मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ओम-स्विटूच्या रोमान्सनं वातावरण झालं गुलाबी; मालविका होऊ देणार का दोघांचं लग्न?

ओम-स्विटूच्या रोमान्सनं वातावरण झालं गुलाबी; मालविका होऊ देणार का दोघांचं लग्न?

ओम (Om) आणि स्विटु (Sweetu) खऱ्या अर्थाने एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. तर दोघांनीही एकमेंकांवरचं प्रेम व्यक्त केलं आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 8 जून : झी मराठी (Zee Marathi) वाहिनी वरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) मालिका सध्या चर्चेत आहे. कारण मालिकेतील ओम (Om) आणि स्विटु (Sweetu) खऱ्या अर्थाने एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. तर दोघांनीही एकमेंकांवरचं प्रेम व्यक्त केलं आहे. स्विटुने एअरपोर्टवर सगळ्यांसमोर ओमला प्रपोझही केलं.

ओम आणि स्विटुने एकमेकांना स्विकारलं असलं तरीही खानविलकर आणि साळवी कुटुंबाने एकमेकांना स्विकारलेलं नाही. नलू आणि मालविकाचा या लग्नाला पूर्णपणे विरोध आहे. मालविका स्विटु आणि ओमला वेगळं करण्यासाठी मोहीतची मदत घेत आहे.

पण सध्या मालिकेत प्रेक्षक ओम आणि स्विटुचा रोमॅन्टीक (Om- sweetu Romantic Moments) अंदाज पाहत आहेत. तर ते एकमेकांच्या प्रेमात हरवलेलें पाहायला मिळत आहेत. तर कोणाच्याही नकळत ते एकमेकांना भेटत आहेत. ओमने स्विटुला त्याच्या हातची पुरणपोळी देण्यासाठी अगदी डिलिव्हरी बॉयचाही अवतार धारण केला होता. व पिझ्झा डिलिव्हरी घेऊन तो पुरणपोळी स्विटुसाठी घेऊन येतो.

ओम आणि स्विटुचं हे छुपके छुपके प्रेम आता मालविकाने नलुच्या लक्षात आणून दिलं आहे. व स्विटू खानविलकरांच्या (Khanvilkar) घरी आली तर तिला आतोनात त्रास सहन करावा लागेल अशी भितीही ती नलुला दाखवत आहे.

वजन कमी होताच करीनाने वाढवली फी; एका चित्रपटासाठी मागितलं इतक्या कोटींचं मानधन

तेव्हा आता मालिकेत ओम आणि स्विटुच्या लग्नाचा मुहुर्त कधी निघणार अशी उत्सुकता प्रेक्षकांना आहे. ओंम आणि स्विटु घरच्यांना त्यांचं प्रेम पटवून देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial