मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

स्वीटू - मोहितच्या लग्नावर संतापले प्रेक्षक; मालिका बंद करण्याची होतेय मागणी

स्वीटू - मोहितच्या लग्नावर संतापले प्रेक्षक; मालिका बंद करण्याची होतेय मागणी

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kahi Tashi Mi Nandayla) मध्ये प्रत्येक दिवशी नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पण त्याच बरोबर मालिकेला प्रचंड ट्रोल (troll) केलं जातं आहे. आता तर मालिका बंद करण्याचीच प्रेक्षकांनी मागणी केली आहे.

  • Published by:  News Digital
मुंबई 24 ऑगस्ट : झी मराठीवरील (Zee Marathi) प्रचंड लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kahi Tashi Mi Nandayla) मध्ये प्रत्येक दिवशी नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पण त्याच बरोबर मालिकेला प्रचंड ट्रोल (troll) केलं जातं आहे. आता तर मालिका बंद करण्याचीच प्रेक्षकांनी मागणी केली आहे. मालिकेत सध्या ओम आणि स्वीटू यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. अनेक कठीण प्रसंगांनंतर अखेर ओम आणि स्वीटूच लग्नं होत आहे. मात्र त्यातही अनेक विघ्न पाहायला मिळत आहेत. तर मालविकाने तिची कटकारस्थान अजूनही सुरूच ठेवली आहेत. साखरपुडा, हळद सगळे कार्यक्रम पार पडल्यानंतर मात्र अचानक ओम लग्नातून गायब होतो. मुहूर्ताची वेळ टळत असते. तेव्हा स्वीटूसोबत मोहित लग्नाला उभा राहतो.
View this post on Instagram

A post shared by Zee5Marathi (@zee5_marathi)

इतकचं नाही तर स्वीटू आणि मोहितच लग्न देखील होतं. मोहित स्वीटूला कुंकू लावतो आणि इतक्यातच ओम तिथे पोहोचतो. स्वीटू या सगळ्या प्रकारामुळे फार कोलमडून गेलेली असते. पण यामुळे आता प्रेक्षक मात्र मालिकेवर फारच संतापले आहेत. अनेकांनी मालिकाच बंद करण्याची मागणी केली आहे. कोणी सीरियल पाहणार नसल्याचं म्हटलं तर कोणी लेखकावरच संताप व्यक्त केला. मालिका त्वरित बंद करा अशीही मागणी अनेकांनी केली. त्यामुळे प्रेक्षक मालिकेवर प्रचंड संतापलेले दिसत आहेत.
दरम्यान गेले अनेक दिवस स्वीटू आणि ओमच्या लग्नाची प्रेक्षक वाट पाहत होते. पण या एपिसोड नंतर प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाल्याचं पाहायला मिळालं. गेले अनेक दिवस कथानकामुळेही मालिकेवर टीका केली जात होती. मात्र अखेर ओम आणि स्वीटूच लग्नं होतंय हे पाहून उत्सुत्कता वाढली होती. मात्र अचानक आलेल्या ट्विस्ट ने सगळेच हैराण झाले आहेत. तेव्हा आता मालिकेत पुढे नक्की काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
First published:

Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

पुढील बातम्या