Home /News /entertainment /

यश -नेहाचं लग्न तर होणार पण एका व्यक्तीच्या एंट्रीमुळे सुखी संसारात पडणार मिठाचा खडा…

यश -नेहाचं लग्न तर होणार पण एका व्यक्तीच्या एंट्रीमुळे सुखी संसारात पडणार मिठाचा खडा…

माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका पाहणारा प्रेक्षकवर्ग सध्या बराच सुखावला आहे. यश आणि नेहा यांचं अखेर लग्न पार पडणार आहे. पण हे सगळं इतक्या सुखासुखी होऊन त्यांचं आयुष्य नीट मार्गावर येईल का?

  मुंबई 11 जून: (Zee Marathi) झी मराठीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेचा ट्रॅक सध्या खूप कमाल चालू आहे. यश आणि नेहाचं (Yash Chaudhari-Neha Kamat) लग्न अखेर झालं असल्याने चाहते आणि सिरीयल पाहणारे सगळेच सुटकेचा निश्वास सोडत आहेत. पण इतक्यात जर सगळं सुरळीत झालं तर कसं व्हायच हो!  यश आणि नेहा यांच्या लव्हस्टोरीची नाव आता कुठे किनाऱ्याला लागत आहे. यश आणि नेहा मोठ्या कष्टाने एकमेकांशी विवाहबद्ध होणार आहेत. त्यांच्या ग्रँड लग्नसोहळ्याला परीपासून अगदी सगळे आग्रहाचं निमंत्रण प्रेक्षकांना करत आहेत. त्यांच्या या खास लग्नसोहळ्याचे अपडेट मिळवण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या लगाच्या सगळ्या कार्यक्रमांचे खास लुक सुद्धा समोर आले आहेत. नेहा आणि यश यांच्या नात्याला या लग्नामुळे वेगळं आणि सुखाचं वळण मिळणार हे नक्की. पण या मालिकेत एका व्यक्तीच्या एन्ट्रीमुळे सोन्यासारख्या सुखी वातावरणात मिठाचा खडा पडणार आहे असं दिसत आहे. कदाचित हा माणूस नेहाचा पहिला नवरा असू शकतो असा अंदाज बांधला जात आहे. याचा चेहरा जरी अजून समोर आला नसला तरी या माणसाच्या येण्याने संकटाची चाहूल लागली हे मात्र खरं आहे. 
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  या व्यक्तीच्या चाहुलीने अत्ता कुठे सुखाने सुरु झालेला नेहा यशाचा संसार फिस्कटणार का अजून काही वेगळाच ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. यश आणि नेहा यांची लव्हस्टोरी अनेक अडथळे पार करत अत्ता कुठे फुलू लागली आहे. या लव्हस्टोरीमध्ये लाडक्या परीची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. या मालिकेशी प्रेक्षक खूप छान जोडले आहेत. यातील अनेक पात्र प्रत्येकाला अगदी घरचीच वाटतात.  हे ही वाचाभर पावसाळ्यात अमेयला लागलेत 'या' पदार्थाचे डोहाळे, हे खाऊ का ते... म्हणत पडला धर्मसंकटात? या मालिकेचा 12 जून रोजी महाएपिसोड असणार आहे. नेहा आणि यश अखेर यादिवशी विवाहबंधनात अडकणार आहेत. घोड्यावर बसून थाटात वरात घेऊन यश अखेर नेहाला आपली दुल्हनिया बनवून घेऊन जाणार आहे.  हा लग्नसोहळ्याचा अख्खा आठवडा खूप खास आणि आनंदाने भरलेला होता. संगीत,मेहंदी पासून अगदी लग्नाच्या लूकपर्यंत या जोडीच्या सगळ्या आऊटफिटची तुफान चर्चा होत आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या