मुंबई 24 जून : झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’मध्ये (Devmanus) मोठा ट्वीस्ट येताना दिसत आहे. मालिका सध्या ऐन रंगात आली आहे. मुख्य गुन्हेगार देवी सिंग (Devi Singh) पोलिसांच्या ताब्यात आहे. तर कोर्टात आता केस सुरू आहे. पण आताही डॉक्टरचे कारनामे सुरूच आहेत. तर कोर्टाची दिशाभूल करण्याचा तो प्रयत्न करत आहे.
एसीपी दिव्या सिंग डॉक्टरला लवकरात लवकर फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर आता तिला वकील आर्या देशमुखचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे दोघीही शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पण डॉक्टरही आता उलट तपासणी करत दोघींना आव्हाण देत आहे.
View this post on Instagram
पण आता एसीपी दिव्या सिंग मालिकेत दिसणार नसल्याचं समोर येत आहे. तर तिच्या जागेवर इन्स्पेक्टर शिंदे येणार आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मालिकेत हा मोठा बदल होणार आहे. दिव्याने डॉक्टरला अटक केल्यापासून मालिकेला वेगळं वळण मिळालं होतं. तर तिने चक्क संपूर्ण गावासमोर देवी सिंगला चोपही दिला होता. पण आता दिव्या दिसणार नसल्याने मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
'खतरोंके खिलाडी' नंतर दिव्यांकाचा पुन्हा एकदा सोज्वळ सूनेचा अवतार; चाहत्यांनी केलं कौतुक
अभिनेत्री नेहा खान (Neha Khan) दिव्या सिंग हे पात्र साकारत होती. तिचं काम प्रेक्षकांना विशेष आवडलं ही होतं. देवी सिंगचा तिने लावलेला छडा यामुळे मालिकेत रंगत पाहायला मिळाली. पण आता दिव्या दिसणार नाही. तेव्हा देवी सिंगला फासावर लटकणार का? की पुन्हा चालाकीने तुरूंगाबाहर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.
View this post on Instagram
सध्या मलिकेत देवी सिंग स्वतःची केस लढतोय. त्यामुळे सगळ्या साक्षीदारांची तो उलट तपासणी घेत आहे. तर आता तो सरू आजीचीही तपासणी घेत आहे. तेव्हा सुरू आजी डॉक्टरला कशाप्रकारे कोर्टात उत्तरं देते पाहण रंजक ठरेलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.