‘येऊ कशी...नांदायला’ : मोहित - मोमोचा रोमँटिक VIDEO, केमिस्ट्री पाहून प्रेक्षक झाले खूश

‘येऊ कशी...नांदायला’ : मोहित - मोमोचा रोमँटिक VIDEO, केमिस्ट्री पाहून प्रेक्षक झाले खूश

'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम मोहित आणि मोमो रोमँटिक गाण्यावर केला भन्नाट डान्स. पाहा VIDEO

  • Share this:

मुंबई 11 जून : झी मराठी (Zee Marathi) वाहिनी वरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) नेहमीच चर्चेत असते. अल्पावधीतच मालिकेने लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेतील प्रत्येक पात्रही  प्रेक्षकांच्या चांगलच पसंतीस उतरत आहे. फक्त नायक-नायिकाच नव्हे तर मालिकेत नकारात्मक भूमिका करणारा मोहित (Mohit) आणि मोमो (Momo) ही पात्रंसुद्धा प्रेक्षकांना फार आवडतात.

मोमो आणि मोहितने एका रोमँटिक गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. ‘दुनिया मे आये हो तो प्यार कर लो’ या जुन्या गाण्यावर ते दोघेही अगदी गमतीशीर नृत्य करताना दिसत होते. तेव्हा त्यांची ही केमिस्ट्री पाहून प्रेक्षकही खूश झाले आहेत. अनेकांनी त्यांच्या या केमिस्ट्रीवर प्रतिक्रिया देत व्हिडीओ आवडल्याचं म्हटलं आहे.

मालिकेत दोघेही खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्याचप्रमाणे विनोदी अंग ही दाखवलं जातं. मोहित म्हणजेच आभिनेता निखिल राऊत (Nikhil Raut) आणि मोमो म्हणजेच अभिनेत्री मीरा जग्गनाथ (Mira Jagganath) यांचं मालिकेतील कामही प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.

मालिकेत सध्या ओम आणि स्विटू एकमेकांच्या प्रेमात हरवले आहेत. त्यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली असून आता खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली आहे. मोहित मात्र मालविकाची मदत करत आहे. ओम आणि स्वीटूला वेगळ करण्यासाठी खटपट करतोय. याशिवाय मोमो जास्तीत जास्त पैसे मिळवून तेथून पळ काढण्याचा विचार करत आहे.

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी कमी खर्चात केलं लग्न; पाहा त्यांचे 'Simple Look'

दुसरीकडे नलूचा ओम आणि स्विटूच्या प्रेमाला पूर्ण विरोधा असल्याने स्विटूला मात्र भीती वाटत आहे. तेव्हा ओम आणि स्विटूचं लग्नं कसं होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. स्विटू नलूला समजावू शकणार का व  मालविका तिची कारस्थानं थांबवणार का हे येणाऱ्या भागातच स्पष्ट होईल.

Published by: News Digital
First published: June 11, 2021, 6:08 PM IST

ताज्या बातम्या