• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO: ओम- स्वीटूच्या लग्नात मालविकाचं षड्यंत्र; ऐन मुहूर्ताला नवा ट्विस्ट

VIDEO: ओम- स्वीटूच्या लग्नात मालविकाचं षड्यंत्र; ऐन मुहूर्ताला नवा ट्विस्ट

ओम आणि स्वीटूच्या लग्नाची सगळी तयारी झाली असताना आता पुन्हा एकदा संकट येत आहे.

 • Share this:
  मुंबई 18 ऑगस्ट :  झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) आता एका वेगळ्या वळणावर आली आहे. अखेर ओम आणि स्वीटूचं लग्न आता होत आहे. गेले अनेक दिवस स्वीटू (Sweetu) आणि ओम (Om) कुटुंबातील सर्वांना आपलं प्रेम पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. तर अखेर आता नलू देखील ओम आणि स्विटूच्या प्रेमाला आणि लग्नाला होकार देते. मात्र मालविकाच्या मनातून अजूनही स्वीटू विषयी कटुता गेली नाही. ती आता ओम आणि स्वीटूच्या पुन्हा एक अडथळे आणत आहे. तिने पुन्हा एकदा नवं षडयंत्र रचल आहे. ऐन लग्नाच्या मुहूर्ताला ती तिची चाल खेळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही मोठा प्रश्न पडला आहे. ओम आणि स्वीटूच्या लग्नाची सगळी तयारी झाली असताना आता पुन्हा एकदा संकट येत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Zee5Marathi (@zee5_marathi)

  स्वीटू आणि ओमच्या लग्नाची सगळी तयारी खानविलकर आणि साळवी कुटुंबाने केली आहे. हळदी समारंभ, साखरपुडा सगळं काही उरकलं आहे. पण ऐन लग्नाच्या मुहूर्ताला ओम मात्र गायब आहे. तर हे सगळं षडयंत्र मालविकाने घडवून आणलं आहे.  त्यामुळे पुन्हा एकदा ओम स्वीटूच्या आयुष्यात पुन्हा एकदा वादळ आलं आहे. तेव्हा आता लग्नाच्या मुहूर्ताला ओम न आल्याने तसेच स्वीटू समोर नवी व्यक्ती उभी राहिली आहे. त्यामुळे स्वीटूच लग्न इतर कोणाशी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. लवकरच मालिकेचा 2 तासांचा महाभाग रंगणार आहे. त्यामुळे मालिकेत नक्की काय वळण येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
  Published by:News Digital
  First published: