाई सूनबाई’ (Aggabai Sunbai) या मालिकांचे कलाकार हजेरी लावणार आहेत.

दरम्यान सध्या गटारी म्हणजेच दीपअमावस्या श्रावण पूर्व काळ सुरू आहे. त्यानुसार काही विनोद पाहायला मिळत आहेत. प्रोमोत ही धम्माल पाहायला मिळत आहे. देवमाणूस मधील दिव्या म्हणजेच अभिनेत्री नेहा खानने (Neha Khan) देखील हजेरी लावली आहे. तिचा खास डान्स परफॉर्मन्स देखील पाहायला मिळणार आहे.

ओल्या सांजवेळी..! आर्या आंबेकरच्या मधूर आवाजाने व्हाल मंत्रमुग्ध, हे रिमिक्स ऐकाच

अद्वैत दादरकर, नेहा खान, विराजस कुलकर्णी, उमा देसाई, ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चे परीक्षक तसेच मालिकेतील इतर कलाकारही उपस्थित आहेत. याशिवाय चला हवा येऊ द्याचे विनोदवीर आपल्या विनोदाने हास्याचा तडका लावणार आहेत.

दरम्यान झी मराठीवर आता नव्या मालिका सुरू होणार आहेत. त्यामुळे चालू मलिकांपैकी काही मालिका निरोप घेणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Big Boss OTT: 'परम सुंदरी' मलायका बिग बॉसच्या घरात लावणार सुपरहॉट डान्सचा तडका, प्रेक्षकांची उत्कंठा वाढली

भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेय बुगडे याचं खास स्किट देखील पाहायला मिळणार आहे. मागील आठवड्यात मैत्री विशेष कार्यक्रम रंगला होता. तर आता गटारी विशेष भाग पाहायला मिळणार आहे. रविवारी 8 ऑगस्टला पहिला भाग पाहायला मिळणार आहे.

First published:

Tags: Chala hawa yeu dya, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial