शुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण

शुभ्रा सोहमला दाखवणार त्याची जागा; नवा निर्णय आणणार मोठं वळण

मालिकेत पुन्हा एकदा नवा ट्विस्ट येताना दिसत आहे. तर आता साधीभोळी शुभ्रा (Shubhra) सोहमला (Soham) त्याची खरी जागा दाखवून देणार आहे.

  • Share this:

मुंबई 18 मे : झी मराठी (Zee Marathi) वरील सध्या भलतीच चर्चेत असणारी ‘अग्गबाई सुनबाई’ (Aggabai Sunbai)  मालिकेत पुन्हा एकदा नवा ट्विस्ट येताना दिसत आहे. तर आता साधीभोळी शुभ्रा (Shubhra) सोहमला (Soham) त्याची खरी जागा दाखवून देणार आहे. त्यामुळे आता मालिका नक्की काय वळण घेणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

दरम्यान नव्या प्रोमो मध्ये शुभ्रा आणि सोहममध्ये कडाक्याचं भांडण होत आहे. तर सोहम तिला ती त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून असल्याचं जाणवू देत आहे. तर बबडूची आणि तुझी सगळी माझ्यावर आहे. व तुमचे सगळे चोचले मलाच पुरवावे लागतात असं तो म्हणतो. त्यामुळे शुभ्राला मात्र फार वाईट वाटतं.

गेले काही दिवस शुभ्रा ही सोहमच्या वागण्यामुळे फार चिंतेत असते. तर त्यातच तो तिची फसवणूक करीत असल्याचही समजतं. तर त्याचं आणि सुझेनचं अफेअर सुरू असल्यांचं तिला समजलं होतं. आणि त्यानंतर शुभ्रा मात्र पुरती कोलमडून गेली होती. तर तिने आत्महत्येचाही विचार केला होता.

अखेर वाढदिवशीच चाहत्यांना सुखद धक्का; सोनाली कुलकर्णीचं शुभमंगल सावधान!

पण शुभ्रा आता सोहमला त्याच्या कृत्याचा जाब विचारते पण तो मात्र तिलाचं उलट उत्तर देत तु माझ्यावर कशाप्रकारे अवलंबून आहेस हे सांगतो. त्यामुळे शुभ्रा दुखावली गेली आहे. तर आता तिने घरात न बसता घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. व आता ती स्वतःच्या पायावर उभी राहणार आहे. आणि त्यासाठी ती नोकरी करणार आहे.

तेव्हा आता शुभ्राचा हा निर्णय ऐकून सोहम नक्की काय प्रतिक्रिया देणार तसेच आसावरी आणि अभिजीत राजेंचं यावर काय मत असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. व सोहमला खरंच अद्दल घडणार का हे ही पाहणं महत्त्वाचं ठरेल.

‘अग्गबाई सुनबाई’ हे ‘अग्गबाई सासूबाई’ (Aggabai sasubai) पेक्षा काही अंशी वेगळं असलं तरीही सोहमच्या खुरापती मात्र तशाच सुरू आहेत. तर मागील पर्वात खमकी आणि तोडीस तोड उत्तर देणारी शुभ्रा या पर्वात काही अंशी सौम्य झाली आहे. तेव्हा आता शुभ्राचा हा नवा निर्णय नक्की काय वळण घेऊन येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Published by: News Digital
First published: May 18, 2021, 11:20 PM IST

ताज्या बातम्या