Home /News /entertainment /

देवी सिंगनं आखला नवा प्लान; डिम्पलच्या मदतीने येणार तुरुंगाबाहेर?

देवी सिंगनं आखला नवा प्लान; डिम्पलच्या मदतीने येणार तुरुंगाबाहेर?

देवी सिंगचा जेल बाहेर येण्यासाठी नवा डाव. दिव्या यशस्वी होऊ देणार का डिम्पल -डॉक्टरचं कारस्थान?

  मुंबई 4 जून : झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) आता अंतिम टप्प्यात आली असं प्रेक्षकांना वाटत असतानाचं मालिका वेगळं वळण घेत आहे. देवी सिंग (Devi singh) म्हणजेच डॉक्टर आता पोलिसांच्या ताब्यात आहे. दिव्याने त्याला गावासमोर तसेच भर लग्नातून अटक केली होती. पण अजूनही त्याच्या खुरापती सुरूच आहेत. दिव्या, देवी सिंगला त्याचे गुन्हे कबुल करण्यासाठी सांगत आहे. पण डॉक्टर अजूनही नाटकं करत आहे. व आपण काहीही न केल्याचं म्हणतोय. दिव्या तसेच इतर पोलिसांनी डॉक्टरची चांगली धुलाई केली. पण इतक सगळं करूनही त्याच्यावर कोणताच परिणाम पहायला मिळत नाही.
  दिव्याने आता त्याला थर्ड डिग्रीवर घेतलं आहे. पण तो पोलिसांवरच हसतो. व काहीही कबूल करायला तयार होत नाही. दरम्यान पोलिसांनी ड़ॉक्टरला अटक केली तेव्हा डिम्पल (Dimple) त्याला भेटायला गेलेली असते. तेव्हा डॉक्टरने अजूनही काहीही संपलेलं नाही. व मी बाहेर येऊ शकतो असं डिम्पलला म्हटलं होत. व त्याने तिला एक प्लॅनही सांगितला होता.
  याशिवाय दुसरीकडे बज्या, नाम्या, गावातील काही लोक आणि मंगल डॉक्टला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तेव्हा डिम्पल त्यांना धीर देत ते बाहेर येणारच आहेत असं म्हणते. व डॉक्टरने सांगितलेल्या प्लॅननुसार सगळंकाही होण्याचा विचार ती करत आहे. तसेच गावातील सगळे लोक हे डॉक्टरच्या अटकेमुळे दिव्यावर फारच संतापले आहेत.

  साडीत खुलून दिसलं मितालीचं सौंदर्य; पाहा अभिनेत्रीचा Traditional Look

  डॉक्टर जेलमध्ये दिव्याने आपल्याला अटक करून खूप मोठी चूक केल्याचं म्हणत असतो. त्यामुळे आता डॉक्टरने डिम्पलला नक्की कोणता प्लॅन सांगितला आहे. व डॉक्टर आता खरचं जेलच्या बाहेर येणार का हे पाण म्हहत्वाचं ठरेलं. तसेच यामुळे दिव्याचा जीव पुन्हा एकदा धोक्यात तर नाही ना येणार हे येणाऱ्या भागातच स्पष्ट होईलं.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या