Home /News /entertainment /

L'il champs पुन्हा येतायत; झी मराठीनं जाहीर केलं 'सारेगमप' नवं पर्व

L'il champs पुन्हा येतायत; झी मराठीनं जाहीर केलं 'सारेगमप' नवं पर्व

काही वर्षापूर्वी लोकप्रिय झालेला रियॅलिटी शो 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' ( sa re ga ma pa l'il champs) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  मुंबई, 5 एप्रिल : झी मराठी (zee marathi) वाहिनी वर काही वर्षापूर्वी लोकप्रिय झालेला रियॅलिटी शो सा रे ग म प लिटिल चॅम्प्स ( sa re ga ma pa l'il champs) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर या कार्यक्रमाने श्रोत्यांची चांगलीचं मने जिंकली होती. तर महाराष्ट्राला अनेक लहान गायक ही मिळाले होते. रोहित राऊत (Rohit Raut), कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad), मुग्धा वंशयपायन (Mugdha vaishampayan), प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate), आर्या आंबेकर (Aarya Ambekar) ही बॅच आजही प्रेक्षकांच्या तितकीच लक्षात आहे. मोठे झाल्यावरही हे गायक श्रोत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. तर हाच कार्यक्रम आता पुन्हा एकदा सुरू होत आहे.
  झी मराठी वाहिनीने याचा एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. यात काही लहान मुले दिसत आहेत. तर एक मुलगी गाणं गात आहेत. सा रे ग म प l'il champs चं हे तिसरं पर्व आहे. येत्या 29 एप्रिल पासून शो सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मागील पर्वांत गायक अवधूत गुप्ते (Avadhut Gupte) आणि गायिका वैशाली सामंत (Vaishali Samant) यांनी जज ची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे यावेळी जजेस नक्की कोण असणाय याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. याशिवाय अभिनेत्री पल्लवी जोशी ने सूत्रसंचालन केलं होतं.

  शिवाजी महाराजांवर येतेय नवी मालिका; हा अभिनेता साकारणार छत्रपतींची भूमिका

  महाराष्ट्रातील उत्तोमत्तम गायक शोधण्याचं धैय या कार्यक्रमाचं आहे. त्यामुंळे लहानग्या गायकांसाठी सा रे ग म प पुन्हा एकदा नवी उमेद घेऊण आलं आहे. शो ची वेळ ही बुधवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता असल्याची चर्चा आहे.  त्यामुळे सध्या सुरू असलेली मालिका 'काय घडलं त्या रात्री' (kai ghadla tya ratri) बंद होणार की वेगळ्या वेळेत दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या