मुंबई, 26 ऑक्टोबर : झी मराठीवरील 'मन झालं बाजिंद' (Mann zaal Bajind ) ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांना आवडू लागली आहे. या मालिकेत अभिनेत्री श्वेता खरातने (shweta kharat) कृष्णा ही भूमिका साकारली आहे. तर वैभव चव्हाण(vibhav chavan) रायाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या एक नवीन ट्वीस्ट (Mann zaal Bajind Latest Episode)पाहायला मिळतो आहे. मालिकेत नुकतंच राया आणि कृष्णाचं लग्न झालं आहे. मात्र, रायाच्या लग्नाविषयी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. लग्नाची वरात परतत असताना कृष्णाच्या गाडीला अपघात होतो. त्यामुळे सध्या कृष्णा मृत्यूच्या दारात उभी आहे. यामध्येच कृष्णा परतणारच नाही असं म्हणत गुली मावशी राया- अंतराचं लग्न लावायचा निर्णय घेते. परंतु या लग्नावेळीच मालिकेत एक ट्वीस्ट (Mann zaal Bajind NewTwist ) पाहायला मिळणार आहे.
झी मराठीने नुकताच इन्स्टावर एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये राया-अंतराच्या लग्नाचे विधी सुरु असतानाच ऐन मंगलाष्टकांच्या वेळी कृष्णा हॉस्पिटलमधून धावत घरी येते असं दाखवण्यात आलं आहे. ज्यावेळी ती घराच्या दरवाज्याजवळ येते तेव्हा राया - अंतराचं लग्न सुरु असते. योगायोगाने ती माप देखील ओलांडते. कृष्णाला जखमी अवस्थेत पाहून घरातील प्रत्येकालाच धक्का बसतो. राया पुन्हा लग्न करत असल्याचे पाहून कृष्णा मात्र दु:खी होते. आता कृष्णा परत आली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. राया आणि कृष्णाची जोडी प्रेक्षकांच्या आवडती आहे. त्यामुळे ही जोडी एकत्र दिसणार का याची देखील उत्सुकता आहे.
View this post on Instagram
रायाच्या लग्नाबाबतची भविष्यवाणी खरी ठरत असल्यामुळे गुली मावशी तिच्या ठरलेल्या प्लॅननुसार, राया आणि अंतराचं घरातल्या घरात लग्न लावायचा ठरवते. तर दुसरीकडे कृष्णा मृत्यूशी झुंज देत असते. तर, राया मात्र अंतरासोबत लग्न करण्याच्या तयारी असतो.
वाचा : वर्षा उसगांवकर धरणार ममता बॅनर्जींचा हात, गोव्यात करणार पक्षप्रवेश- सूत्र
मात्र ऐनवेळी जखमी अवस्थेत कृष्णा घरी परत येते. त्यामुळे राया- अंतराचं लग्न होणार की नाही हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच गुली मावशीचा प्लॅन यशस्वी होणार की गुली मावशीचा खोटापणा सर्वांच्या समोर कसा येणार या सर्व प्रश्नाची उत्तरे मन झालं बाजिंद ही मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. तोपर्यंत प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial, Zee Marathi, Zee marathi serial