Home /News /entertainment /

माझी तुझी रेशीमगाठ : शेफालीच्या लुडबुडीमुळे नेहा-यशची बट्टी होणार की नात्यात कायमचा दुरावा येणार?

माझी तुझी रेशीमगाठ : शेफालीच्या लुडबुडीमुळे नेहा-यशची बट्टी होणार की नात्यात कायमचा दुरावा येणार?

माझी तुझी रेशीमगाठ : यश नेहाच्या प्रेमात आहे मात्र नेहा काय यशच्या प्रेमाचा स्वीकार करायला तयार नाही. यशचं सत्य समोर आल्यानंतर या दोघांच्यामधील मैत्रिचे नाते देखील संपले आहे. मात्र यश नेहाचं प्रेम जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 26 जानेवारी- झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ( mazhi tuzhi reshimgaath ) मालिका अल्पावधित प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील यश आणि नेहीची  (  yash and neha ) जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. यशची भूमिका श्रेयस तळपदेने साकारली आहे. तर नेहाची भूमिका प्रार्थना बेहेरेने साकारली आहे. यश नेहाच्या प्रेमात आहे मात्र नेहा काय यशच्या प्रेमाचा स्वीकार करायला तयार नाही. यशचं सत्य समोर आल्यानंतर या दोघांच्यामधील मैत्रिचे नाते देखील संपुष्टात आलं आहे. मात्र यश नेहाचं प्रेम जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. यशला आणि नेहाला एकत्र आणण्यासाठी समीर शैफालीच्या मदतीने नेहमी नवीन प्लॅन तयार करत असतो. नेहमी सारखे प्रत्येक प्लॅनवर पाणी पडत आहे. यावेळी देखील यशने समीरच्या मदतीनं एक प्लॅन आखला आहे. यशच्या घरी म्हणजे पॅलेसवर कोणीही नसल्यामुळे समीर नेहाला जगन्नाथ चौधरी म्हणून फोन करतो.आणि, तिला घरी बोलावतो. तसंच आता घरात फक्त यश आणि नेहा तुम्ही दोघेच आहात त्यामुळे नेहाचं मन वळव असं समीर, यशला सांगतो. विशेष म्हणजे मोठ्या सरांचा फोन आल्यामुळे नेहा देखील यशच्या घरी जायला निघते. वाचा-कृष्णासाठी रायाचं 'मन झालं बाजींद'! दोघांचे रोमँटिक Photos Viral इगडे यशच्या मनाच प्रेमाचे लड्डू फुटायला लागलेले असतात. नेहा येते मात्र एकटी नाही तर तिच्यासोबत शेफाली देखील असते. मात्र शेफालीला नेहासोबत पाहून यश काहीसा निरास होतो. यावेळी शेफाली खाण्यासाठी मागते मग नेहाला किचनमध्ये जाते आणि खायला बनवायला घेते. आणि तो स्वप्न पाहायला लागतो. या स्वप्नात नेहा आणि यश प्रेमाने स्वयंपाक घऱात स्वयंपाक बनवताना दिसत आहे. मग मध्येच त्याला चटका बसतो आणि जाग येते. त्यामुळे आता पुढे काय होणार याची देखील उत्सुकता लागली आहे.
  शेफालीच्या लुडबुडीमुळे नेहा आणि यशची बट्टी होणार की नात्यात दुरावा निर्माण होणार ? याचा उलगाडा येणाऱ्या भागात होईल. शेफाली नेहीची मैत्रिण आहे. त्यामुळे अनेकवेळा ती नेहासोबत दिसत असते. आत नेहा यशच्या प्रेमाला कधी होकार देणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या