मुंबई 17 जुलै : झी मराठी (Zee marathi) वाहिनीवरील मालिका ‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na) सध्या एका वेगळ्या वळणावर आली आहे. ज्या गोष्टीची प्रेक्षक सुरुवातीपासून वाट पाहत होते ती घडत आहे पण त्यातही आता नवा ट्विस्ट येताना दिसत आहे.
आदित्य (Aditya) हा कोणी सामान्य मुलगा नसून त्याच्या नावे एक मोठी कंपनी आहे हे आता सगळ्यांना समजलं आहे. तर ही कंपनी आपल्या भाच्याला सुपूर्त करावी यासाठी सगळे मामा वाट पाहत होते. आणि आता ती वेळ आली आहे. तर कंपनीत एक मोठा कार्यक्रम ठेऊन आदित्य देसाई (Aditya Desai) अशी आदित्यची खरी ओळख सांगून घोषणा करण्यात येते.
View this post on Instagram
‘आदित्य ग्रूप ऑफ कंपनी’ (Aditya Group of companies) ही आदित्यच्या नावाने हे जाहीर होत. पण इतक्यातच एक नवी व्यक्ती आपणच आदित्य देसाई असल्याचं म्हणते. त्यामुळे सगळेच जन मोठ्या गोंधळात पडले आहेत. (Maza hoshil na episodes)
View this post on Instagram
दरम्यान मागील काही भागांत ब्रम्हे कुटुंबात विवाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. व सई (Sai - Aditya)आणि आदित्य वेगळे राहू लागले होते. पण आता त्यांच्यातील दुरावे मिटले असल्याचं पाहायला मिळत आहे.
HBD: डेअरी चालवणाऱ्या बापाचा लेक झाला अभिनेता; रवी किशनने असा केला होता संघर्ष
तेव्हा आता ही कंपनी आदित्यला मिळणार की ही नवी व्यक्ती आणखी काही संकट घेऊन येणार हे तर येणाऱ्या भागातच स्पष्ट होईल. दरम्यान सई आणि आदित्य आता या नव्या संकटाचा कसा सामना करणार हे पाहण देखील महत्त्वाचं ठरेलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.