Home /News /entertainment /

ओ शेठ! देवमाणूसच्या टीमलाही पडली या VIRAL गाण्याची भूरळ; पाहा डॉक्टर-दिव्याची केमिस्ट्री

ओ शेठ! देवमाणूसच्या टीमलाही पडली या VIRAL गाण्याची भूरळ; पाहा डॉक्टर-दिव्याची केमिस्ट्री

सोशल मीडियावर ओ शेट गाण्याने धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. पण सामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटीही याचा मोह आवरु शकलेले नाहीत.

  मुंबई 31 जुलै : सध्या एक गाणं फारच चर्चेत आहे. डिजिटल युगाच्या जमान्यात कधी कशाचा ट्रेंड येईल सांगता येत नाही. असाच एक गाण्यांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. ‘ओ शेट’ (Oo Shet) हे मराठीतील गाणं त्यातीलच एक. याचप्रमाणे ‘बचपन का प्यार मेरा’ (Bachpan ka pyar mera)  या गाण्याने देखील धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. पण सामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटी ही याचा मोह आवरु शकलेले नाहीत. झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील प्रचंड लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’च्या (Devmanus) कलाकारांनी या गाण्यावर भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते ओ शेट या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. मालिकेतील डिम्पल, डॉक्टर, दिव्या आणि वंदी आत्या यात दिसत आहेत. डिम्पल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख, नेहा खान, किरण गायकवाड, पुष्पा चौधरी असे कलाकार धम्माल करताना दिसत आहेत.

  मराठमोळ्या मिथिलाचा बोल्ड अवतार; नव्या फोटोंमध्ये दिसली सुपरहॉट

  देवमाणूसची टीम नेहमीच अशाप्रकारे धमाल करताना दिसते. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक मजेशीर व्हिडिओ आणि फोटोज् ते पोस्ट करतात. मालिकेतील दिव्या सिंग म्हणजेच अभिनेत्री नेहा खान सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिचे डान्स व्हिडिओ फारच व्हायरल होतात.
  मालिकेत सध्या एका नव्या पात्राची देखील एंट्री झाली आहे. तर डॉक्टर पुन्हा एकदा नव्या बाईच्या प्रकरणांत अडकत असल्याचं दिसत आहे. तर ही बाई पैसेवाली असल्याचं ही त्याला समजलंय. त्यामुळे आता त्याची पुढील चाल काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. याशिवाय मालिकेत चंदा हे पात्र देखील काही दिवसांपूर्वी सामील झालं. ती डॉक्टर का वठणीवर आणताना दिसत आहे. त्यामुळे पुढे रंजक वळण येणार असं दिसत आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या