देवी सिंगच्या अडचणी वाढणार? सरू आजी देणार डॉक्टर विरोधात साक्ष

देवी सिंगच्या अडचणी वाढणार? सरू आजी देणार डॉक्टर विरोधात साक्ष

देवमाणसाच्या म्हणजेच डॉक्टरच्या अडचणी आता वाढतच चालल्या आहेत. दिव्या सिंग आणि वकील आर्या देशमुख डॉक्टरला आता पूर्णपणे फासावर लटकवण्याची तयारी करत आहेत.

  • Share this:

मुंबई 18 जून : झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय तसेच तितकीच चर्चेत राहणारी मालिका ‘देवमाणूस’मध्ये (Devmanus) देवमाणसाच्या म्हणजेच डॉक्टरच्या अडचणी आता वाढतच चालल्या आहेत. दिव्या सिंग आणि वकील आर्या देशमुख डॉक्टरला आता पूर्णपणे फासावर लटकवण्याची तयारी करत आहेत.

दिव्याने आणि आर्याने आता बरेचसे पुरावे जमा केले आहेत. आणि त्यामुळे देवी सिंग पुरता अडकला आहे. याशिवाय वाड्यातून एक सांगाडा मिळाल्यानेही खळबळ उडाली आहे. तर डॉक्टरसोबतच आता वाड्यातील सगळ्यांचीच चौकशी केली जात आहे. यामुळे संपूर्ण गावात देखील भीतीचं वातवरण निर्माण झालं आहे. पण देवी सिंगने (Devi Singh) अजूनही गुन्हा कबूल केलेला नाही.

समुद्रकिनाऱ्यावर शंख-शिंपले वेचतेय दिशा; चाहते म्हणाले 'जलपरी आली'

तर आता एक एक करून सगळ्यांची साक्षही घेतली जात आहे. व ज्या कट्ट्यातून सांगाडा मिळाला होता तो डॉक्टरनेच बांधला होता हे ही आता आर्याने मंगलकडून वधवून घेतलं आहे. त्यामुळे डॉक्टरविरोधात आता सबळ पुरावे कोर्टात सादर केले जात आहेत.

मंगल , बाबू, डिम्पल यांच्या साक्षीनंतर आता आता सरू आजीही साक्ष देण्यासाठी कोर्टात गेली आहे. तर सरू आजी तिच्या अंदाजात तिला माहीत असलेलं सगळं सांगण्याचा प्रयत्न करते. पण डॉक्टर त्याच्या उलटसुलट उत्तरांनी तिच्यावरच घुमजाव करतो. यामुळे आता डॉक्टरच्या अडचणी वाढणार की कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

नोराच्या हातातल्या लहानशा बॅगेची किंमत माहीत आहे का? एक कारही घेऊ शकता विकत

दरम्यान मागील भागात आपण पाहिलतं, डॉक्टरच्या विरोधात अनेक पुरावे सादर केल्याने तो आता संतापला आहे. दिव्याला धडा शिकवण्याचा प्लॅन तो करत आहे. तर दुसरीकडे तो वकील आर्या देशमुखशीही फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे देवी सिंगच्या डोक्यात नक्की काय प्लॅन शिजत आहे हे पाहणं ओत्सुक्याचं ठरेल.

Published by: News Digital
First published: June 18, 2021, 3:34 PM IST

ताज्या बातम्या